PostImage

विदर्भ फायर न्यूज

Dec. 26, 2024   

PostImage

फेक पोस्ट आणि व्हिडीओ टाकणाऱ्यावर कारवाई होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …


फॉरवर्ड करणाराही दोषी ठरविणार

 

नागपूर: सोशल मिडियावर समाजात असे खोटे आणि द्वेष पसरवणाऱ्यांची आता खैर नाही. जो कोणी समाजविघातक, फेक पोस्ट करेल त्याच्यावर आणि फॉरवर्ड करणाऱ्यालाही दोषी ठरवून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपुरातील प्रेस क्लब येथे आयोजित परिषदेत दिली.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तंत्रज्ञानाचा चांगल्या कामासाठी उपयोग न करता वाईट कामासाठी जास्त उपयोग होताना दिसून येत आहे. आजच्या घडीला सायबर गुन्हे ही सध्याची सर्वात आव्हानात्मकबाब आहे. तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, पण काही कुप्रवृत्तीचे लोक त्याचा अयोग्य वापर करत आहेत. ते लोकांची दिशाभूल करण्याचे काम करतात, खोटे वर्णन तयार करून दोन जातींमध्ये भेदभाव निर्माण करतात, पण आता सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

 

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना सुधारण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विदर्भ, राज्य, विकास, शेतकरी यासहविविध प्रश्नांवर भाष्य करत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी सायबर गुन्ह्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सायबर गुन्हे हे सध्या सर्वात आव्हानात्मक आहे. झपाट्याने वाढत आहे.

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'सोशल मीडियाच्या माध्यमातून एडिट केलेले व्हिडिओ किंवा खोटे व्हिडिओ पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशागुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याचे काम सुरू आहे. सध्या आम्ही सर्वांना पकडण्यास सक्षम आहोत. सोशल मीडियाचा आमच्याकडे डिजिटल फुटप्रिंट आहे. जे काही केले जात आहे, ज्याच्या अंतर्गत पोस्ट आणि फॉरवर्ड कोणीही शोधले जाऊ शकते. यासोबतच आता चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणारी व्यक्तीच नाही तर ती फॉरवर्ड करणारी व्यक्तीही दोषी असेल, असेही फडणवीस म्हणाले.

🟠बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वक्तव्य केले. बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच कुणीही बीड आणि परभणीचे पर्यटन करू नये, असेही फडणवीस म्हणाले.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Dec. 26, 2024   

PostImage

चुकीची पोस्ट किंवा चुकीचा व्हिडियो तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे …


नागपूर : चुकीची पोस्ट किंवा चुकीची चित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आणि ती पोस्ट किंवा चित्रफित फॉरवर्ड करणे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यांच्याविरुद्ध सायबर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर पत्रकार क्लब यांच्यातर्फे बुधवारी मुख्यमंत्र्यांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते एका प्रश्नावर बोलत होते.

 

पोस्ट फॉरवर्ड करणारे गुन्हेगार

सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञानाचा जर चांगला उपयोग आहे. तसेच काही नालायक, दृष्ट लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांना लुबाडण्याचे काम करीत आहेत. समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जाती-जातींमध्ये विद्वेष निर्माण करीत आहेत. राज्यात सायबर जागरूकता अभियान सुरू केले जाणार आहे. आपण ‘सायबर सिक्युरिटी प्लॅटफार्म’ तयार केला आहे, असेही ते म्हणाले. मी सभागृहात नक्षलवाद्यांविषयी बोललो. पण, ते वगळून केवळ संविधानाला मानत नाही. एवढी चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहे. पण, मी सांगू इच्छितो, अशाप्रकारची चित्रफित कोणी केली आणि ती कुणी-कुणी फॉरवर्ड केली, हे लगेच शोधून काढणे शक्य आहे. मोडतोड करून चित्रफित तयार करणारा गुन्हेगार तर आहेच. पण, ते फॉरवर्ड करणार सहआरोप होतो, असा इशाराही फडवीस यानी दिला.

 

 

भाजपचे आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यंनी मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी आहे. त्या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील. एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिले, अशा पद्धतीने काम करेन. प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे सरकार चालावे, असे माझा कायम आग्रह राहिला आहे. त्यानुसार राज्याचा कारभार चालवण्यात येईल, असेही ते म्हणाले. राजकारणात कुठल्याही पातळीवर जाऊन आव्हान निर्माण केली जातात. पण, धैर्यपूर्वक त्या आव्हानाला सामोरे गेलो. मी सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाऊ दिली नाही. सत्ता हे सेवेचे माध्यम आहे, असे मी मानतो, असेही म्हणाले.

