PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday   

PostImage

आमदार रामदास मसराम यांची जिल्हाधिकारी यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा


हर्ष साखरे विदर्भ फायर न्यूज संपादक 9518913059

आज दिनांक 14 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार रामदास मसराम यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, जिल्ह्यातील महत्त्वाचे विषय आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

या चर्चेमध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:

 

ग्रामीण भागातील नागरिकांना जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट सोलर तार फेंसिंग देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली

 

घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या रेतीपुरवठ्यावर चालू असलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदारांनी केली. यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या बांधकामाचे काम वेळेत पूर्ण करता येईल.

 

जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व रोजगार निर्मिती यांसारख्या मूलभूत सुविधांच्या सुधारणेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

 

या भेटीदरम्यान, जिल्ह्यातील प्रशासनाने सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.

 

आमदार रामदास मसराम यांनी या चर्चेतून जिल्ह्यातील समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 12, 2025   

PostImage

राज्यात मदिरा महागणार , मदिरा प्रेमींसाठी वाइट बातमी


राज्यात मदिरा  महागणार , मदिरा प्रेमींसाठी वाइट बातमी 

 

मुंबई:-
मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी समोर येत आहे. आता राज्य सरकार दारूच्या किमतीत वाढ करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार दारूच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे. दारूपासून उत्पन्न कसे वाढवता येईल याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जनतेला अनेक लोकप्रिय आश्वासने दिली आहेत, ज्यांची अंमलबजावणी जमिनीवर करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. हे लागू केल्याने सरकारी तिजोरीवर मोठा भार पडेल. हा भार कमी करण्यासाठी सरकार दारूवरील कर वाढवण्याची तयारी करत आहे.


५ सदस्यीय समितीची स्थापना

महाराष्ट्र सरकारने दारूपासून उत्पन्न कसे वाढवायचे हे शोधण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती दारूचे उत्पादन आणि विक्रीच्या शक्यतेचा अभ्यास करेल. गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये वित्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, राज्य जीएसटी आयुक्त आणि उत्पादन शुल्क आयुक्त हे समितीचे सदस्य आहेत. या समितीला दारूचे उत्पादन वाढवण्याचे, नवीन दारू परवाने देण्याचे आणि महसूल वाढवण्याच्या इतर मार्गांचा अभ्यास करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. राज्याच्या महसुलात वाढ करण्याची शिफारस समिती करू शकते अशी अपेक्षा आहे.

सरकारला पैशांची गरज

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी, राजकीय पक्षांनी लाडकी बहिण योजनेची मदत रक्कम वाढवणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे, मोफत वीज देणे इत्यादी अनेक लोकप्रिय आश्वासने दिली होती. आता हे करण्यासाठी सरकारला पैशांची गरज आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडू नये म्हणून, सरकार येत्या काळात दारूच्या किमती वाढवून आपले उत्पन्न वाढवेल.


आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच कर्जमाफी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिक राव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली किंवा वाईट नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय सहकार विभागाच्या अखत्यारीत येतो. ही यादी फक्त सहकार विभागामार्फत मागवली जाते. आमच्या कृषी विभागाकडे ते काम नाही, पण तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. सध्या माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ४ ते ६ महिन्यांत निर्णय घेतला जाईल.

शेतकरी कर्जमाफी रखडली आहे का?

लाडकी बहिण योजनेमुळे आर्थिक भार वाढला आहे, असेही कृषीमंत्री कोकाटे म्हणाले. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी थोडेसे अधिशेष निर्माण करणे शक्य नाही. यासाठी आपण थोडे पुढे-मागे करत आहोत. आम्ही एक दिवस शेतकऱ्यांबाबत निर्णय घेऊ.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 12, 2025   

PostImage

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा


अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा 

 


