बोथली येथील घटना; तिन्ही तरुण मित्र एकाच गावचे; दुचाकीने दिली धडक
सावली, (ता.प्र.). तालुक्यातील बोथली येथे दुचाकी व ट्रॅक्टरच्या धडकेत तिघांचा मृत्यु झाला. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री घडली. साहिल अशोक कोसमशिले (19 रा. बोथली), हर्षल संदिप दंडावार (21, रा. बोरचांदली) साहिल नंदु गणेशकर (20, रा. तळोधी) अशी मृतांची नावे आहेत.
बोथली येथील साहिल अशोक कोसमशिले या मित्राला भेटण्यासाठी एमएच-34/एल-3229 क्रमांकाची दूचाकी घेवून हर्षल संदिप दंडावार व साहिल नंदु गणेशकर हे बोथली येथे आले होते. तिघेही मित्र हे रात्रीच्या सुमारास दुचाकीने जवळच असलेल्या हिरापूर येथे नाटक बघण्यासाठी निघाले होते. वाटेतच मार्कंडेय विद्यालयाजवळ एम-34/एपी- 1042 क्रमांकाचा ट्रॅक्टर वळण घेतअसतांना, दुचाकी ट्रकला जाऊन धडकली. धडक एवढी भीषण होती की, हर्षल संदिप दंडावार हा जागीच गतप्राण झाला.तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. सामान्य रुग्णालयात नेत असतांना वाटेतच साहिल नंदु गणेशकर याचा मृत्यु झाला. तर सामान्य रुग्णालयात साहिल अशोक कोसमशिले याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
सावली तालुक्यावर शोककळा
सदर तरुण हे गंभीर जखमी असल्याने पुढील उपचाराकरीता त्यांना गडचिरोलीचे सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु. वाटेतच साहिल नंदु गणेशकर याचा मृत्यु झाला. तर सामान्य रुग्णालयात साहिल अशोक कोसमशिले याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तिन्ही तरुणाच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास सावलीचे पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक पुल्लुरवार यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार चरणदास मडावी, पोलिस शिपाई अमोल गणफाडे, पोलिस शिपाई मोहन दासरवार करीत आहेत.
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांनाआमिष देण्यासाठी पैशाचा वापर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच निवडणुकीच्या मध्यरात्री गडचांदूर येथील एका घरातून तब्बल ६१ लाखांची रोकड आणि प्रचार साहित्य निवडणूक आयोगाने जप्त केली. जप्त केलेले प्रचारसाहित्य भाजपाचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार देवराव भोंगळे यांचे असल्याचे पोलिस सूत्राने सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांची नजर होती. दरम्यान, गडचांदूर येथील एका घरी निवडणुकीत वाटप करण्यासाठी मोठी रक्कम ठेवून असल्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी धाड टाकून ती ६१ लाखांची रोकड जप्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. पुढील तपास निवडणूक आयोगाच्या चमूतर्फे सुरू आहे
चंद्रपूर : वरोरा मतदार संघात काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित मांसाहार पार्टीत दोन मद्यधुंद कार्यकर्ते विहिरीत पडले.त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना उमेदवार मतदारांना मांसाहारी व शाकाहारी पार्टी, दारू पार्टीचे प्रलोभन देत आहेत. ग्रामीण व शहरी भागात अशा पार्टी दररोज आयोजित केल्या जात आहेत. जेवणावळीची धूमधाम सुरू असताना कार्यकर्ते दारूच्या नशेत झिंगून पडत असल्याची घटना समोर आली आहे.
वरोरा मतदार संघात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्यासाठी त्यांचे समर्थक प्रमोद मगरे यांनी रविवारी मटण-चिकन पार्टीचे आयोजन केले होते.
फतेहपूर च्या गिट्टी क्रशर कॉम्प्लेक्समध्ये मटण पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये दारू ची व्यवस्था करण्यात आली होती. पार्टी दरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन कार्यकर्त्यांचा तोल गेला आणि ते जवळच्या विहिरीत पडले.
अरुण महाले या एका कामगाराची वेळीच सुखरूप सुटका करण्यात आली.दुसरा कामगार गजानन काळे अद्याप बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.रात्रीचा अंधार असल्याने त्यांना विहिरीतून बाहेर काढता आले नाही.परिणामी त्याचा मृत्यू झाला.या घटनेने खळबळ उडाली असून प्रचाराला गालबोट लागले आहे.
भद्रावती : पाळीव गुरांसाठी हिरवा चारा आणण्यासाठी शिवारात गेलेल्या एका ७८ वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३०) कोंढेगाव शिवारात दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. श्रीराम मडावी (रा. कोंढेगाव) असे मृतकाचे नाव आहे.