 

 

 

राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे विदर्भातील १० लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कायापालट होणार आहे. हे प्रकल्प अनेक पिढ्यांवर परिणाम करणारे आहेत. गडचिरोली जिल्हा स्टील सिटी म्हणून उदयास येत आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Nov. 29, 2024   

PostImage

दिल्लीने ठरवले, देवेंद्र सीएम ! शाह यांचे शिक्कामोर्तब मंत्र्यांच्या खात्यांच्या …


 

दिल्ली/मुंबई. महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. लवकरच त्याची औपचारिक घोषणा केली जाईल. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाला संमतीही दिली. याआधी बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रपरिषदेत शिंदे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय घेतील, तो त्यांना मान्य असेल, असे स्पष्ट केले होते.

 

दिल्लीतील बैठकीनंतर भाजपा आपली निरीक्षक टीम मुंबईला पाठवणार आहे. मुंबईत होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे. २ डिसेंबर रोजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीसाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अमित शाह यांच्यासह भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व महत्त्वाच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे.

 

मात्र, यापूर्वी ते मुख्यमंत्रिपदावर ठाम होते. मात्र दिल्लीतून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोन आल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र, त्यांच्या देहबोलीवरून ते मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत नाखूशअसल्याचे दिसून आले. दिल्लीत झालेल्या बैठकीत शाह यांनी शिंदे यांना गेल्या वेळी भाजपाचे जास्त आमदार असतानाही आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केले होते. अशा परिस्थितीत यावेळी त्यांनीही त्यागासाठी तयार राहावे. मात्र, या बदल्यात त्यांना केंद्रात कॅबिनेट पद आणि राज्यमंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासन शिंदे यांना देण्यात आले. शिंदे यावर समाधानी असल्याचे समजते.

 

🟠शिंदे, अजितदादा यांचे मलाईदार खात्यांवर डोळे

अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांच्या विभाजनावरही चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थमंत्रालय तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या बदल्यात शिंदे यांनी भाजपकडे मलईदार खात्यांची मागणी केली आहे. महसूल विभागाव्यतिरिक्त त्यांचे लक्ष विशेषतः कृषी आणि ग्रामीण विकासावर आहे.

 

 

 

🟠उपमुख्यमंत्रिपद फक्त एकनाथ शिंदे यांच्यासाठीच

 

मुंबई / दिल्ली. भाजप सर्वांत मोठा पक्ष असल्यानंतरही २०२२पासून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. आता नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेनेतील केवळ एकनाथ शिंदे यांच्यासाठीच असेल, अन्य व्यक्तीचा विचार होणार नाही, असे भाजपतर्फे स्पष्टच सांगण्यात आल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतील त्याला व्यक्तीला मुख्यमंत्रिपदासाठी आपला पाठिंबा असेल, असे जाहीर केले होते. त्यानंतर तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीत अमित शाह यांना भेटणार होते. त्यापार्श्वभूमीवर शिंदे यांनी मुलगा श्रीकांतचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी दिल्याचे समजते. भाजपने हा प्रस्ताव फेटाळला असून नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतील अन्य कोणत्याही नेत्याचे नाव चालणार नाही. केवळ एकनाथ शिंदे यांचेच नाव चालणार आहे, असे भाजपने स्पष्टच बजावल्याचे समजते.

 

🟠आमदारसंख्येमुळे भाजपाचेच जास्त मंत्री - भुजबळ

 

निवडणुकीत भाजपाचे १३२ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असतील. तसेच मुख्यमंत्रीही भाजपाचा होत असेल, तर त्यावर हरकत घेण्याचे कारण नाही, असा पुनरुच्चार राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. महात्मा फुले यांच्याअभिवादन सोहळ्यानिमित्त नाशकात आलेले भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यावर ते म्हणाले, महायुतीतील तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय घेतील म्हणून उशीर होत असला तरी, यापुर्वीही निर्णय घेण्यास महिन्यांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे येत्या एक, दोन दिवसांत हा तिढा सुटू शकतो. राज्यात सत्तांतर झाले तेव्हा फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे वाटत होते.

 

जळगाव आवृत्ती

 

29 नोव्हेंबर 2024 पृष्ठ क्र. १

 

द्वारा समर्थित: Navarashtra.com