गडचिरोली:- सम्राट अशोक बुद्ध विहार अशोकवन कालनी गोकुळनगर गडचिरोली येथे माता रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनिता लाटीलवार होत्या प्रमुख अतिथी अमिता भैसारे , कृष्णा भैसारे , प्रेमलता कान्हेकर , सध्या अलाम होत्या . अमिता भैसारे म्हणाल्या की . रमाईचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आजच्या महिलांनी समाज घडविल्यास आदर्श नागरिक तयार होतील . त्यामुळे भारताची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही . या प्रसंगी कृष्णाजी भैसारे , प्रेमलता कान्हेकर ,सुनिता लाटीलवार, सध्या अलाम , स्मिता म्हशाखेत्री यांनी आपले विचार मांडले .
सुरुवातीलां त्रिशरण पंचशिल ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सचालन बेबी उदिरवाडे यांनी केले . प्रास्ताविक प्रियंका साखरे यांनी केले तर आभार युविका गोवर्धन यांनी मानले .
या कार्यक्रमाला कल्याणी गोंडाणे , शुभांगी देवगडे , कल्पना अंबादे, कोमल भैसारे , सुकेशिनी रामटेके , लक्ष्मी साळवे , मंगला बाबनवाडे , वृशाली उंदिरवाडे , भोजराज कान्हेकर , दामोधर शेंडे , भिमराव गोंडाणे , यशोधरा शेंडे , माया जनबंधू , अरुणा उंदिरवाडे , निशा बोदेले , संगिता मेश्राम , किरण निकोसे , रंजना मेश्राम , सुरेखा ठाकूर व समाज बांधव उपस्थित होते .
गडचिरोली:- बोधीवृक्ष परिसर सेमाना रोड गडचिरोली येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल उराडे होते तर प्रमुख मार्गदर्शक भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , प्रमोद राऊत एम एन टिव्ही चॅनल , संपत गोडबोले ' मोतीराम कोटांगले होते . या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल उराडे म्हणाले की , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना रमाई पत्नी मिळाल्याने समाजाचा फार मोठा उध्दार झाला . तसेच भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष म्हणाले की, माता रमाईच्या त्यागामुळे डॉ .बाबासाहेब आबेकडकरांना समाजाची सेवा करण्यास अधिक प्रेरणा मिळाली . येवेळी प्रमोद राऊत , संपत गोडबोले , मोतिराम कोटांगले योनी आपले विचार व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे संचालन तुळशिराम सहारे यांनी केले . प्रास्ताविक भगवान राऊत यांनी केले तर आभार नामदेव दुधे यांनी मानले .
या कार्यक्रमात विजया धुरके , वैशाली मेश्राम , आचल जुनघरे , ज्योती उराडे , लता रामटेके , नलीनी दुधे , पदमा कांबळे , मोतीराम कोटांगले , दिपीका रायपूरे, शांताबाई खोब्रागडे उपस्थित होते .
गडचिरोली -:
विहान बहुउद्देशिय संस्था संचालीत तिरंगा मेरी शान प्रकल्पा अंतर्गत मेरा गाव मेरी पहचान,मेरा स्कुल मेरा अभिमाण या परियोजना प्रकल्पाची सुरुवात यशोदा धर्माजी निकुरे यांच्या मरण दिवसा निमित्य 26/11/2023 रोजी सुरुवात करण्यात आली या परियोजना मध्ये गावातील सर्व नागरीक व शाळेचे विद्यार्थी यांना आतापर्यंत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात 50 हजार स्टुडन्ट ला मोफत यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड वितरण करण्यात आले या कार्ड चा लाभ ऍक्सरे व प्लास्टर ला झालेला खर्चाला आर्थिक मदत म्हणून 50% रक्कम संस्था देणार त्यात नुकताच जिल्हा परिषद उच्छ प्राथमिक शाळा भवराळा ता. मूल,जी. चंद्रपूर या शाळेतील सातव्या वर्गातील विध्यार्थी अनार्य मनोज दुधे याच्या हाताला दिनांक 30/12/2024 ला अपघात झालेला आहे असे वर्ग शिक्षक व विद्यार्थी चे पालक मनोज दुधे यांनी माहिती दिली x-ray व प्लास्टर साठी काही आर्थिक खर्च झालेला आहे व आपण यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड च्या माध्यमातून आज दिनांक 03/02/2025 ला अर्धा खर्च विहान बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे व व्हॉइस चेअरमन सौ.मनाली कबिर निकुरे,व तनुष्का कबिर निकुरे यांनी काही आर्थिक नुकसानी चे भरपाई म्हणून अनार्य दुधे ला नगदी स्वरूपात आर्थिक मदद करण्यात आली,, संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे, व्हॉइस चेअरमन सौ. मनाली कबिर निकुरे, तनुष्का कबिर निकुरे व जिल्हा परिषद भवराळा शाळेचे प्रिन्सिपल एकनाथ गेडाम सर , शिक्षिका अनघा जक्कुलवार, देवांगणी सुरपाम, मनोज दुधे सर यांनी तर आपल्या शाळेत आपल्या मुलाला नेवून शिक्षण देत आहेत असे फार कमी बघायला मिळते आपल्या मुलाला आपल्याच शाळेत नेवून शिक्षण देणारे एकमेव शिक्षक मनोज दुधे यांना सॅल्यूट,,,,संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत नियमानुसार आर्थिक मदत देण्यात आली.
संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे है नेहमीच कुणाची ना कुणाची मदत करीत राहतात व 2008,पासून सामाजीक कार्यात सक्रीय आहेत हे सर्वांची गोरगरिब असो स्वास्थ ने खचलेले असोत हे मदत करित असतात. संस्थेच्या वतीने आतापर्यंत दुर्धर आजार ग्रस्तचे , जोडप्यांचे लग्न सुद्धा लावुन देतात कोरोना 2020 मधे गरीब लोकांना अन्न धान्य वाटून खूपच मोलाचे काम त्यांनी केले आहे.
हा आर्थिक मदत कार्यक्रम जिल्हा परिषद भवराळा शाळेच्या आवारात पार पाडण्यात आला यावेळी कार्यक्रमात उपस्थित विहान बहुउद्देशिय संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे संस्थेचे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
गडचिरोली : येथील फुले वार्डात नागरिकांच्या तक्रारी वरून आजाद समाज पार्टीने वॉर्डातील आयुष्यमान आरोग्य केंद्राला भेट दिली असता गेल्या 15 -20 दिवसापासून दवाखान्यात डॉक्टरच उपलब्ध नसल्याची माहिती उघडकीस आली. शहरातील इतर वार्डातील माहिती घेतली असता बरेचदा डॉक्टर च उपस्थित राहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर डॉक्टर आणि कर्मचारीच नाही तर शासनाने मोहल्ल्यात दवाखाना कशासाठी उघडला असा सवाल उपस्थित केला. शहरातील गोर, गरीब, मजूर, कामगार लोकांना तातडीने मोफत उपचार घेता यावा या करीता असे हॉस्पिटल शासनाने वार्डा वार्डात सुरु केले पण कर्मचाऱ्यांची अभावी ही दवाखाने ओस पडल्याचे चित्र शहरात आहे.
जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे असल्याने आरोग्य विभागात मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकाच डॉक्टर ला 2 ते 3 दवाखान्यात जावे लागते. त्यामुळे नागरिकांना व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लवकरच आजाद समाज पार्टी च्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे या संदर्भात मागणी करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. दवाखान्यात भेटी दरम्यान जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार,, आशिष गेडाम, गडचिरोली शहर सचिव कैलास रामटेके उपस्थित होते.
गडचिरोली : "गणतंत्र" दीनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पाटी गडचिरोलीच्या वतीने स्थानिक जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसेच जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, रॉ.कॉ. उपाध्यक्ष योगेश नांदगाये, उपाध्यक्ष फहीमभाई, प्रा. ऋषीकांत पापडकर, जिल्हा सचिव कपील बागडे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, युवक तालुका अध्यक्ष कुणाल चिलगेलवार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संदीप बेलखडे, जिल्हा सचिव संजय शिंगाडे, फहीम काझी, प्रसाद पवार, लंकेश सेलोटे, प्रणय खैरे, अंकुश झरली, ओझु आकुलवार, समय्या पसुला, तुकाराम पुण्यपवार, ममता ताई, अनिताताई कोलते, राजु वसाके, तुषार रोहणकर, महेश कुळमेथे आदी उपस्थित होते.