गडचिरोली- अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक चांदेकर भवन येथे नुकतीच पार पडली.
    पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुरेखाताई बारसागडे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, विधान सभा अध्यक्ष प्रदीप भैसारे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे , जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे हे प्रामुख्याने हजर होते.
    या बैठकीत पक्ष संघटना व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली व संगठन बांधणीचा कार्यक्रम ठरविण्यात आला. आगामी निवडणुका पक्षातर्फे लढविण्यासाठी बरेच उमेदवार इच्छुक असल्याने संबंधीत क्षेत्रात जनसंपर्क वाढवून संगठन अधिक मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
   लवकरच जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा सुद्धा घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.  रिपब्लिकन पक्ष हा दलित आदिवासी व गोरगरीब लोकांसाठी लढणारा पक्ष असल्याने जास्तीती जास्त लोकांना पक्षात सहभागी करून त्यांच्या हक्क व अधिकारांसाठी संघर्ष सुरु ठेवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
    रिपब्लिकन पक्ष आज गटातटात विखुरलेला असला तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय आंदोलनाची व विचारधारेची खरी ओळख हाच पक्ष आहे आणि म्हणून तीच आंबेडकरी   लोकांची पहिली पसंती असल्याचे प्रतिपादन रोहिदास राऊत यांनी यावेळी बोलताना केले व हा पक्ष अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. 
   बैठकीला कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, तालुका अध्यक्ष पुंजाराम जांभूळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते पुण्यवान सोरते, सिद्धार्थ खोब्रागडे, विजय देवतळे महिला आघाडी शहर अध्यक्ष वनमाला झाडे, चंद्रभान राऊत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 11, 2025   

PostImage

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार ?


राज्याच्या राजकारणात काधी उलटा पालट होईल ह, कधी सांगताच येणार नाही.म्हणून राजकारणात कुणी कुणाचे शत्रू नाही आणि कोणी कोणाचे मित्रही नाही.परंतु शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आता भाजपासोबत जाणार आणि मंत्रिमंडळात सामील होणार आहेत,खरं तर या लोकांना सत्ते शिवाय राहावं न होत नाही आणि उद्धव ठाकरेचे खरे अस्तित्व आता संपल्यात जमा आहेत.म्हणजे उबाटा सेनेचे कंबरडे आजच्या घडीला मोडलेले आहेत हा पहिला मुद्दा आहे.

 माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबळ राज्यात वाढताना दिसतो आहे,त्यामुळे भाजपाची डोकेदुखी समोर वाढण्याचे चिन्ह दिसत आहेत.म्हणून एकनाथ शिंदेचे पंख छाटून भाजपा उद्धव ठाकरेंना आपल्या सोबत घेण्याच्या तयारीत आहे हा दुसरा मुद्दा आहे.समोर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ती निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून,उबाटा स्वबळावर निवडणूक जिंकू शकणार नाही आणि महाविकास आघाडी संपल्यात जमा आहे,म्हणून उद्धव ठाकरेंना आता भाजपाची गरज आहे आणि तशी लूट बूट सुरू झालेली आहे हा तिसरा मुद्दा आहे.

राज्यात भाजपाची परिस्थिती जरी भक्कम असली तरी केंद्र सरकार अनेक पक्षाच्या कुबड्या घेऊन उभा आहे.नितेश कुमार आणि चंद्राबाबू यांच्यावर भाजपाचा भरोसा कमी आहे उद्या कदाचित त्यांनी आपला पाठिंबा काढून घेतला तर केंद्र सरकार अडचणीत येऊ शकतो आणि उद्धव ठाकरे कडे आजच्या घडीला नऊ खासदार आहेत,म्हणून भाजपाला सुद्धा उबाटाची गरज आहे हा चौथा मुद्दा आहे.

 

Caption

राज्यातील महाविकास आघाडी आता संपल्यात जमा आहे आणि उद्धव ठाकरे भाजपाकडे आले तर शरद पवार देखील सत्त्ते शिवाय राहू शकत नाही हा पूर्वीचा इतिहास आहे आणि पवार गटाचे सात खासदार आहेत आणि त्यांना देखील गळ्याला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.म्हणजे शरद पवार देखील भाजपात आल्याशिवाय पर्याय उरणार नाही हा पाचवा मुद्दा आहे.

 उद्धव ठाकरेचे अस्तित्व संपल्यात जमा आहे.भाजपा राज्यात अव्वल असली तरी केंद्रात मात्र खिडकी आहे म्हणजे उद्धवाला भाजपाची गरज आहे तर दुसरीकडे भाजपाला उद्धवाची गरज आहे म्हणजे एकूणच परिस्थिती तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी झालेली आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 9, 2025   

PostImage

छत्तीसगड येथील पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर …


 

गडचिरोली:  जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा. गडचिरोली - NDTV व बस्तर जॅक्शन चे पत्रकार मुकेश चंद्रकार छत्तीसगड यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकरांना फाशिची शिक्षा देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्हयात रेती , मुरूम माफीया , दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसेच जिल्ह्यातील पत्रकार हे वृत्तांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात. मुकेश चंद्राकार यांची पुर्नरावृत्ती गडचिरोली जिल्हयात होवू नये .महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र. १९ दिनांक ८ / १० / २०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदि मागण्याकरीता गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून जिल्ह्याधिकारी अविशांत पडां व जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल यांना मागण्याचे निवेदन यांच्या मार्फतीने देशाचे महामहिम राष्ट्रपती महोदया , पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा ,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री छत्तीसगड , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस आदिना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

 

 

सदर मोर्च्यात पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर , व्येंकटेश दुडमवार , लोकमत पत्रकार संजय टिपाले , सुरेश पद्मशाली , मुकुंद जोशी , उदय धक्काते , हेमंत डोर्लीकर , प्रल्हाद म्हशाखेत्री ,प्रकाश ताकसांडे , प्रकाश दुबे 'जगदिश कन्नाके , मारोती भैसारे ' विलास ढोरे , सुरज हजारे 'राजरतन मेश्राम , प्रा. दिलीप कवरके , नाशिर जुम्मनशेख , हेमंत दुनेदार ' महेश सचदेव ,कैलास शर्मा 'दिनेश बनकर , कृष्णा वाघाडे,हस्ते भगत , नशिर शेख , भाविकदास कळमकर , मुकेश हजारे , संदिप कांबळे , विनोद कुळवे , किशोर खेवले , सोमनाथ उईके ' निलेश सातपुते , श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे ,जयंत निमगडे ' हर्ष साखरे , कबिर निकुरे , प्रमोद राऊत , विजय शेडमाके , टावर मडावी , उमेश ग जलपल्लीवार , पुंडलिक भांडेकर ,अनुप मेश्राम , श्रावण वाकोडे , कालिदास बुरांडे , धनराज वासेकर , विलास वाळके. 'गोर्वधन गोटाफोटे , रवि मंडावार , राजेश खोब्रागडे 'चोखोबा ढवळे 'सतिस ढेभुर्णे 'गेडाम , धम्मपाल दुधे ' नाजुक भैसारे , रेखाताई वंजारी , विजयाताई इंगळे , तिलोतमा हाजरा आदि साहित जिल्हयातील 150 पत्रकार उपस्थित होते.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 9, 2025   

PostImage

आमदार मसराम यांचा एक कॉल आणि समस्या दूर


कुरखेडा तालुक्यातील घरकुल बांधकामासाठी रेती वितरणाचा कालावधी वाढवला

 

कुरखेडा तालुक्यात घरकुल बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या रेतीचे वितरण तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते. मात्र, या वितरणासाठी सुरुवातीला केवळ तीन दिवसांचा कालावधी ठरविण्यात आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेत रेती मिळविणे अवघड झाले होते.

 

दरम्यान, या संदर्भात आलेल्या तक्रारींवरून गडचिरोली जिल्ह्याचे आमदार रामदास मसराम यांनी तत्काळ लक्ष घातले. त्यांनी तहसीलदार कार्यालयाशी थेट संवाद साधत रेती वितरणाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. आमदारांच्या हस्तक्षेपामुळे आता रेती वितरणाचा कालावधी तीन दिवसांवरून सर्व घरकुलधारकांना वितरण होण्यापर्यंत वाढविण्यात आला आहे.

 

रेती वितरणाचा कालावधी वाढल्यामुळे घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढीव कालावधीत जास्तीत जास्त गरजूंना रेती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांनी आमदार मसराम यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाचे कौतुक केले आहे.

 

याआधी कमी कालावधीत वितरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती, आणि लाभार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता व्यवस्थापनासाठी अधिक चांगली योजना आखण्यात येणार आहे. तहसीलदारांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवत लाभार्थ्यांसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

कुरखेडा तालुक्यातील या सकारात्मक घडामोडीमुळे इतर गावांमधील गरजूंनाही याचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 8, 2025   

PostImage

भीमशक्ती महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी : पद्मिनी शेवडे


भीमशक्ती महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी : पद्मिनी शेवडे

