◾स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने गोपनीय सापळा कारवाई करत आरोपीकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त केले
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक 28/08/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने पोलीस स्टेशन रामनगर अपराधी क्र. 834/24 कलम 4 ,25 भा.ह.का. चे गुन्ह्यात गोपिनीय माहिती वरुन आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती मध्ये एक लोखंडी धारदार व टोकदार तलवार जप्त केले.
आरोपीचे नाव राहुल उर्फ अजय गिरिधर मादणकर वय 22 रा. राजीव गांधी वार्ड, रयतवारी ,चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर यांच्या येथे एक नग लोखंडी धारदार व टोकदार तलवार कि. 500/- रू वर नमूद ताब्यातील आरोपीस व मुद्देमाल पुढील तपासकामी पोलीस स्टेशन रामनगर चे ताब्यात देण्यात आले. कारवाई पोउपनि. विनोद भूरले , नितेश महात्मे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, प्रफुल घारघाटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर
हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज
भद्रावती, (ता.प्र.). भद्रावती तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या ट्रेझरी कार्यालयात रात्रीच्या वेळेस कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 24) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली. मधुकर कोंडू आत्राम, (55, रा. चंद्रपूर) असे मृतक पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून ते भद्रावती पोलिस स्टेशन येथे पीएसआय पदावर कार्यरत होते.
घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक मधुकर आत्राम यांची नेहमी येथील ट्रेझरी कार्यालयात रात्रीची ड्युटी राहत होती. घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर
हजर झाल्यानंतर बऱ्याच वेळाने ट्रझरी कार्यालयातील लाईट बंद दिसल्याने शेजारील शासकीय विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याने जाऊन पाहिले असता ते झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्याला शंका आल्याने त्याने पोलिसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर आत्राम हे मृतावस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हर्ष साखरे मुख्य संपादक सुपर फास्ट बातमी 📱📱📱📱📱📱📱9518913059
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे वास्तव्यास असलेल्या एका गर्भवती महिलेने पतीच्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. नीलिमा धर्मेंद्र पराते (२१) असे मृतक महिलेचे नाव आहे.
मृतक महिलेचे नवरगाव येथील धर्मेंद्र पराते (३७) याचेशी लग्न झाले होते.
पती धर्मेंद्र हा क्षुल्लक कारणावररून निलीमाचा छळ करून मानसिक त्रास देत असल्यानेच आपल्या मुलीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची तक्रार पोलीसात मृतकाच्या आईने दाखल केली आहे. यावरून पोलिसात पती
धर्मेंद्र यांचेवर भारतीय न्याय सहिता अन्वये कलम ८५, १०८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सिंदेवाही पोलिस करीत आहे. (ता.प्र.)
नागभीड : अनैतिक संबंधातून एकाने सख्ख्या चुलत भावाचीच हत्या केल्याची घटना बुधवारी (दि. ७) वासाळा मक्ता येथे उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. होमराज भटू भुळे (४०) असे मृतकाचे तर मोहन महादेव भुळे (३१) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि मृतक हे दोघेही एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहनचे होमराजच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. है अनैतिक संबंध होमराजला माहीत झाल्याने त्याची चिडचिड व पत्नीशी भांडणे वाढली. या त्रासाला पत्नीही कंटाळली होती. होमराज हा आपल्या आयुष्यातील अडसर ठरत आहे, अशी आरोपीची खात्री झाल्यानंतर त्याने आपल्यामार्गातील अडसर कायमचा दूर करण्याचे ठरविले. काही दिवसांपासून आरोपी मोहन हा होमराजच्या मागावरच होता
घटनेच्या दिवशी मंगळवारी होमराज हा शेतावर गेला होता. ही संधी साधून आरोपी मोहन हा होमराजच्या शेतावर गेला आणि होमराज बेसावध असल्याचे पाहून धारदार शस्त्राने मानेवर वार केले. होमराज हा मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर आरोपीने होमराजला शेतातील विहिरीत ढकलून दिले व साळसूदपणाचा आव आणत घरी आला.
हत्येनंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आरोपीनेच घेतला पुढाकार
मुलगा घरी आला नाही म्हणून होमराजचे वडील मुलाची चौकशी करीत होते. तेव्हा आरोपी मोहन हा मृतकाच्या वडिलाची साथ देत होता, बुधवारी सकाळी आरोपीच होमराजच्या शोधासाठी पुढाकार घेत होता, मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर पोलिस गावात आले. तेव्हाही तो सोबतच होता. एवढेच नाहीतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात त्याचाच पुढाकार होता. मात्र होमराजच्या अंगावरील जखमांचे व्रण लक्षात घेता ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा संशय पोलिसांनाआला होता. त्यादृष्टीने पोलिसांची एक चमू कामाला लागली होती.
