Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठी सीझन ५ चा काल ग्रँड फिनाले पार पडला. या ७० दिवस चाललेल्या या शोमधून सर्वच सदस्यांनी खूप चांगले आणि उत्तमरीत्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. त्यावेळी त्याला खूप काही सहन कराव लागत होतं. लोकांचे टोमणे अश्लील शब्दात केलेली कमेन्ट या बऱ्याच गोष्टीचा त्याला सामना करावा लागत होतं. पण जेव्हा बिग बॉस ने त्याला त्याच टेलेंट दाखवण्याची संधी दिली. आणि त्या संधीच त्याने सोन केलं. तेव्हा सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, आणि सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष त्यामुळे त्याच निखळ मनाने केलेले टास्क गेम सगळे उत्तमरीत्या पार पाडले म्हणूनच सम्पूर्ण सिजनमधील खेळ चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला.