महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनी
आष्टी (अशोक खंडारे):-
वाचन संकल्प महाराष्ट्र या संकल्प ने वर आधारित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आष्टी येते, वाचन संस्कृती पंधरवडा महाविद्यालयातील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाच्या वतीने “ग्रंथप्रदर्शनी “आयोजित करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रंथालयात उपलब्ध संदर्भ ग्रंथ,चरित्र,स्पर्धापरीक्षा,विश्वकोष, मासिके इत्यादी वाचन साहित्याचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अवलोकन केले. आणि त्यातून विविध विषयांवरील ग्रंथा विषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. संजय फुलझेले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्याच्या मनात वाचनाविषयी उत्सुकता ,वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमाला उपस्थिती डॉ. राज मूसने,डॉ. रवि शास्त्रकार ,प्रा.नाशिका गभने .कार्यक्रमाचे संचालन प्रा.ज्योती बोबाटे तर आभार प्रदर्शन प्रा.रवि गजभिये यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.राजकुमार लखमापुरे,श्री. निलेश नाकाडे,श्री. आय.आर.शेख, श्री.एम.डी. मुश्ताक, संजित बच्चाड,श्री.प्रभाकर भोयर, दिपक खोब्रागडे,संतोष बारापात्रे, महा.विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
इयत्ता पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गामध्ये बसविले जाणार आहे. सदर दोन वर्गातील नापास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलले जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्ह्याचा शिक्षण विभाग कामात लागला असून अप्रगत विद्यार्थ्यांची माहिती केंद्र व तालुकास्तरावरून मागविली आहे.
एखादा विद्यार्थी समोरच्या वर्गात जाण्यासाठीचे वेळोवेळी निश्चित करण्यात आलेले आवश्यक निकष पूर्ण करण्यास असमर्थक ठरल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी आणखी अभ्यास करावा, दोन महिन्यात फेर परीक्षा घ्यावी. मात्र फेर परीक्षेतही विद्यार्थ्याला आवश्यक गुण मिळविण्यात अपयश आल्यास त्याला पाचवी किंवा आठवीच्या वर्गातच बसविण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात बसल्यानंतर वर्गशिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्याला नेमके काय समजले नाही, हे विविध मूल्यांकनाद्वारे समजून घेऊन त्याला जादा शिकवावे. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला काढता येणार नाही, असे नव्या आदेशात नमूद केले आहे.
शिक्षण आयुक्तालयाने मागवली आकडेवारी
राज्याच्या शिक्षण आयुक्तालयाने संपूर्ण राज्यभरातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या अपग्रत विद्यार्थ्यांबाबतची माहिती जिल्हास्तरावरून मागितली आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही माहिती आयुक्तालयाला १०० टक्के पोहोचणार आहे.
आधीच्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल एवढी जबाबदारी होती परंतु आज जग बदलला तशा स्त्रियांमध्ये मोकळीकता निर्माण झाली आणि बरीचशी प्रगती होऊन आजच्या स्त्रिया स्वावलंबी होऊन जगाला दाखवून दिल्या की,हम भी कुछ कम नही आणि हे सत्य आहे.
जमान्यानुसार बदल व्हायला पाहिजे होता आणि तो झाला.शिक्षण क्षेत्रात गगन भरारी घेत स्त्रियांनी प्रगती साधली हा मुख्य कारण आहे.शिक्षणामुळे आजची स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे याचा सार्थ अभिमान आहे.तिहेरी भूमिका चांगल्या प्रकारे सांभाळून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा उडण्यापासून तर रोजगारापर्यंत उंच भरारी घेत स्वतःचं नाव लौकिक केलं आणि स्त्री ही एक अबला नसून ती रणरागिणी आहे,हे सिद्ध करून दाखवलं.
महत्त्वाचं म्हणजे स्त्री चूल आणि मोल या घोषणा वाक्यावर मर्यादित न राहता स्वतःच्या कर्तृत्व सिद्ध करीत जगात आपली ओळख निर्माण करून दाखवली आणि इतकी प्रगती शिक्षणाच्या भरोशावर झाली.जर स्त्री शिकलीच नसती तर प्रगती अशक्य तर होतीच परंतु तिला समाजात जीवन जगणं देखील अशक्य होऊन गेलं असतं.शिक्षण वाघिणीचं दूध आहे,असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं आणि शिक्षणामुळे स्त्री ही वाघीण झाली हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही,म्हणून शिक्षण काळाची गरज आहे.
सावित्रीच्या लेकी झपझप पाऊल पुढे टाकत कधी पुढे निघून गेल्या हे कळलच नाही परंतु ज्या मातेने स्त्रियांसाठी शिक्षणाची गंगा आणली ती माता सावित्रीबाई फुले हिला त्रिवार वंदन.स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता हे अगदी बरोबर आहे.घराला घरपण हा स्त्रीमुळे टिकून आहे ज्या घरात स्त्री नाही त्या घरात थोडंसं डोकावून पहा म्हणजे सहज लक्षात येते.आजची स्त्री शिक्षणाच्या भरोशावर एवढी प्रगती केली स्वतःचा संसार सांभाळून नोकरी वर्गात आणि व्यवसायात स्वतःचा दबदबा निर्माण करीत आपल्या नाजूक पायाला धीर देत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच ती सावित्रीची लेक म्हणून सिद्ध झाली हे सर्वात अभिमानास्पद बाब आहे.
शहरी भागापाटोपाठ ग्रामीण भागात सुद्धा सावित्रीच्या लेकी बचत गटाच्या मार्फत उत्तुंग भरारी घेत आर्थिक प्रगती साध्य करीत देशाला मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.तेही उत्तमरीत्या बचत गटाच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकी सुद्धा महत्त्वाचा कणा म्हणून बँकिंग व्यवहार चांगल्या प्रकारे हाताळत आहेत.आज प्रत्येक खेड्यापाड्यात महिला बचत गटाची स्थापन करून चूक व्यवहाराच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत सामील होत आहेत.
जी सावित्रीची लेक चूल आणि मूल सांभाळत होती ती अभागी लेक आज बँकेत जाऊन आपला व्यवहार चौक सांभाळीत आहे आणि पुरुषाच्या बचत गटापेक्षा महिलांचे बचत गट सक्षम करून आर्थिक प्रगती साधलेली आहे.बचत गटाच्या माध्यमातून भारतात कितीतरी महिला आपला रोजगार निर्माण केलेला आहे अशा पद्धतीने सावित्रीच्या लेकी आम्ही कुठेच कमी नाही हे दाखवून दिले आणि ही बाब अभिमानास्पद आहे म्हणून सावित्रा आईला त्रिवार वंदन मानाचा मुजरा.
इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुभाषग्राम ता. चामोर्शी जि.गडचिरोली येथे गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था गडचिरोली व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने "२२वा स्काऊट गाईड जिल्हा कॅम्प" ची पाहणी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान सोबत आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र धर्मराव बाबा आत्राम यांनी केली. तशेच स्काऊट गाईड विद्यार्थ्यांच्या क्रिया कलापाची पाहणी करुन त्यांचे कडून माहिती घेतली व मार्गदर्शन केले तसेच देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन श्रध्दांजली अर्पण कारण्यांत आली.
यावेळी जिल्हा आयुक्त तथा शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, जिल्हा चिटणीस अमरसिंग गेडाम, सरपंच ग्रामपंचायत सुभाषग्राम कृष्णा मंडल, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, उपाध्यक्ष वन वैभव शिक्षण संस्था अब्दुल हकीम, मुख्यालय आयुक्त स्काऊट गाईड शमशेरखा पठाण, मुख्याध्यापिका हिना हकीम, माजी पंचायत समिती सदस्य दीपक हलदार, विवेक नाकाडे, सौ.लता चौधरी, सौ.हेमलता परसे, सौ. निता आगलावे, कालिदास बनसोड, सौ.कांचन दशमुखे, मनोज निंबार्ते, अजय लोंढे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने स्काऊट गाईड विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
मुंबई: आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांना आश्रमशाळांमधील अधिक्षक आणि स्त्री अधिक्षीकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी निवेदन पाठविण्यात आले आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्य, भोजन, आणि निवास व्यवस्थेची जबाबदारी अधिक्षकांवर असते. परंतु, या कामासाठी ठराविक वेळ निश्चित नसल्याने मानसिक व शारीरिक ताण वाढत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिक्षक व स्त्री अधिक्षीकांना रोटेशन पद्धतीने कामाचे तास निश्चित करावेत, जेणेकरून त्यांना कुटुंबासाठी वेळ देता येईल. याशिवाय, कामाचे तास कमी करण्यासाठी स्वतंत्र पदनिर्मितीची मागणी करण्यात आली आहे.
विभागीय नेत्यांचे सहकार्य:
विभागीय अध्यक्ष श्री. ताडाम, सचिव श्री. बरडे, चंद्रपूर प्रकल्प अध्यक्ष श्री. मुरकुटे, आणि भामरागड/अहेरी प्रकल्प अध्यक्ष श्री. मारकवार यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.
सरकारला विनंती:
मागण्या पूर्ण केल्यास अधिक्षक व स्त्री अधिक्षीकांचा मानसिक ताण कमी होईल आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात वेळेवर बस फेऱ्या केव्हा येणार ; बस आगार व्यवस्थापकडे राहुल वैरागडे यांची मागणी.
चामोर्शी : तालुक्यात गडचिरोली आगारातील बसेस वाघोली, कळमगाव,घारगाव फराळा, वेलतूर तुकूम, बस वेळेत येत नसल्याने. विद्यार्थ्यांचे/विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुस्कान होत असल्याने सदरची बस वेळेत व नियमित लिहावी.याकरिता आग्रा व्यवस्थापक गडचिरोली यांना निवेदनातून म्हटले आहे. महामंडळाच्या बसेस सायंकाळच्या वेळेस उशिरा पोहोचत असतात. मुले विद्यार्थी हे सायकलीने घरी निघून जातात. मुली विद्यार्थिनी ही बसची वाट पाहत असतात. विद्यार्थ्यांची शाळा ही ५:०० सुट्टी होते किंवा शाळेकडून बाहेरगावच्या विद्यार्थिनींना ३० मिनिट पहिले सोडले जाते. तरीपण मुली विद्यार्थिनींना ७:०० वाजेपर्यंत वाट पहावी लागते महामंडळ बसेसच्या वेळापत्रकामध्ये उशीर होत. विद्यार्थिनींना बसेसची वाट पहावी लागते. उचित प्रकार केव्हाही नाकारता येत नाही.
बसेस महामंडळाकडून नियोजित वेळेत सोडावे याकरिता निवेदनातून मागणी करण्यात आली. उपस्थित तेजस कोंडेकर, ओमप्रकाश चौधरी, गंगाधर शेरमाके, राहुल वैरागडे,राहुल भांडेकर, राहुल गुरनुले, महिंद्रा लॉटरी, कर्मचारी वृंद इत्यादी उपस्थित होते.
शालेय क्रीडा स्पर्धेत मार्कंडा कंन्सोबा चे माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयी
आष्टी,
चामोर्शी तालुक्यातील आष्टी केंद्रांतर्गत चौडमपल्ली येथे घेण्यात आलेल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा च्या माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत देयदीपम्यान कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले. या केंद्र स्तरीय झालेल्या व्हाॅलीबाॅल सामन्यात विजेतेपदावर नाव कोरून मार्कंडा कंन्सोबा शाळे च्या विध्यार्थ्यानी यशाला गवसणी घातली. चौडमपल्ली येथे दिनांक 10 ते 11 डिसेंबर रोजी केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा येथील माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयावर नाव कोरले हा सामना ११ डिसेंबर रोजी झाला चुरशीच्या लढतीत विजय मिळविला
शालेय स्तरावर या क्रीडा स्पर्धांना महत्व असते. विध्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरत असतात त्यात मार्कंडा कंन्सोबा शाळेने दमदार कामगिरी बजावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा चौडमपल्ली येथे घेण्यात आल्या.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा च्या विजयी चमूने गावात विजयी रॅली काढून आनंद व्यक्त केला व शाळे च्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. चमू शिक्षक कु. नितीन बहिरेवार, मुरमुरवार, यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुख्याध्यापक बि. टी. घोडाम यांनी अभिनंदन करून मुलांचा उत्साह वाढविला
कुनघाडा (रैयत्तवारी) केंद्रातील नवतळा (तूकुम) येथे केंद्र स्तरीय बाल क्रीडा व कला सम्मेलन
चामोर्शी : पंचायत समिती अंतर्गत कुनघाडा (रैयत्तवारी.) केंद्रातील जि. प. प्राथमिक शाळा नवतळा (तुकुम.) येथे केंद्रस्तरिय बाल क्रीडा व कला सम्मेलन दि. 10, 11 आणि 12 डिसेंबर 2024 ला आयोजित केला आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत लेझीम आणि बँड पथकाचे समूहाणे मोठ्या उत्साहात करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व मशाल पेटवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कुनघाडा केंद्रातील सर्व शाळेतील टीम मान्यवरांना सलामी दिली. स्वागतगीत आणि नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला उदघाटक भाडभीडी ग्रामपंचायतचे सरपंचा सौ. अर्चना रवींद्र मेश्राम, सहउदघाटक जि. प. माजी कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चामोर्शी पं. स. माजी सभापती आनंद भांडेकर विशेष अतिथी पं. स. गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्णे, शि. वि. अधिकारी राजेश कोत्तावार, माजी उपसभापती पं. सं. चामोर्शी बंडू चिळंगे, काँग्रेस उपाध्यक्ष अनिल कोठारे, शा. व्य. स. अध्यक्ष खुशाल कुकडकर नवतळा, पोलीस पाटील सौ मनीषा कुनघाडकर व केंद्रातर्गत येणाऱ्या सर्व जि. प. शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच गावातील गावकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाची फाळणी होत असताना मुस्लिमांनी किती धूर्त डावपेच वापरले आहेत.जे मुस्लीम भारतातून गेले त्यांनी आपली संपत्ती एकतर आपल्या भावांना किंवा बहिणींना दिली किंवा ज्यांना भाऊ-बहीण नाहीत त्यांनी आपली संपत्ती एका साध्या कागदावर लिहून दिले की ही ही संपत्ति आम्ही वक्फला देत आहोत.आणि याच्या उलट पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, सिंधी आणि जैन यांच्या सर्व संपत्ती मुस्लिमांनी ताब्यात घेतल्या.
थोडक्यात काय तर भारतातून जे मुस्लिम पाकिस्तानात गेले, त्यांची संपत्ती मुस्लिमांकडेच राहिली.पण पाकिस्तानातून भारतात आलेल्या सर्व हिंदू, जैन , सिंधी आणि शीखांची संपत्ति मुस्लिमांना मोफत देण्यात आली.
ताजे प्रकरण पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचे उघडकीस आले आहे, तो उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचा रहिवासी होता.कारण मोदी सरकारने शत्रू संपत्ती कायदा लागू केला आहे, एका वकिलाने तक्रार केली की, लियाकत अली खान यांची मालमत्ता, ज्यावर पाच दुकाने आणि एक मोठी मशीद बांधली आहे, ती शत्रू संपत्ती असताना सरकार आपल्या ताब्यात का घेत नाही?
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली असता, सर्व कागदपत्रे तपासली गेली, अखेर ती शत्रू संपत्ती असल्याचे घोषित केले, त्या संपत्ती वर एक मुस्लीम व्यक्ती दुकान चालवत होता व त्याच अस म्हणणं होत की ही संपत्ती वक्फ बोर्डाची आहे, परंतु जेव्हा एखादी मालमत्ता शत्रू संपत्ती असल्याचे घोषित केले जाते तेव्हा ती रिकामी करावी लागते. आणि अखेर ती संपत्ती सरकारने ताब्यात घेतली.
खर तर याचं हिवाळी अधिवेशनात वक्फ बोर्ड सुधारणा कायदा केला जाणारं होता,परंतु सरकारने जी वेळ वाढवून घेतली आहे त्याच कारण असे की वक्फ बोर्ड हिंदुच्या जमिनी तर बळकावत आहेच पण फाळणी वेळी ज्या मुस्लिमांच्या संपत्ती वर वक्फ बोर्ड डल्ला मारून बसले आहे त्या संपत्तीची सुध्दा माहिती घेतली जात आहे.
थोडक्यात १९४७ साला पासूनचे वक्फ बोर्डाचे सगळे रेकॉर्ड चेक करुन ज्या ज्या संपत्ति वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहेत त्या सर्व माघारी घेतल्या जाणार आहेत.
मोदीजींचे खरंच कौतुक वाटते व काँग्रेसने फाळणी पासून जी घाण केली आहे आणि देश स्वतःच्या बापाचा जहागीर असल्या सारखा हिंदुच्या संपत्ती मुस्लिमांच्या घशात घातल्या आहेत त्या सगळ्या माघारी घेतल्या जाणार आहेत, २०१४ सालचे मोदीजींचे एक वाक्य आठवले, "ना खाउंगा ना खाने दुंगा" आणि त्या वाक्याचा अर्थ आता कळत आहे की ज्यांनी ज्यांनी खाल्ल आहे त्यांच्या घशात हात घालुन ते सुध्दा बाहेर काढले जाणार आहे.
सोशल मीडिया पर आठवें वेतन आयोग का मुद्दा अभी काफी चर्चाओं में चल रहा है क्योंकि अब बहुत ही जल्द ही देश में केंद्र सरकार एवं वित्तीय विभाग के द्वारा आठवें वेतन आयोग को लागू करने के विचार सामने आ रहे हैं। देश भर में इस मुद्दे पर अलग-अलग प्रकार की प्रतिक्रियाएं देखने को मिल रही है।
इन्हीं प्रतिक्रिया के बीच कर्मचारी भी काफी दुविधा ग्रस्त है तथा यह सुनिश्चित जानकारी प्राप्त करना चाहते हैं कि आठवें वेतन आयोग के लिए किस प्रकार बैठक की जाएगी तथा इस प्रकार से इस वेतन आयोग में वेतनमान में बदलाव देखने को मिलेंगे।
इस आर्टिकल के माध्यम से आज हम सभी कर्मचारियों तथा पेंशन धारकों के लिए आठवे वेतन आयोग की कुछ अपेक्षित तिथियां के बारे में बात करने वाले हैं तथा हम यह भी बताएंगे कि देश में पुष्टिकृत रूप से आठवां वेतन आयोग कब तक लागू किया जा सकता है।
8th Pay Commission
देश के कर्मचारियों तथा पेंशन धारकों के बीच आठवें वेतन आयोग की आवश्यकता बहुत ही विशेष रूप से दिखाई दे रही है क्योंकि कर्मचारियों की निरंतर मांगे एवं केंद्र सरकार के प्रति उनके आवेदन इस बात का स्पष्ट सबूत है।
वेतन आयोग के प्रति सरकार के जो नियम कानून है उसी प्रकार से अगला वेतनमान यानी आठवां वेतन आयोग लागू होगा अर्थात वर्ष 2016 के सातवें वेतन आयोग के बाद अब वर्ष 2026 में ही आठवां वेतन आयोग सामने आ पाएगा।
आठवे वेतन आयोग लागू होने8th Pay Commission के फायदे
अगर देश में आठवां वेतन आयोग लागू हो जाता है तो कर्मचारियों तथा पेंशन धारकों के लिए निम्न फायदे होंगे :-
-आठवे वेतन आयोग लागू होने पर केंद्रीय कर्मचारियों के वेतनमान में 92% तक का इजाफा किया जाएगा।
- इस वृद्धि के साथ पेंशन धारकों की पेंशन में भी आश्चर्यजनक परिवर्तन देखने को मिलेंगे।
- कर्मचारियों तथा पेंशन धारकों के लिए देश की बढ़ती इस महंगाई में काफी राहत मिलेगी।
-अब वे अधिक वेतनमान की सहायता से अपने दैनिक खर्च को बहुत ही आराम के साथ पूरा कर सकेंगे।
आठवे वेतन आयोग की जानकारी
केंद्र सरकार के द्वारा अक्टूबर 2024 में आठवे वेतन आयोग की चर्चाओं के लिए कैबिनेट बैठकों का आयोजन किया गया है जिसमें कर्मचारियों की सैलरी की बढ़ोतरी के साथ आठवे वेतन आयोग लागू होने के लिए मुख्य कार्य विधि तथा तिथियां पर भी चर्चा की गई है। इन बैठकों के दौरान देश के सभी राज्यों के वेतनमान को सुनिश्चित किया जाएगा।
इतने दिनों बाद होगा आठवां वेतन आयोग लागू
जैसा कि हमने पहले ही बताया है कि केंद्र सरकार के द्वारा 10 वर्ष में वेतन आयोग लागू होता है। इस नियम के अनुरूप वर्ष 2026 के शुरुआती महीने यानी जनवरी में ही आठवीं वेतन आयोग को लागू कर दिया जाएगा।आठवे वेतन आयोग का इंतजार कर रहे कर्मचारियों तथा पेंशन धारकों के लिए अभी 1 वर्ष तक का इंतजार और करना पड़ सकता है।
SSC HSC Time Table: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी (10वी) आणि बारावी (12वी) बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी ही एक महत्त्वाची माहिती आहे, कारण यामुळे आगामी परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या सर्व तपशीलांचा स्पष्ट आढावा मिळेल.
बारावीच्या लेखी परीक्षेला 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2024 दरम्यान आयोजित केले जाईल, तर दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2024 दरम्यान होईल. यंदा, अन्य वर्षांच्या तुलनेत, परीक्षेच्या तारखा सुमारे 8 ते 10 दिवस लवकर असणार आहेत.
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन, mahahsscboard.in वर विद्यार्थी या वेळापत्रकाची PDF डाउनलोड करू शकतात.
गडचिरोली :-निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा सुरू होईल. तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. याबरोबरच इयत्ता बारावी व्होकेशनल अभ्यासक्रमासाठीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येईल.दरम्यान, सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या https://mahahsscboard.in/mr या अधिकृत संकेतस्थळावर आजपासून पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
School Holiday News: राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून, 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. या निमित्ताने राज्यभर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना 18, 19 आणि 20 नोव्हेंबर या तीन दिवस सुट्टी लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत शालेय शिक्षण विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे की, 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी घोषित करण्यात आलेली नाही. सर्व शाळा नियमित सुरू राहतील. या संदर्भात शिक्षण विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट निर्देश दिले आहेत.
शिक्षण विभागाच्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, "ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणुकीसाठी करण्यात आली आहे आणि त्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपस्थित राहू शकणार नाही, अशा शाळांसाठी स्थानिक पातळीवर मुख्याध्यापकांना सुट्टी घोषित करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, अशा शाळा वगळता इतर सर्व शाळा नेहमीप्रमाणे सुरू राहतील."
20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी शाळा बंद असतील, कारण त्या दिवशी मतदान केंद्रे शाळांमध्येच असतील.
यामुळे पालकांनी 18 आणि 19 नोव्हेंबरच्या सुट्टीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
Diwali Holidays 2024: दिवाळीचा सण सुरू झाला आहे, आणि याचा आनंद सर्वत्र पसरला आहे. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि उत्सवमय सण आहे, जो भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. याच काळात विद्यार्थ्यांना जास्त सुट्ट्या मिळतात, त्यामुळे त्यांच्यात विशेष उत्साह पाहायला मिळतो.
देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिवाळीला शाळा-कॉलेजसह ऑफिससुद्धा बंद असतात. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली यांसारख्या राज्यांमध्ये दिवाळीसाठी 4-5 दिवसांची सुट्टी असते, तर काही राज्यांमध्ये केवळ एकच दिवस सुट्टी दिली जाते. मात्र, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी यावर्षीच्या दिवाळीत जास्त दिवसांची सुट्टी असल्याने त्यांना विशेष आनंद आहे.
महाराष्ट्रातील काही शाळांना दिवाळीनंतर 31 ऑक्टोबरपासून सुट्टीची सुरुवात होणार आहे. काही जण दिवाळीचा मुख्य सण 1 नोव्हेंबरला साजरा करतात, त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक शाळांना 1 नोव्हेंबरपासून सुट्टी मिळेल. यावर्षी महाराष्ट्रातील शाळांना एकूण 14 दिवसांची मोठी सुट्टी मिळणार आहे. या काळात शिक्षकांना विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे कार्य दिलेले आहे.
सुट्टीनंतर महाराष्ट्रातील शाळा 12 नोव्हेंबरपासून सुरु होतील, तर काही प्राथमिक शाळा 16 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांसाठी दिवाळी सणाचा आनंद मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.