गावातही आरोपी आणि मृतकाच्या पत्नीचेअनैतिक संबंधांची चर्चा होती. संशयावरून पोलिसांनी आरोपी मोहन याला ताब्यात घेतले आणि बोलते केले तेव्हा आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी भादंविच्या कलम २०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल काचोरे करीत आहेत.
आश्रम शाळेला सुटी लागल्याने आली होती गावी
नागभीड पत्नीच्या गैरहजेरीचा फायदा घेत स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी कुकर्म करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम बापास नागभीड पोलिसांनी अटक केली आहे. बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना नागभीड तालुक्यातील एका गावात घडली. विशेष म्हणजे, आश्रम शाळेला सुटी लागल्याने मुलगी आपल्या गावी आली होती.
पती, पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब तालुक्यातील एका गावात राहत होते. एप्रिल महिन्यात आरोपीची पत्नी पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्या राज्यात मजुरीसाठी गेली होती. याचवेळी तालुक्यातीलच एका आश्रम शाळेत आठव्या वर्गात शिकत असलेली १३ वर्षीय ही अभागी मुलगी शाळेला सुट्या लागल्याने गावी आली.
पत्नी घरी नसल्याने मुलीला पाहून आरोपीच्या अंगातील सैतान जागा झाला. त्याने पोटच्या मुलीशीच बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे सुरू केले. मुलीने विरोध केला. पण धमकावून तो तिला चूप ठेवत होता. भलेही आरोपी मुलीस चूप राहण्यास भाग पाडत होता. मात्र शरीरधर्म त्याचे कर्तव्य बजावत होता. अशातच शाळा सुरू झाली आणि मुलगी परत शाळेत गेली. शाळेच्या नियमित आरोग्य तपासणीत मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले आणि शाळा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.
शाळेतील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.
चिमूर तालुक्यातील घटना
चिमूर:-
तालुक्यातील एका गावात चारवर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना बुधवार दिनांक २९ रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी श्रीकृष्ण चौधरी याला अटक केली आहे.
चिमूर तालुक्यातील एका गावात बुधवारी लग्न समारंभ होता. या लग्नास भिसीजवळ असलेल्या कन्हाळगाव येथील श्रीकृष्ण चौधरी हा आला होता. या लग्नात पीडित बालिकेचे वडील भोजन वाटपाचे काम करीत होते. त्यामुळे ती बालिका वडिलांकडे आणि घराकडे चकरा मारत होती. रात्री ती बालिका लग्न मंडपाकडे आली. तेव्हाच नराधमाने तिला शाळेजवळील शेतात नेऊन अत्याचार केला. बालिका दिसत नसल्याचे पाहून आईने शोधाशोध सुरू केली. तेव्हाच बालिका रडत रडत घटनास्थळाकडून येताना दिसली. तिच्या मागे नराधम श्रीकृष्ण येत होता. बालिकेने आईला अत्याचाराची माहिती दिली. हे कळताच आई व उपस्थित नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. आईने घटनेची तक्रार चिमूर पोलिस स्टेशनला केली. पीडित बालिकेला तत्काळ उपचार व तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात येत आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम करीत आहेत.
महाराष्ट्र के चंद्रपूर रेल्वे स्टेशन पर हत्या का सनसनीखेज मामला सामने आया है. हत्या की या घटना पास मे लगे सीसीटीव्ही कॅमेरे मे केद हो गई. बताया जा रहा है की भीती रात करीब तीन मामुली बात पर यह वारदात हुई. आरोपी की पहचान साहिल राजू आंबेडकर के रूप मे हुई है.
लेकिन पुलिस वृत्तक की पहचान मे जूटी है. रेल्वे पोलीस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है.
आरपीफ के ApI हर्षल चापले ने बताया की CCTV के आधार पर चंद्रपूर मे रहने वाले आरोपी साई आंबेडकर को गिरफ्तार कर लिया है. आरोपी से पूछताछ के बाद चौक आने वाली वजह सामने आई है. आरोपी रेल्वे स्टेशन के प्लॅटफॉर्म पर सो रहा था. मृत उसके पास आया और उसका पर चोरी करने लगा. देशी गावरान साहिल आंबेडकर की नींद खुल गई और दोनो के बीच विवाह सुरू हो गया. दोनो के बीज विवा जितना बढ गया की साहिल नही चाकू से वार कर उसकी हत्या कर दी. या घटना सीसीटीव्ही मे कैद हो गई.