 सोलापूर :-काँग्रेस (i)पक्षाचे राष्ट्रीय नेते  व राज्यसभेचे विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी भीम सैनिकांच्या डॅशिंग नेत्या पद्मिनी वरिष्ठराव शेवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 परवा सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नागनाथ बंगाळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड घोषित करण्यात आली.
 शेवडे ह्या आंबेडकरी चळवळीतील आघाडीच्या कार्यकर्त्यां असून विविध आंदोलनात सहभाग नोंदवून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.
  यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद (नाना )प्रेक्षाळे, समता सैनिक दलाच्या वैशाली उबाळे,नंदा चव्हाण सामाजिक कार्यकर्ते विलास सरवदे व लहुजी शक्ती सेनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राहुल मस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 निवडीनंतर बोलताना शेवडे म्हणाल्या की माननीय हंडोरे साहेबांच्या नेतृत्वाशिवाय बहुजन समाजाला पर्याय नसून भीम शक्ती च्या माध्यमातून उपेक्षीताना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असून कामाच्या माध्यमातून आपण  संघटना बांधणी करणार आहे.
शेवडे यांची कर्मभूमी जरी मुबई असली तरी त्यांचे जन्म भूमी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही आहे. त्यांच्या निवडीचे समाजातील विविध स्तरातून स्वागत होत आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 5, 2025   

PostImage

विजय वडेट्टीवारचे भाकीत खरे ठरणार ?


राज्यातील जवळपास १३ कोटी जनतेने महायुतीच्या बाजूने कौल देत नव्या सरकारचे गटन झाले आणि नवे नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यात जे काही प्रकरणे उजेडात आले,त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरले.

मस्साजोग येतील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यात जास्तच चर्चेचा विषय ठरला आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव संतोष देशमुख हत्याकांडात प्रामुख्याने जोडल्या गेला.

अजित पवारांनी साधलेली चूप्पी बरच काही सांगून जाते.त्यावर राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाकीत वर्तविला होता की,राज्यातील मंत्रिमंडळात उलथापालथ अटळ आहे. खरं तर आधी धनंजय मुंडे कडे असलेले मंत्रीपद काढून तेच मंत्रिपथ राज्याचे वजनदार नेते माननीय छगन भुजबळ यांच्याकडे सोपविण्यात येणार आणि हेच भाकीत खरं होताना दिसतो आहे.

 मला मंत्रिमंडळातून का वगळण्यात आले याच्यामुळे छगन भुजबळ आत्मचिंतन करून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती.म्हणजे सरळ सरळ छगन भुजबळ नाराज होते,आता राज्यातील समीकरण नव्याने बदलत असून वरिष्ठांची मनमर्जी जर चुपी साधत असेल तर मात्र मंत्री धनंजय मुंडे यांची जागा छगन भुजबळ यांची वर्णी लागू शकते,म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला असं भुजबळाच्या बाबतीत घडून येताना दिसतो आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 4, 2025   

PostImage

पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री विष्णू …


विजापूर : मुकेश चंद्राकर या छत्तीसगडमधील तरुण पत्रकाराच्या हत्येने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुकेशचा मृतदेह एका कंत्राटदाराच्या घराच्या सेप्टिक टॅंकमध्ये ३ जानेवारी रोजी सापडला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. सेप्टिक टॅंक पूर्णपणे काँक्रीटने झाकलेली होती, ज्यावरून पत्रकाराचा मृतदेह लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

 

 

पोलिसांकडून तपास सुरू होता

पत्रकार बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनीही मुकेशला लवकरात लवकर शोधण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी सतत मुकेशचा शोध घेत होती. अखेर मुकेशच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या घराजवळ सापडले. यानंतर पोलिसांनी ठेकेदाराच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घरातील सेप्टिक टँकमध्ये मुकेशचा मृतदेह आढळून आला.

 

कंत्राटदार यापूर्वी एसपीओ होता

मुकेशच्या कुटुंबीयांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक तरुणा मुकेशला घरातून बोलवत आपल्यासोबत घेऊन गेला होता. आणि तेव्हापासून मुकेशचा मोबाईल बंद होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेशला घेऊन गेलेला तरुण सध्या दिल्लीत आहे. मुकेश आणि कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्यात रस्ता बांधकामातील भ्रष्टाचारावरून खडाजंगी झाल्याची माहिती आहे. मुकेश यांनी कंत्राटदाराच्या विरोधात भ्रष्टाचाराचे वृत्त प्रसिद्ध केले होते, ज्यामुळे ठेकेदार त्याच्यावर नाराज झाला होता. सुरेश चंद्राकर हे यापूर्वी एसपीओ होते. शिवाय लग्नाची मिरवणूक हेलिकॉप्टरने नेल्यानेही ते चर्चेत होते.