या घटनेने परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. कोंढेगाव हे जंगलव्याप्त गाव आहे. श्रीराम मडावी हे बुधवारी सकाळी गावालगतच्या शिवारात आपल्या पाळीव गुरांसाठी हिरवा चारा आणण्यासाठी गेले होते. झुडपातून चारा काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेचा माहिती मिळाल्यानंतर वन विभाग व ठाणेदार अमोल काचोरे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. श्रीराम मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
चिमूर: दोघे जीवलग मित्र बैल धुण्यासाठी गेले असताना एकाला वाचविताना दुसऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील सोनेगाव (वन) तलावात गुरुवारी (दि. २२) दुपारी ३ वाजता घडली. रोशन सोनवाने (२२) असे मृतकाचे नाव आहे. सोनेगाव (वन) येथील पांडुरंग सोनवाणे यांचा एकुलता एक मुलगा रोशन हा पोहण्यात पट्टीचा होता. गुरुवारी सकाळी ८ वाजता रोशन व दागेस घोडमारे हे दोघे मित्र बैल धुण्यासाठी गावातील तलावात गेले. वा बैल धुतल्यानंतर दोघेही तलावात पोहू लागले.
दरम्यान, दागेस हा खोल बुडत असल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी रोशनने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, तोच खोल पाण्यात बुडाला. दागेस हा कसाबसा तलावाबाहेर आला. पण रोशनचा खोल डोहात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुटुंबाला देताच गावकरी तलावाकडे धावले. चिमूर पोलिस पोलिस व चंद्रपूर सीडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने गुरुवारी दुपारी ३:४५ वाजता तलावातून रोशनचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. रोशनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वरोरा : जिल्ह्यातील दारूबंदी निघाल्यानंतर बिअर बार व रेस्टॉरंट सुरू करण्यात आले. मात्र, ग्रामपंचायत कार्यालय सक्षम प्राधिकारी नसताना चक्क ग्रामसेवकांनी गावठाणा बाहेरील जागेवर हॉटेल व रेस्टॉरंटच्या पक्क्या बांधकामाला पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे ३३ ग्रामसेवकांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे
बिअर बार परवानगीपूर्वी हॉटेल व रेस्टॉरंट पक्के बांधकामाचा परवाना गावठाण हद्दीत असेल तर ग्रामपंचायतला देण्याचा अधिकार आहे हाच परवाना गावठाण बाहेर असेल तर परवानगी देण्याचा अधिकार महसूल विभागाकडे असतो. मात्र, गावठाण हद्दीच्या बाहेर हॉटेल रेस्टॉरंटला पक्के बांधकाम परवाना अधिकार नसताना ३३ ग्रामसेवकांनी परवाना दिल्याचे प्रकरण उघडकीस आले. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना हा प्रकार लक्षात आला.
ग्रामसेवक सक्षम प्राधिकारी नसताना परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न पुढे आला. त्यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले,
ग्रामसेवकांनी गावठाणा बाहेरील जागेवर हॉटेल व रेस्टॉरंटच्या पक्क्या बांधकामाला पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे लक्षात आले. त्यावरून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकायांनी संबंधित ग्रामसेवकांना नोटीस बजावली आहे.
- गजानन मुंडकर, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती, वरोरा
काल जखमी केलेल्या घोडीला आज वाघाने केली फस्त
चिमूर तालुक्यातील खडसंगी बीट परिसरात शेतातील पाळीव गरोदर घोडीची शिकार वाघाने रोज सोमवारी केली होती. परंतु ती गोडी जखमी अवस्थेत असताना तिला रस्त्या अभावी घरी आणता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास त्या जखमी घोडीला वाघाने फस्त केले. त्यामुळे शेतकरी हेमंत इसनकर यांचे वाघाच्या भीतीने शेतकाम थांबून झालेले नुकसान व घोडीचे नुकसान असे एकूण 1,00,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
हेमंत इसनकर यांचे शेत मुरपार रीठ खापरी पिंजारी येथे असून रस्त्या अभावी या शेतात मालाची व मजुराची ने आण करण्याकरता त्यांनी घोडी पाळलेली होती. दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान शेताच्या बांधावर चरण्यासाठी बांधलेल्या गरोदर घोडीवर वाघाने हल्ला करून शिकार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात घोडी गंभीर जखमी झाली होती रस्त्या अभावी या घोडीला बैलबंडी किंवा इतर वाहनाने मांडून घरी आणता आले नाही. त्यामुळे ती घोडी त्याच ठिकाणी पडून होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच वाघाने डबल हल्ला करून घोडीला फस्त केले. शेतीचे कामे करण्यासाठी वरदळी करता या घोडी चा उपयोग करीत असल्याने त्यांचे शेतीचे सर्व काम ठप्प पडले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी देखील वाघाने याच शिवारात याच घोडीच्या नवजात शिंगरू (पिल्लू) ची शिकार केली होती, त्यामुळे देखील त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.
या परिसरात वाघाने घोडीची शिकार केल्याची चर्चा सर्व परिसरात पसरली असून त्यांच्या शेतात कोणताही मजूर सध्या घडीला काम करण्यासाठी येण्यास तयार नाही. हा कालावधी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून काही भागात भाताची पेरणी शिल्लक आहे. तसेच इतर पिकांची मशागत देखील करणे आवश्यक आहे. मात्र वाघाच्या भीतीने मजूर शेतात येण्यास तयार नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळे नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांनी झालेली नुकसान एक लाख रुपये लवकरात लवकर मिळण्यात यावी व वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर यांना केली आहे.
नागभीड : पुरात वाहून गेलेल्या महिलेचा गुरुवारी सहा दिवसांनंतर पळसगाव शिवारात मृतदेह आढळला. कयादु बळीराम कावडकर (रा. सावंगी बडगे) असे मृतक महिलेचे नाव आहे. पुरात वाहून गेल्याची तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.
कयादू कावडकर ही महिला सामान आणण्यासाठी २६ जुलै रोजी पळसगावला गेली होती. मात्र ती घरी आली नाही. नाल्याला पूर असल्याने त्यात वाहून गेली, असा अंदाज बांधून शोधाशोध करण्यात आला. मात्र पाच दिवस कुठेच पत्ता लागला नाही. गुरुवारी कबीर गुरनुले हा व्यक्ती शेतावर जात असताना नाल्या एक मृतदेह आढळून आला. ही माहिती त्यांनी आमदार बंटी भांगडिया यांना दिल्यानंतर पोलिसांना कळविली.
पंचनामे करण्याचे शासकीय यंत्रणेस दिले निर्देश
चिमूर:-
दिनांक २७ जुलै आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी चिमूर तालुक्यातील आठ दिवसा पासून सुरु असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती तील पिकांची नुकसान झाली व काही घरांची पडझड झालेल्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि उपस्थित शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंबंधि निर्देश दिले. शेतकरी, तसेच घरे पडलेल्या नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.
मागील आठ दिवसा पासून सतत मुसळधार पावसाने नदी नाल्यात पूर आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे झाले असून काही घरे पडझड झाली. तेव्हा आमदार बंटी भांगडिया यांनी दिनांक २७ जुलै ला चिमूर तालुक्यातील सातारा, मासळ, करबडा, मदनापूर, विहिरगाव, नेरी, लोहारा, आंबोली, गावातील शेतीची व पडलेलल्या घराची पाहणी करीत व जामगांव कॅनल फुटला असल्याने शासकीय यंत्रणा ला पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पूरग्रस्त पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे शब्द दिला.
यावेळी भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव मनिष तुंम्पलीवार, जेष्ठ नेते घनश्याम डुकरे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे, युवा नेते समीर राचलवार, माजी जिप सदस्य डॉ देवनाथ गंधारे,असिफ शेख,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंगेश धाडसे, सरपंच गजानन गुळधे सातारा,सरपंच अरविंद राऊत चिचाळा शास्त्री, नेरी भाजप जिप प्रमुख संदीप पिसे नेरी, भिसी भाजप जिप प्रमुख निलेश गभणे भिसी , शंकरपूर भाजप जिप प्रमुख अविनाश बारोकर मासळ भाजप जिप प्रमुख प्रवीण गनोरकर टेकेपार युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, तालुका महामंत्री रोशन बनसोड, युवा नेते कुणाल कावरे चिमूर युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर अमित जुमडे, बादल बडगे, अनिल शेंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनकरराव शिनगारे रवी लोहकरे, पिंटू खाटिक, नरेंद्र पंधरे,हरीश पिसे कृष्णा कानझोडे ,निखिल भुते गोलू मालोदे, गोलू भरडकर, नरेंद्र हजारे, लीलाधर बनसोड,विकास भोयर,
तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार राजमाने,ठाणेदार बाकल,कृषीअधिकारी सरोज सहारे, सिंचाई उपविभागीय अभियंता पी जी मेश्राम,बिडीओ सहारे , तलाठी मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.