हत्या की घटना सीसीटीव्ही कॅमेरा मे कैद
बताया जा रहा है कि मृतक जखमी हालात मे स्टेशन के वेटिंग रूम मै बेहोश होकर गिर गया था. सुबह जब रेल्वे के कर्मचारीयों ने उसे देखा तो उसे अस्पताल ले जाया गया लेकिन डॉक्टर रो ने उसे मृत घोषित कर दिया. रेल्वे पोलीस के मुताबिक आरोपी पर चोरी, डकैती, आर्म एक्ट जैसे कोई मामले दर्द है, वह अक्सर अपने साथ हत्यार लेकर ही घुमता था.
पोलीस ने आरोपी को किया गिरफ्तार
जांच अधिकारी हर्षल चापले ने बताया की मृतक की पहचान नही हो पायी है. शव पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया है और आरोपी को गिरफ्तार कर लिया है. जांच के हिसाब से ही आगे की कारवाई की जायेगी
चंद्रपूर : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शेतीच्या फेरफार प्रकरणात शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच घेणाऱ्या नागाळा येथील महिला तलाठीला नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. ७) रंगेहात अटक केली. प्रणाली अनिलकुमार तुंडुरवार असे अटकेतील महिला तलाठीचे नाव आहे.
चंद्रपूर तालुक्यातील सिदूर येथील एक शेतकऱ्याने स्वतःच्या जमिनीचे पत्नी व मुलाच्या नावाने बक्षिसपत्र केले होते. या जमिनीचा फेरफार झाला नव्हता. तक्रारदार शेतकऱ्याने याबाबत नागाळा येथील साजा क्रमांक चारच्या
महिला तलाठी प्रणाली तुंडूरवार यांची भेट घेऊन संबंधित कागदपत्रे सादर केली. मात्र, तलाठीने शेतकऱ्याकडे ५ हजारांची मागणी केली. अखेर ४ हजार रूपये देण्याबाबत तडजोड झाली, मात्र, ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, ४ हजारांची लाच घेताना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या नेतृत्वात अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील व जितेंद्र गुरनुले आदींच्या पथकाने केली.
चिमूर : चिमूर - वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील शेडेगाव जवळ ट्रक व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरवर बसून असलेला मजूर जागीच गतप्राण झाला आहे. हा अपघात शनिवार २ मार्चच्या मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली आहे
ट्रक क्रमांक सीजी ०८४ आर ९५३५ हा वरोराकडून चिमूरकडे येत असताना त्याच वेळी रेती भरून असलेला ट्रॅक्टर नंबर एम.एच.३४ एपी २९२६ चिमूरवरून खडसंगीकडे जात असताना ट्रक व ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली त्यावेळी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या मजूराचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव सचिन रामदास सोनवाने
(२५) रा. बंदर असून २ वर्षांपासून चिमूर ट्रॅक्टरवर कामावर येथील होता. हा व्यक्ती घरात एकटाच कमविणारा असून त्याच्या मागे आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.
मध्यरात्री घटनेची माहिती मिळताच पोलिस सहायक चवरे, मानकर, अवधूत, पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत पंचनामा करून दोन्ही चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करून अधिक तपास चिमूर पोलीस करीत आहेत. तालुक्यात सध्या अवैधवाहतुकीचा कहर झाला असून महसूल प्रशासनाने आर्थिक गणित डोळ्यासमोर ठेवत सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. चिमूर तालुक्यातील उमा नदीवरुन रात्री चोरी च्या मार्गाने रेती तालुक्यातील गावागावांत व ठेकेदारांच्या साईटवर टाकली जाते. अवैध वाळू वाहतूक करत असताना मोठ मोठे अपघात होत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील काम अपघाताचे आमंत्रण
चिमूर - वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या सहा ते सात वर्षांपासून काम सुरू आहे तालुक्यातुन अनेक शासकीय कामात जिल्हाच्या ठिकाणी ये-जा करताना प्रवाशाना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे मोठ मोठे अपघात होत आहेत या वर्षात अपघातांची मालिका सुरूच आहे.
गोंडपिपरी : तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील महादेव मंदिरातील रेणुका माता व विठ्ठल रुखमाईची मूर्ती चोरीला गेल्याची घटना गुरुवारी (दि. २५) सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर तणाव निवळला.