 

कंत्राटदारावर खुनाचा संशय

पूर्व वैमनस्यातून कंत्राटदार सुरेश चंद्राकर याने मुकेशची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. कंत्राटदार सुरेश चंद्राकर सध्या संपूर्ण कुटुंबासह फरार आहे. त्याचा धाकटा भाऊ रितेश चंद्राकर दिल्लीला पळून गेला आहे. त्यांची कार रायपूर विमानतळावर उभी असलेली आढळून आली. मात्र, पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांच्या धाकट्या भावाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांनाही ताब्यात घेतल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

 

 

मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही; मुख्यमंत्री विष्णू देव साई 

 

विष्णू देव साई म्हणाले, विजापूर येथील तरुण आणि पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता जगताची आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. या दु:खाच्या प्रसंगी मृत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल परिवारास बळ देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 

 

 

पोलिसांकडून 12 हून अधिक जणांची चौकशी 

 

पत्रकार मुकेश चंद्राकर 1 जानेवारीपासून बेपत्ता होते, दरम्यान, आता त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. चंद्राकर यांचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळून आला. एनडीटीव्हीसाठी काम करणारे स्वतंत्र पत्रकार मुकेश चंद्राकर हे भ्रष्टाचार उघड करणाऱ्या वृत्तांसाठी प्रसिद्ध होते. मुकेश चंद्राकर यांच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनजवळ असलेल्या एका बंदिस्थपणे बांधलेल्या सेप्टिक टाकीत मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलीस या प्रकरणातील बाराहून अधिक संशयितांची चौकशी करत आहेत.


PostImage

Zadipatti VC News and Business

Jan. 3, 2025   

PostImage

मा.खा.अशोकजी नेते यांच्याकडून गडचिरोलीचे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अविशांत पांडा …


मा.खा.अशोकजी नेते यांच्याकडून गडचिरोलीचे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे स्वागत

दिनांक: ०३ जानेवारी २०२४

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या भेटीदरम्यान, अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली. गडचिरोलीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सखोल विचार विनिमय करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांचीही उपस्थिती होती. या भेटीने जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशानिर्देश निश्चित होण्याची अपेक्षा आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Jan. 2, 2025   

PostImage

सिरोंचा येथे भाजपा सदस्य नोंदणी कार्यशाळा


दिं.०१ जानेवारी २०२५

सिरोंचा येथे भाजपा सदस्य नोंदणी कार्यशाळेला आले असता यावेळी मा. खा. अशोकजी नेते यांचा चेनूर तेलंगणा येथे सत्कार करण्यात आले.

चेनूर, तेलंगणा -भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा  माजी खासदार अशोकजी नेते यांचा चेनूर येथील न.प.चे चेअरमन नवाज उद्दीन साहेब यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांसह भव्य सत्कार करण्यात आले.

 या प्रसंगी उद्या, दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी सिरोंचा येथे होणाऱ्या भाजपा सदस्य नोंदणी मोहिमेची व कार्यशाळेत येण्याची ही  घोषणा याप्रसंगी करण्यात आली.

यावेळी  जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला, चेनूर न.प.चे चेअरमन नवाज उद्दीन, माजी सरपंच सादनबोईन कृष्णा,भाजपाचे युवा नेते शारिक भाई तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 1, 2025   

PostImage

तर मग विजय वड्डेट्टीवारांचे ते आरोप बिन बुडाचे !


बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड्यात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मीक कराड यांच्यावर आरोप करण्यात आला आणि वाल्मीक कराड स्वतः पुणे येथे पोलिसांसमोर शरांगती पत्करले.

 संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी नष्ट केले आणि नंतरच वाल्मीक कराड आत्मसमर्पण केले असा आरोप राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला मग वडेट्टीवार यांच्या आरोपात तथ्य आहे काय ? किंवा वडेट्टीवार यांचे आरोप बिन बुडाचे आहेत काय ?तर मग या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हायला पाहिजे तरच आरोपात तथ्य आहे.

तरच सत्य जनतेसमोर येईल आणि तपास योग्य रीतीने झाला नाही तर सत्य जनतेसमोर येणार नाही.सत्य समोर यायलाच पाहिजे कारण राज्यात दिवसा ढवळे होणारे हत्याकांड यावर आळा बसेल की नाही तर असले प्रकार दिवसेंदिवस वाढत जाणारेच ठरणार आहेत का,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 शेळी जाते जीवाशी अन खाणारा म्हणतो वातड असल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊन राज्यात जाती-जातीमध्ये मतभेद निर्माण होऊन दंगली घडायला फारसा वेळ लागणार नाही.मग एक दिवस महाराष्ट्र देखील युपी बिहार युपी बिहार या राज्याशी तुलना होण्यास विलंब लागणार नाही महत्त्वाचं कारण हेच आहे की अशा पद्धतीने खून दरोडे बलात्कार होत राहिले तर नीर अपराध लोकांना नाहक आपला जीव गमवावा लागेल आणि तसं झालं तर फक्त पश्चातापाशीवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नसेल.

|| तुका म्हणे उभे रहा,जे जे होते ते ते पहा ||


PostImage

Zadipatti VC News and Business

Dec. 31, 2024   

PostImage

मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीसांचा गडचिरोली दौरा: कोनसरीत विविध विकास प्रकल्पांचे …


दि. ३१ डिसेंबर २०२४

गडचिरोली: राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस नववर्ष २०२५ च्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्रीपदी नव्याने विराजमान झाल्यानंतर हा त्यांचा पहिला दौरा असून जिल्ह्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लॉयड्स मेटल्सच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भाजपचे अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि माजी खासदार मा.खा. अशोकजी नेते यांनी आज कोनसरी येथे भेट देऊन तयारीची पाहणी केली.

यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये आ. डॉ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, प्र.का. सदस्य रविंद्र ओल्लालवार, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, कि.मो.आ. जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मो.जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, प्रकाश दत्ता,भाष्कर बुरे, तसेच लॉयड्स मेटल्सचे एमडी बी. प्रभाकरन आणि इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणारे प्रकल्प:

लॉयड्स डीआरआय प्लांट

लॉयड्स राज विद्या निकेतन (सीबीएसई शाळा)

लॉयड्स काली अम्माल मेमोरिअल हॉस्पिटल

लॉयड्स वन्या क्लोदिंग कंपनी

फॅमिली क्वार्टर्स आणि पोलीस ऑफिसर्स फॅमिली क्वार्टर्स

जिमखाना आणि बालोद्यान


तसेच यावेळी स्लरी पाईपलाईन, पेलेट प्लांट आणि आयरन ओर ग्राइंडिंग युनिटच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही होणार आहे.

गडचिरोलीतील हा दौरा जिल्ह्याच्या विकासामध्ये एक नवा अध्याय लिहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Dec. 29, 2024   

PostImage

संघटन बळकटीसाठी मा.खा.अशोकजी नेते यांचे चामोर्शीतील कार्यशाळेला मार्गदर्शन


दिनांक: २९ डिसेंबर २०२४

चामोर्शी: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सदस्य नोंदणी मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी चामोर्शी तालुका ग्रामीण व शहर शाखेच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 

आज रवीवार, दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी भाजप कार्यालय, चामोर्शी येथे झालेल्या या कार्यशाळेचा उद्देश नव्या सदस्यांना पक्षाच्या विचारसरणीशी परिचित करून देणे व अभियानाला गती देणे हा होता.

कार्यशाळेचे उद्घाटन भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले, “सदस्य नोंदणी अभियान ही भाजपसाठी फक्त संख्या वाढवण्याची प्रक्रिया नसून ती पक्षाच्या मूलभूत तत्त्वांना दृढ करण्याची संधी आहे. नवीन सदस्यांना पक्षाच्या कार्यपद्धती व विचारांची सखोल माहिती देऊन त्यांना पक्षाशी जोडणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे.”

तसेच, अभियानाला अधिक गती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत झोकून देऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेत प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, ज्येष्ठ नेते मनमोहन बंडावार, भाजयुमो जिल्हा महामंत्री मधूकर भांडेकर, तालुका महामंत्री विनोद गौरकर, विष्णु ढाली, संजय खेडेकर, शहर महामंत्री नरेश अलसावार, आदिवासी जिल्हा महामंत्री रेवनाथ कुसराम, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे आदींचा समावेश होता.

कार्यशाळेने चामोर्शी शहर व ग्रामीण भागातील संघटनात्मक कार्याला नवीन उर्जा देऊन सदस्य नोंदणी मोहिमेला अधिक बळकटी मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने व उर्जेने परिपूर्ण अशा या कार्यशाळेने भाजपच्या संघटनात्मक व सामाजिक बांधिलकीची नवी दिशा दाखवली.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Dec. 27, 2024   

PostImage

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी दुःखद …


Manmohan Singh: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. भारतात अर्थक्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या डॉ. सिंग यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे.

 

 

२००४ साली मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना ‘ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ म्हटले गेले. परंतु एरवी गप्प राहणाऱ्या डॉ. सिंग यांनी ते एक सर्वोत्तम पंतप्रधान होते याची नोंद इतिहासात केली. मनमोहन सिंग यांनी केवळ देशाच्या आर्थिक उन्नतीवर लक्ष केंद्रित केले नाही, तर त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षेच्या अनेक योजना कालजयी ठरल्या. देशाला विकासाच्या रस्त्यावर पुढे घेऊन जाईल, असे महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण, हे ते जाणून होते, म्हणून त्यांनी सहा ते चौदा या वयोगटातल्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मौलिक अधिकार मिळवून दिला. सर्व काही पारदर्शक असेल तर लोकशाही मजबूत होईल, असा त्यांचा विश्वास होता; म्हणून त्यांच्या सरकारने सामान्य माणसाला माहितीचा अधिकार दिला.

 

कोणी भूकबळी ठरू नये यासाठी खाद्यसुरक्षा कायदा त्यांनी केला. भूसंपादन कायदा तसेच वनअधिकार कायदा ही सुद्धा त्यांच्या कार्यकाळाची देणगी आहे. प्रत्येक ग्रामीण परिवाराला वर्षातून कमीत कमी १०० दिवस काम देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम त्यांच्या सरकारने आणला. त्यालाच आता मनरेगा या नावाने ओळखले जाते. जगातली ही अनोखी अशी रोजगार योजना आहे. गर्भावस्थेपासून माता आणि बाळाची काळजी घेणारी इंदिरा गांधी मातृत्व योजना त्यांनी आणली. आर्थिक मदत आणि अन्य सामुग्रीची व्यवस्था त्यातून केली गेली. 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Dec. 27, 2024   

PostImage

देशाच्या संविधानाला भाजपाकडून सुरुंग काँग्रेसच्या कार्यसमितीत खर्गेचा घणाघात


 

दिल्ली, कर्नाटकातील बेळगाव येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला काँग्रेसने नव-सत्याग्रह बैठक असे नाव दिले असून, संविधानाच्या मुद्यावरून भाजपविरोधातील हल्लाबोल आणि प्रचार सुरूच राहणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजपच्या राजवटीत संविधान संकटात आहे. भाजप देशातील सर्व घटनात्मक संस्था नष्ट करत आहे. मात्र, काँग्रेसचे संविधान आणि या संस्था वाचवण्याचा संघर्ष शेवटच्या खासदारापर्यंत सुरू राहणार आहे. खर्गे म्हणाले की, त्यांना गांधी-नेहरूंचा वारसा आहे. काँग्रेस आपला प्रचार सुरूच ठेवणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या या बैठकीला खर्गे यांच्यासह काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील २०० प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यामुळे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी या कार्यक्रमाला हजर राहिल्या नाहीत. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीही या बैठकीला हजर राहिल्या नाहीत.

 

नकाशावरून वाद

 

येथे उभारण्यात आलेल्या पोस्टरवर असलेल्या भारताच्या नकाशावरून वाद निर्माण झाला आहे. हा नकाशा काँग्रेसने तयार केल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यात काश्मीरचा भाग कापलेला दाखविण्यात आला आहे. यामध्ये अक्साई चीन आणि पाकव्याप्त काश्मीर दाखवण्यात आलेले नाही. यावरून काँग्रेस देशाच्या अखंडतेला प्राधान्य देण्याऐवजी तुष्टीकरणाला महत्त्व देते हे स्पष्ट होते. भाजपचे राज्यसभा सदस्य सुंधाशु त्रिवेदी म्हणाले की, काँग्रेस किंवा त्यांच्या नेत्यांनी चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

 

निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे

भाजपला सर्व घटनात्मक संस्था काबीज करायच्या आहेत, असे खर्गे म्हणाले. ज्याप्रकारे त्यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. या सरकारला सर्व घटनात्मक संस्थांवर एकसारखे वर्चस्व हवे आहे. जे कोर्टाने सांगितले आहे ते सांगितले पाहिजे. ते म्हणाले की, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास हळूहळू कमी होत आहे.