विसापूर (चंद्रपूर) : पतीला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे घर बर्बाद होऊ लागले. यामुळे पतीपत्नीत वाद होत होता. उभयतात नेहमी कडक्याचे भांडण होत होते. नेहमीच्या भांडणाला कंटाळून पत्नीने टोकाचा निर्णय घेतला. धारदार शस्त्राने तिने पतीचा गळा चिरला. पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची हृदयदायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोड़े) येथे बुधवार (दि. १७) रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. हत्या झालेल्या पतीचे नात अमोल मंगल पोडे ( व्य ३८ ) रा. नांदगाव (पोहे)
ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर असे आहे. घटनेतील आरोपी पत्नी लक्ष्मी अमोल पोडे । बय - ३५) हिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. बल्लारपूर तालुक्यात नांदगाव (पोड़े) गात ५ हजारावर लोकसंख्येचे आहे. या गावात पतिपत्निच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आज गुरुवारी सकाळी ७ वाजता उघडीला आल्यावर घटनास्थळी गावाकऱ्यांनी एकच गर्दी केली.
मृतक अमोल हा पत्नी लक्ष्मी ता दोन मुले देवांश अमोल पोडे (११) आणि सारंग अमोल पोडे (८) सोबत राहत होते. मात्र अमोलला दारू पिण्याचे व्यसन जडले. यामुळे पती पत्नीत नेहमीच वाद होत होता. दारूच्या व्यसनावरून पत्नीची व दोन लहान मुलांची आभाळ होत होती. यामुळे पत्नी लक्ष्मी ग्रस्त होती. नेहमी प्रमाणे काल बुधवारी अमोल घरी मध्यधुंद अवस्थेत आला. घरी आल्यावर त्याने पत्नी लक्ष्मी सोबत वाद घातला. उभयतात कडाक्याचे भांडण झाले. तिने सततच्या जाचाला कंटाळून पती अमोललासंपविण्याच्या कट केला. दोन्ही मुले व लक्ष्मीची आई झोपी गेले. ही संधी साधून लक्ष्मीने कडक लक्ष्मीचा अवतार धारण केला. कोंबड्याच्या कातीने, धारदार शस्त्राने अमोलचा गळा चिरून त्याला यमसदणी धाडले. रक्ताच्या थरोळ्यात तो मृतझाला. या घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना देण्यात आली. विशेष म्हणजे पतीच्या निघून हत्येची माहिती स्वता लक्ष्मीने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. अमोलचे शव शवविच्छेदनासाठी चंद्रपूर शासकीय वैद्यातिय महाविद्यालयात पाठविण्यात आले.
मुलांचे भविष्य आले संकटात
अमोल व लक्ष्मी पोडे यांच्या संसार वेलीवर दोन गोंडस मुले आली. तिच पत्ती पत्नीचा आधार होती. मात्र अमोलच्या दारूच्या व्यसनाने सुखी संसार उध्वस्त झाला. अमोल व लक्ष्मीचे मुले देवांश पोडे व सारंग पोडे कॉन्हेंटमध्ये शिक्षण घेत होती. मात्र अमोलच्या दारूच्या व्यसनामुळे खर्च परवडत नव्हता. त्यामुळे अमोलने ६ दिवसांपूर्वी नांदगाव । (पोडे) वेथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत देवांशला ८ ल्या, तर सारंगला तिसऱ्या वर्गात प्रवेश घेतला. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी लक्ष्मीने कडक लक्ष्मी बनून पतीला यमसदनी पाठविले.
सावली रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीवरील चार वर्षीय बालक व एक इसम जागीच ठार झाले. तर दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर गावाजवळ घडली. वरुण हरिदास बोरुले (४), उमेश श्रीरंग गुरनुले (वय २७, दोघेही रा. फराळा, ता चार्मोशी, जि. गडचिरोली) असे मृतकांची नावे आहेत. तर शेवंता रामदास कावळे (६५, रा. नवेगाव), हरिदास बापूजी बोरुले (४०, रा. फराळा, ता. चार्मोशी) अशी जखमींची नावे आहेत.
उमेश गुरनुले हा दुचाकीने (क्रमांक एमएच ३३-एई १८३७) शेवंता, वरुण, हरिदास यांना घेऊन फराळा येथे जात होता. दरम्यान, हिरापूर
बसस्थानकाजवळ धोकादायक स्थितीत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेला ट्रकला (क्रमांक सीजी ०८- एएक्स ६१७१) जोरदार धडक दिली. यात वरुण व उमेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर हरिदास व शेवंता हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला. याबाबतची माहिती सावली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच फरार ट्रक चालकाला पकडण्यासाठी शोधमोहीम राबविली. दरम्यान, ट्रक चालकावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यान्वये १०६ (०१), १२५ (ए), १२५ (बी), २८५ सहकलम १२२, १३४ ए, १३४ (ब) वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला ट्रकसह खेडी फाट्याजवळ अटक केली. जखमींवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
चंद्रपूर, ब्युरो. वरोरा येथून जवळच असलेल्या माढेळी येथील अशोक चौधरी (वय 62 रा. गिरसावली) यांच्यावर एका हॉटेलमध्ये सोमवारी सायंकाळी 7 वाजता जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले.
माढेळी येथील काँग्रेसचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विशाल बदखल व सोबतच्या तीन सहकाऱ्यांनी अशोक चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असून त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती गंभीर अवस्थेत असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
चार दिवसापूर्वी वेणा नदीच्या घाटातून अवैध रेतीचे उत्खनन करीत असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी साटम यांनी विशाल बदखल व इतर तिघांवर कारवाई केली असून 2 हायवा, 1 जेसीबी
व ट्रॅक्टर रेतीसह जप्त केली होती. संबंधित पोलिसांना माहिती देणारा अशोक चौधरी हाच व्यक्ती असल्याचा संशय बदखल यांना आल्याने चौधरी हे हॉटेलमध्ये बसले असते बदखल यांनी रॉडने जबर मारहाण केली. एस.डी.पी.ओ साटम यांच्या नेतृत्वात आरोपीचा शोध घेतला असता पीएसआय अमोल काचोरे यांनी विशाल बदखल (वय 45 वर्ष), राहणार माढेळी, लंकेश बदखल, राहणार येवती, संजय चिंचोलकर, यवती, मंगेश सोनटक्के यांना रात्रीच अटक केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास सुरू आहे.
चंद्रपूर : पोलिसांच्या सहाय्याने मनपाने अतिक्रमण हटवले. या कारवाईने दुखावलेल्या एका मटन विक्रेत्याने रात्री वासेकर पेट्रोल पंपासमोर पोलिसांना शिवागाळ करू लागला. दरम्यान, एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याला टोकले असता, त्याने पोलिस शिपायास धक्काबुक्की करून मारहाण केली. ही खळबळजनक घटना २७ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता घडली. याप्रकरणी पोलिस शिपाई विशाल बगडे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात शैलेश पारधी याच्यावर कलम ३५३, २९४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला. तो फरार असून रामनगर
पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस व मनपातर्फे २७ फेब्रुवारीला रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी हजारे मेडिकल समोरील दवा बाजार परिसरातील मटन विक्रेत्यांचीसुद्धा दुकाने हटविण्यात आली होती. यावेळी शैलेश पारधी याचेही दुकान हटविले. याचाच राग मनात घेऊन वासेकर पेट्रोल पंपासमोरील हजारे मेडिकल चौकात तो पोलिसांना शिवीगाड करत होता. दरम्यान, पोलिस शिपाई विशाल बगडे तेथे गेला. त्याने त्याला कशाला शिवीगाळ करतो म्हणून टोकले. यावेळी त्याने बगडे याला धक्काबुक्की करून मारहाण केली.
शंकरपूर : गतवर्षी वन्यप्राणी गणना करत असताना ताडोबा क्षेत्रात एका महिला वनरक्षकाचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला होता. सुदैवाने समयसूचकता दाखविल्याने या घटनेची पुनरावृत्ती टळली. अंगावर धावून आलेल्या वाघिणीला हातातील दंडुका दाखवून आरडाओरडा करून वनरक्षकाने स्वतःचा व सोबतच्या वनजुराचा जीव वाचविल्याची धक्कादायक माहिती सोमवारी (दि. २६) उघडकीस आली.
महाराष्ट्रात वन विभागाकडून २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान ट्रांसिक लाइनवर वन्यप्राण्याचे गणना सुरू आहे. ही गणना सुरू असताना रविवार, दि. २५ चिमूर वनपरिक्षेत्राअंतर्गत डोमा बीटाचे वनरक्षक विशाल सोनोने आणि वनमजूर जग्गू लांजेवार हे कक्ष क्रमांक ४०० मध्ये ट्रांजिक लाइनवर वन्यप्राण्यांची गणना करण्यासाठी फिरत होते. ही ट्रांजेक्शन लाइन दोन किलोमीटर आहे. हे काम जवळपास पूर्ण होत असताना अचानकपणे वाघिणीचा एक बछडा या ट्रांजेक्शन लाइनवर दिसून आला. त्यामुळे हे दोघे जागेवरच थबकले. दरम्यान, नाल्यातबसून असलेल्या वाघिणीने अचानक वायुवेगाने धाव घेतली. सुमारे दहा फुटावर ती वाघीण असतानाच वनरक्षक विशाल सोनोने यांनी समयसूचकता दाखवत हातातील काठी फिरवून जोराने ओरडाओरडा केली. त्यामुळे ही वाघीण तिथून निघून गेल्याने मोठी दुर्घटना टळली.