भंगाराम तळोधी येथील महादेव मंदिरात एक भाविक गुरुवारी सकाळी दर्शनासाठी गेला होता. पूजा करीत असताना मंदिरातील रेणुका माता व विठ्ठल रुखमाईच्या मूर्तीची चोरी झाल्याचे दिसून आले. त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली.
काही वेळातच मंदिर परिसरात संपूर्ण गाव एकत्र झाले. नागरिकांकडून तर्कवितर्क लावून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पीएसआय मनोहर मोगरे हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कोंबड बाजारावर पोलिसांची धाड
चंद्रपूर, ब्युरो. पायली गावालगतच्या झुडपी जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर बुधवारी सायंकाळच्या सुमारास दुर्गापूर पोलिसांनी छापा मारून 6 आरोपींना अटक केली आहे. यात कोंबडे, दुचाकी व रोख रकमेसह 8 लाख 17 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कोंबड्यांना लढवून त्या आड सर्रास जुगार खेळला जातो. असाच जुगार पायली लगतच्या झुडपी जंगलात सुरू होता. याबाबत दुर्गापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी सहकार्यासमवेत छापा मारला. यात सहाआरोपी त्यांच्या हाती लागले.
घटना स्थळावरून पळून जाणाऱ्यांच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या. याशिवाय चार जिवंत, दोन जखमी व दोन मृत असे आठ कोंबडे जप्त केले. यासह एकूण 8 लाख 17 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल दुर्गापूर पोलिसांनी जप्त केला आहे. यातील आरोपींवर कलम 12 ब महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही कारवाई दुर्गापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार लता वाडिवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मोहतुरे गुप्तहेर शाखेचे योगेश शार्दुल, प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव यांनी केली.
मूल : घरात कुणी नसल्याची संधी साधून चिंचाळा येथून धानाचे आठ पोते चोरणाऱ्या दोघांना मूल पोलिसांनी गुरुवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता मुद्देमालासह अटक केली. राकेश कोकाटे (३५) व दिनेश सोनटक्के (३५, दोघेही रा. चिंचाळा) अशी आरोपींची नावे आहेत. चिंचाळा येथील शेतकरी पांडुरंग गुरनुले यांनी आपल्या घरात धानाचे पोते ठेवले होते. शनिवारी (दि. १३) गुरनुले यांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरी परत आल्यानंतर धानाचे आठ पोते चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी त्याच दिवशी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी काही व्यक्तींवर संशयही व्यक्त केला होता. पोलिसांनी राकेश कोकाटे व दिनेश सोनटक्के या दोघांना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अटक केली. आरोपीविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींकडून १२ हजार रुपये किमतीचे धान जप्त केले. पुढील तपास हवालदार राष्ट्रपाल कातकर करीत आहेत.
नागभीड : बाळापूर येथील कोतवाल संजय गजानन राहाटे (४२) यांच्यावर रविवार दि. ७ रोजी सायंकाळी ७ वाजता धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली.
मंगेश नामदेव झाडे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात भादंविच्या कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राहाटे हा बाळापूर येथे कोतवाल आहे. कामकाज आटोपल्यानंतर तो नवानगर या आपल्या गावाकडे मोटारसायकलने परत येत असताना आरोपी मंगेश झाडे हा साथीदारासह मोटारसायकलने पाठीमागून आला आणि जोराजोराने हॉर्न वाजविला. या आवाजाने कोतवालाने आपली मोटारसायटलचा वेग कमी करत बाजूला नेली.
नेमक्या याच वेळी आरोपीने धारदार शस्त्राने कोतवाल राहाटे याच्यावर पाठीमागून वार केला आणि पळून गेला. या हल्ल्यानंतर कोतवाल संजय राहाटे हा कसाबसा देवपायलीपर्यंत आला. देवपायलीच्या बसस्थानकावर असलेल्या लोकांना झालेला प्रकार सांगून उपचारासाठी नागभीडला नेण्याची विनंती केली. काही वेळातच जखमी कोतवालाला नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सावली: तालुक्यातील खेडी येथे गेल्या तीन महिन्यापासून किरायाने राहत असलेली पुनम राजकुमार शर्मा (१६) रा. बाबूपेठ या मुलींनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
२५डिसेंबरला सदर घटनेची माहिती पोलीस पाटील कृपाल दुधे यांनी सावली पोलिसांना दिली. त्यानंतर सावली पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले व
तपास सुरु केले आहे. सदर प्रकरण नेमके काय आहे याची चौकशी सकाळी ही पोलीस करणार आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे व तपास सुरु असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. तरूणीच्या आत्महत्येमागील कारण वृत्तलिहीपर्यंत कळू शकले नाही.