ट्रांजेक्शन लाइनवर
वाघिणीचा एक बछड़ा दिसून आला. त्यामुळे आम्ही जागेवरच थांबलो; परंतु अचानकपणे दुसऱ्या मागनि वाघीण धावत आमच्याकडे आली. दोघांच्याही हातात दंडुका होता. तो वेगाने फिरवून जोराने ओरडलो, त्यामुळे वाघिणीने जंगलात धूम ठोकली -विशाल सोनुने, वन रक्षक डोमा वनक्षेत्र
चंद्रपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. १६) दोन लाचखोरांना दोन वेगवेगळ्या कारवायांत अटक केली. आश्चर्य म्हणजे, एका लाच प्रकरणात वीज कंपनीच्या तंत्रज्ञाने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्याकडून चक्क २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. शालेंद्र देवराव चांदेकर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. लाचखोर हा महावितरण राजुरा उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत होता.
राजुरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने कृषिपंपासाठी थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी राजुरा उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ शालेंद्र चांदेकर याच्याकडे केली. त्यासाठी रीतसर कागदपत्रेही जमा केली. मात्र, वीजपुरवठा हवा असेल तर २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये असे एकूण ७ हजार ५०० रुपये द्या, असा तगादा लावला होता. अखेर ५ हजार रुपये देण्याबाबत तडतोड झाली. पण, पैसे देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर पथकाकडे तक्रार दाखल केली. शुक्रवारी वीज कार्यालय परिसरात ५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शालेंद्र चांदेकर याला रंगेहाथ अटक केली. आरोपीविरुद्धबल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभूळकर, रोशन चांदेकर, मेघा मोहूले, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे आदींनी केली.
झिलबोडीचा लाचखोर ग्रामसेवकही जाळ्यात
बांधकामाची देयके मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून १० हजारांची लाच मागताना शुक्रवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील ग्रामसेवक जाळ्यात अडकला. पुरुषोत्तम यशवंत टेंभुर्णे (४८) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. कंत्राटदाराने जि. प.अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून २०२१ ते २०२२ दरम्यान जि. प. शाळेचे शौचालय, मुतारी, अंगणवाडी, किचन शेडचे बांधकाम केले होते. या कामाचे ३ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यासाठी ग्रामसेवक पुरुषोत्तम टेंभुर्णे याने १५ हजारांची लाच मागितली. अखेर १० हजार रुपयांवर तडजोड झाली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाल्याने ग्रामसेवक टेंभुर्णे याला अटक करण्यात आली.
सिंदेवाहीतील नागरिकांचा आरोप
सिंदेवाही : शासकीय कामासाठी आवश्यक असलेल्या मुद्रांकासाठी अतिरिक्त शुल्क वसूल केला जात असून, १०० रुपयांच्या मुद्रांकाला ११० ते १२० रुपये मोजावे लागत आहे, असा आरोप नागरिकांना केला आहे.
शासकीय, न्यायालयीन कामकाज व बँकेकडून कर्ज व जमीन व्यवहाराशी संबंधित कामांसाठी ग्रामीण भागातून दररोज शेकडो नागरिक तहसील कार्यालयात येतात. मुद्रांक घेण्यासाठी कार्यालयात रांग लागते. त्यामुळे कृत्रिम तुटवडा भासवून चढ्या दरात विक्री केली जाते.
मुद्रांक मिळविण्यासाठी एजंटही सक्रिय झाल्याची चर्चा आहे. कोर्ट फी, स्टॅम्प मुद्रांकासाठी जादा रक्कम घेऊन गरीब नागरिकांची लुबाडणूक सुरू असल्याची ओरड आहे. यापूर्वीही असे प्रकार तहसील कार्यालयाच्या परिसरात घडले. पण, यावर थातूमातूर कारवाई झाली होती. आता पुन्हा मुद्रांकासाठी अतिरिक्त शुल्क घेण्याचा प्रकार वाढला, असा आरोप नागरिक करीत आहेत.
मुद्रांकाचे अतिरिक्त शुल्क आकारणे चुकीचे आहे. तहसील कार्यालयात परिसरात असा प्रकार घडत असल्यास तक्रारीनुसार चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, मुद्रांक विक्रेत्यांनी शासकीय शुल्कापेक्षा जादा रक्कम घेऊ नये. -कृष्णा राऊत, दुय्यम निबंधक अधिकारी, सिंदेवाही
चंद्रपूर : सावली तालुक्यातील दाबगाव मौशी येथील उच्चशिक्षित युवकाचा युरोपातील ऑस्ट्रिया देशातील युवतीशी प्रेमविवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. युवतीला थेट गावात आणून बैलबंडीतून वरात काढत अतिशय साध्या पद्धतीने विवाह केला. या अनोख्या प्रेमविवाह सोहळ्याची जिल्ह्यातभरात होत असून चित्रफिती समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्याला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्तेष्ट सहभागी झाले होते.
आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या सुकरू पाटील आभारे यांचा एकुलता एक मुलगा हेमंत उच्च शिक्षित असून विदेशातील एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याचे ऑस्ट्रिया देशातील युडीश हरमायनी प्रित्झ, रा. बियेना ऑस्ट्रिया या युवतीशी प्रेमसंबंध जुळून आले. दरम्यान, दोघांनीही लग्न करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी थेट आपले गाव गाठले. आईवडिलांच्या परवानगीनंतर लग्नाची तारीख ठरविण्यात आली. मात्र, गावात समारंभ युक्त सभागृह नसल्याने थेट स्वतःच्या शेतातच लग्न करण्याचे ठरले. कोणताही मंडप किंवा बडेजावपणा न करता शेतातील एका झाडाखाली लग्नविधी सामाजिक रीतिरिवाजाप्रमाणे पार पाडण्यात आला. आधुनिक युगात नावीन्यपूर्ण आणि दिखाऊपणाचा बाज न आणता जुन्या पद्धतीच्या बैलबंडीने वाजतगाजत वरात काढण्यात आली होती. या समारंभाला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्तेष्ट उपस्थित होते.
बैलबंडीने निघालेल्या वरातीत विदेशातून दाखल झालेल्या पाहुण्यांनी डिजे, बॅन्डच्या तालावर नृत्यृ, डान्स केला. चंद्रपूरच्या सावलीतील युवकांने थेट युरोपातील आस्ट्रिया येथील विवाह केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून या विवाह सोहळ्याच्या चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाली आहे. जागतिक प्रेमदिनाच्या दोन दिवस पूर्वीच हा विवाह सोहळा अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. लग्नपत्रिकेपासून तर मंगलाष्टके, हळद, संगीत व विवाह समारंभातील सर्व आवश्यक कार्यक्रम भारतीय पध्दतीने येथे पार पडले. विदेशी पाहुणे भारतीय पध्दतीने साजरे होणारे लग्न बघून आनंदीत झाले.
चिमुर : भिसी येथील आखर चौकापासून पाचशे मीटर अंतरावरील दसरा मैदानाच्या जवळ, निर्जन स्थळी असलेल्या शामराव मुंगले यांच्या गोठ्याबाहेर बांधून असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. बैलाला ठार केल्याची घटना ९ फेब्रुवारी शुक्रवारला पहाटे चार वाजताच्या दरम्यान घडली.
शामराव मुंगले यांचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले. वन विभागाला सकाळी नऊ वाजता घटनेची माहिती मिळताच भिसीचे उपवन परिक्षेत्र अधिकारी संतोष
औतकर घटनास्थळी गेले. घटनास्थळी त्यांना वाघाचे पदचिन्ह आढळून आले. सदर भागात वन विभागाकडून ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला असून वन कर्मचाऱ्यांना गस्त वाढविण्याची सूचना संतोष औतकर यांनी दिली आहे. जंगललगत असलेल्या भिसी व परिसरातील जवळपास १५ गावातील शेतकरी, पशुपालक नागरिकांना वाघ व बिबट यांचा त्रास असल्याचे वृत्त दै. देशोन्नतीने वांरवार आधीच प्रसिद्ध केले होते. वाढोना येथे आठ दिवसाआधी एक बैल ठार केला . दिवसेंदिवस वाघ व बिबट यांचे हल्ले वाढतच चालले आहेत.
सर्वांसाठी घरकुल योजनेच्या धर्तीवर 'मॉ फातिमा' आवास योजना लागू करा - आबीद अली
कोरपना :-
'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अख्ख्या देशात साजरा होत असतानाच गेल्या जवळपास 5 दशकांपासून 'गरीबी हटाओ'चा नारा देत 1980 पासून बेघर कुटुंबाना,घरे देण्यासाठी 'इंदिरा आवास योजना,राजीव गांधी निवारा योजना' टप्पा 1 टप्पा 2, 'कोलाम वस्ती निवारा योजना' 2014 पर्यंत राबविण्यात आल्या.देशात 'सबका साथ,सबका विकास' नारा देत सर्वांसाठी घरे व योजनेची व्याप्ती वाढवीत वेगवेगळ्या घरांसाठी सामाजिक,आर्थिक,भूमिहीन भटक्या- जमातीसाठी वेगवेगळ्या योजना तयार करून,पात्र घटकांसाठी निवारा योजना तयार करून त्याचा लाभ देण्यात येत आहे.तरी मुस्लीम समाजाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी शासनाच्या इतर योजनांच्या धर्तीवर मुस्लीम समाजासाठी केंद्र व राज्याच्या निधीतून मुस्लीम समाजाच्या प्रथम शिक्षिका 'मॉ फातिमा' यांच्या नावाने आवास योजना लागू करून मुस्लीम समाजाला हक्काचा निवारा,योजना मंजूर करावी, मुस्लीम समाजाला हक्काचा निवारा देवून अन्याय दूर करावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस{दादा} प्रदेश सहसचिव सैय्यद आबीद अली,यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,अल्पसंख्याक कल्याणमंत्री अब्दुल सत्तार,यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वास्तविक पाहता मुस्लीम समाजाची शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक बाजू हलाखीची असून झोपडपट्टी वसाहतीत अत्यंत दैनीय निवारा व्यवस्था असल्याने तसेच या समाजातील अनेक कुटुंब सर्वसाधारण घटकात मोडत असल्याने यांना निवारा हक्कापासून व विकासाच्या प्रवाहातून बाहेर टाकले जात असून नाममात्र कुटुंबांना लाभ मिळत असल्याने आजही अनेक कुटुंब लाभापासून वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कित्येकांना हक्काचा निवारा प्राप्त झाला नसल्याची विदारक परिस्थिती असताना मायबाप सरकार केंद्र व राज्याच्या माध्यमातून अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास योजना, कोलाम वस्ती विकास योजना,अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना,विमुक्त,भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण सामुहिक निवारा योजना,इतर मागासवर्गीय कुटुंबांसाठी मोदी आवास योजना,सर्वांसाठी निवारा योजना राबवित असतानाच राज्यात अल्पसंख्यांक मुस्लीम समाजासाठी स्वतंत्र आवास योजना,शहरी व ग्रामीण भागासाठी लागू करण्याची मागणी गेल्या जवळपास 10 ते 15 वर्षापासून केली जात आहे.
मात्र,शासनाकडून न्या.सच्चर समिती,डॉ. महेमूदूर रहेमान समिती,अहवालात अल्पसंख्यांक मुस्लीम समाजात सोयी-सुविधा निवारा,शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक क्षेत्रात पिछाडीवर व दैनीय अवस्थेचा आराखडा सादर करूनही मुस्लीम समाजाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेतला जात नाही आहे.यासाठी शासनाच्या इतर योजनांच्या धर्तीवर मुस्लीम समाजासाठी केंद्र राज्याच्या निधीतून 'मॉ फातिमा' यांच्या नावाने मुस्लीम समाजासाठी आवास योजना लागू करून मुस्लीम समाजाला हक्काचा निवारा,योजना मंजूर करावी,मुस्लीम समाजाला हक्काचा निवारा देवून अन्याय दूर करावा,अशी मागणी अली यांनी केली आहे.आता मायबाप सरकार मागणीला सकारात्मक प्रतिसाद देतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिमूर : - दिनांक.२४/०१/२०२४ ला ऋषी वानोसा हजारे, वनरक्षक नियतक्षेत्र गदगाव हे सहका-यासह रात्रों १० वाजताचे दरम्यान गस्तीवर असतांना गदगाव - उरकुडपार रस्त्यावर वनक्षेत्राकडे जाणाऱ्या मार्गाजवळ रात्रो १०:३० वाजता सोनु धाडसे, रा. तिरखुरा व राकेश झिरे बाबु गोंडपीपरी तहसील चे कर्मचारी रा. चिमुर या दोघांनी मिळून आमचे रेतीचे ट्रॅक्टर जंगलातील नाल्यावर का चालू देत नाही ? असे म्हणत अश्लील शब्दात शिविगाळ करीत कॉलर पकडून रोडवरुन शेतातील बांदीमध्ये मारत व ढकलत नेले तसेच खाली पाडून लाथा-बुक्यांनी मारहाण केली. माझ्या सोबत असलेले जर्नाधन रामचंद्र सातपुते, रा. गदगाव यांनी मला सोडविले त्यानंत्तर ते दोघेही त्या ठिकाणाहून मोटार सायकल घेवून निघून गेले. त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमुर यांना दिली. असता थोड्याच वेळात के. बी. देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकरी (प्रादेशिक) चिमुर, यु. बी. लोखंडे, क्षेत्र सहाय्यक, मुरपार आर. डी. नैताम, वनपाल (स.व.अ.नि.) खडसंगी (चिमुर) अक्षय मधुकर मेश्राम, वनरक्षक नियतक्षेत्र चिमुर, व अमर प्रभुदास पोटे, वनरक्षक (स.व.अ.नि.) खडसंगी (चिमुर) हे घटनास्थळी हजर झाले त्यानंत्तर मी त्यांचे सोबत पोलीस स्टेशन चिमुर येथे जाऊन तक्रार दिली.FIR क्र.००४१ दिनांक २५/०१/२०२४ ला भा. द. वी. कलम ३५३, २९४ ,५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार असल्याने पोलीसांची तपास मोहीम सुरू आहे.