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्याला विकासाचे रोलमॉडेल बनविण्याच्या दिशेने शासनाने ठोस पावले उचलली असून, स्थानिक गरजांची पूर्तता व शाश्वत विकासाच्या उद्देशाने सुसंगत व गुणवत्तापूर्ण नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजना व खनिकर्म निधीतून होणाऱ्या खर्चाचा आढावा राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी आज नियोजनभवन येथे घेतला. यात जिल्ह्याचा एकंदरीत विकास आराखडा कसा करता येईल आणि नाविण्यपूर्ण योजना कशाप्रकारे राबविता येईल यावर चर्चा करण्यात आली. बैठकीला आमदार डॉ. मिलींद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार प्रामुख्याने उपस्थित होते.
सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी जिल्ह्याच्या एकंदर विकासासाठी नावीन्यपूर्ण योजना राबविण्याची गरज व्यक्त केली. रोजगारनिर्मिती करणाऱ्या योजनांवर भर देऊन स्थानिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी निधीचा योग्य वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी मिशन मोडवर काम करण्याचे आणि केवळ खर्च करण्याऐवजी नियोजनपूर्वक विकासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील खानबाधित क्षेत्रातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी खनिकर्म निधीचा प्रभावी उपयोग करण्यात यावा, अशी सूचना जयस्वाल यांनी दिली. जिल्हा विकासासाठी निधीची अडचण नसून योग्य नियोजनाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील विविध गरजा ओळखून त्या पुरवठ्याच्या दृष्टीने कार्यरत राहण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी डिस्ट्रीक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करण्याचा आग्रह धरत, सॅच्युरेशन मोडमध्ये जाऊन विविध विभागांची उद्दिष्टे पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, जलसंधारण आणि मानव विकास यांसारख्या विभागांचा आढावा घेण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे विकसित करणे, अतिक्रमण होऊ शकणाऱ्या जागांवर संरक्षण भिंती बांधणे आणि भौगोलिक क्षेत्रानुसार रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रोजगारातून महिलांचे व युवकांचे सक्षमिकरण या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे वार्षिक योजना आराखड्याची माहिती दिली. 641 कोटी रुपयांच्या मंजूर आराखड्यातून 265 कोटी 45 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी 216 कोटी 39 लाख रुपये विविध यंत्रणांना वितरीत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली :-आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलत आता प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी गोटुल केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आरमोरी येथे आयोजित गोटुल महोत्सव, सांस्कृतिक कला व क्रीडा स्पर्धेनिमित्त बोलताना ही घोषणा केली. यावेळी खासदार नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आ. रामदास मसराम उपस्थित होते.
डॉ. उईके म्हणाले की, "राज्य शासनाने आदिवासी समाजाच्या विकासासाठी व्यापक धोरण आखले आहे. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज गोटुल केंद्र स्थापन केले जाईल. आगामी सहा महिन्यांत आरमोरी येथे गोटुल केंद्राच्या भूमिपूजनासाठी मी स्वतः उपस्थित राहीन," असा शब्द त्यांनी दिला.
डीबीटी प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांरण (डीबीटी) सुलभ करण्यासाठीही शासनाने ठोस नियोजन केले असल्याचे मंत्री उईके यांनी स्पष्ट केले. "आता विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या खात्यात डीबीटी रक्कम थेट जमा होईल. यासाठी आंदोलनाची गरज भासणार नाही," असे ते म्हणाले.
पेसा अंतर्गत पदभरतीचे नियोजन
पेसा योजनेअंतर्गत पुढील सहा महिन्यांत पदभरतीचे नियोजन करण्यात येत असून, त्याद्वारे आदिवासी समाजातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजासाठी एकत्रित प्रयत्नांचे आवाहन
पक्षीय मतभेद विसरून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री उईके यांनी केले.
गोटुल महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी संस्कृती आणि कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाने स्थानिक नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली दि: :-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आज भेट देऊन रुग्णालयातील विविध विभाग आणि सुविधा यांची पाहणी केली. भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधून रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांबाबत माहिती घेतली. त्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक विभाग, अपघात विभाग, ट्रॉमा वार्ड, बाह्य रुग्ण विभाग, डायलेसिस युनिट, केमोथेरपी विभाग, ऑक्सीजन प्लांट आणि औषध भांडार यासह रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. त्यांनी आकस्मिक आणि अपघात विभागातील उपलब्ध उपकरणे आणि सुविधा तपासून पाहिल्या. बाह्य रुग्ण विभागातील औषध पुरवठा व त्याची वैधता याबाबत सविस्तर चर्चा केली आणि औषधीची वैधता व त्यांचे परवाने प्रमाणपत्र तपासूनच पुरवठा करण्याचे निर्देश दिले.
एनसीडी विभागामध्ये तपासणीसाठी शुगर आणि रक्तदाब तपासणी किट उपलब्ध असल्याची खात्री केली. दंत चिकित्सा विभागामध्ये उपलब्ध रूट कॅनल, बॉयोप्सी आदी सेवा तसेच उपकरणांची कार्यक्षमता तपासली. रुग्णालयाच्या ऑक्सीजन प्लांटची माहिती घेऊन त्याच्या कार्यक्षमतेची खात्री केली.
याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील डायलेसिस युनिटच्या विस्ताराची आवश्यकता ओळखून तालुकास्तरावर अधिक खाटांची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव सुचवला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णालयात मेडिकल स्टोअर निर्माण करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हा शल्य चिकित्सक व अधिष्ठात्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत उपविभागीय
अधिकारी राहुल मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी एच. विके (किलनाके), तसेच सामान्य रुग्णालयातील प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. मनिष मेश्राम, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी ( बाहय संपर्क )बागराज धुर्वे, तसेच रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मूलचेरा : तालुक्यातील भगतनगर येथील सार्वजनिक श्रीश्री राधागोविंद भजन मंदिर येथे आयोजित अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस समन्वयक अहेरी विधानसभा क्षेत्र व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून पूजन करत आशीर्वाद घेतले.
मुलचेरा तालुक्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील अनेक गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगतनगर येथे अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता.आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडले.तसेच मंदिरास विधिवत पूजन करत आशीर्वाद घेतले.
यावेळी सुकुमार गोविंदास,नितेश मलिक,वसीम चक्रवत्री,संजय बॅनर्जी,राम मिस्त्री,बनवली मशनव,पूलक तालुकदर ग्रामपंचायत सदस्य,उल्लू व्यापारीसह परिसरातील नागरिक तसेच स्थानिक नागरिक,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली : जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते बांधकामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिले. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग बांधकामांमध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती एकत्र करून ती सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत रस्ता विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना(गडचिरोली), श्रीमती मानसी(देसाईगंज), अमित रंजन(चामोर्शी), नमन गोयल (एटापल्ली), सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे, बळवंत रामटेके (आलापल्ली), आर.बी. कुकडे (विशेष प्रकल्प सिरोंचा), राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋशिकांत राऊत, चंद्रशेखर सालोडकर (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना), जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री दोरखंडे, उपअभियंता राजेंद्र कटकमवार(विद्युत उपविभाग) सहायक अधीक्षक अभियंता दिनेश पाटील, सुमित मुंदडा प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग आलापल्ली ते गुंडेनुर, चामोर्शी-आलापल्ली-सिरोंचा, आरमोरी गडचिरोली, चातगावव धानोरा मार्ग, कोरची ते कुरखेडा तसेच दक्षिण गडचिरोली व उत्तर गडचिरोलीतील महामार्गाच्या बांधकामाबाबत आढावा घेतला. आरमोरी ते गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग नव्याने बांधकामासाठी 746 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे संबंधितांनी सांगितल्यावर सदर काम पूर्ण होईपर्यंत सध्याच्या मार्ग दुरुस्तीसाठी तसेच पावसाळ्यात पाल नदीवर नागपूर मार्ग बंद होत असल्याने याबाबत अडचणी कशा सोडवता येतील यावर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात विशेषता चामोर्शी व एटापल्ली तालुक्यात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असून यामुळे राज्य महामार्ग लवकर खराब होतात. भविष्यात या मार्गावर जड वाहतूक अधिक वाढणार असल्याने या मार्गाच्या गुणवत्तेत अधिक वाढ करण्यासाठी ज्या निकषांच्या अधीन राहून हे मार्ग बांधण्यात येतात, त्यात बदल करण्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात 234 पुलांच्या निर्मितीची आवश्यकता आहे, मात्र यासाठी एकत्रितपणे मोठा निधी उपलब्ध होण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून महत्त्वाच्या पुलांचे प्रस्ताव टप्प्याटप्प्याने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी तसेच या आर्थिक वर्षात मंजूर प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याबाबत एप्रिलमध्ये पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला बांधकाम विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००
गडचिरोली :- गडचिरोली जिल्हयात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम 2025 व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ राबविण्यात येणार आहे.
हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ प्रभावीपणे राबविण्याचे दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
*हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार (IDA) मोहीम*
हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम गडचिरोली जिल्यातील धानोरा, गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा, वडसा, आरमोरी, व चामोर्शी या सात तालुक्यात हि मोहीम राबविण्यात येणार आहे.
हत्तीरोग आजार हा जिल्ह्यातील आरोग्याची गंभीर समस्या असून या आजारामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम दिसून येतात. याकरिता शासनाने हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रम सामुदायिक औषधोपचार मोहिमेंतर्गत डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यासोबातच आयवरमेक्टीन या तीन औषधांचा वयोगट व उंचीनुसार उपचार देऊन हत्तीरोग निर्मुलन करता येऊ शकते. याकरता गडचिरोली जिल्यातील सात तालुक्यातील ७७१३७१ लोकसंखेला हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार (IDA) मोहीम कालावधीत गृहभेटी दरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांच्या समक्ष २ वर्षापेक्षा कमी वयाची बालके व गरोदर माता तसेच गंभीर रुग्ण वगळून सर्वाना हत्तीरोग विरोधी गोळ्यांचा डोस दिला जाणार आहे. या मोहिमेत सात तालुक्यातील लाभार्थींनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचा डोस घेण्याचे आवाहन राजेंद्र भुयार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प गडचिरोली यांनी केले आहे .
*कुष्ठरोग शोध अभियान २०२५*
"कुष्ठरोग शोध अभियान २०२५ ही मोहिम दिनांक ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राबविण्यत येणार आहे. संपुर्ण जिल्हयात कुष्ठरोग शोध अभियान २०२५ दिनांक 31/01/2025 पासुन 14 फेंब्रुवारी पर्यंत राबवली जाणार आहे. सदर मोहिमेत एकूण १०७९९७२ एवढ्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षण करण्याकरीता आशा वर्कर व पुरुष स्वयंसेवक यांची टिम तयार करून ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घरोघरी जावून प्रत्यक्ष लोकांची तपासणी करण्यात येणार आहे व शोधण्यात आलेल्या संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करुन निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांना त्वरीत औषधपचार करण्यात येणार आहे.तरी सदर कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी करण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन डॉ प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी करण्यात येत आहे.
"कुष्ठरोग शोध अभियान २०२५ व हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना अविश्यांत पंडा जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. जिल्हास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी यांचे हत्तीरोग औषधोपचार मोहिम व कुष्ठरोग शोध अभियान बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी, उपस्थित होते तसेच राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून डॉ. समाधान देबाजे, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार व जिल्हा स्तरीय प्रशिक्षक म्हणून डॉ सचिन हेमके सहाय्यक संचालक (कुष्ठरोग),डॉ प्रेरणा देवताळे वैद्यकिय अधिकारी कुष्ठरोग, डॉ पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी उपस्थित होते तसेच सदर प्रशिक्षणास जिल्हास्तरीय अधिकारी डॉ. अमित साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ प्रफुल गोरे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ रुपेश पेंदाम हत्तीरोग अधिकारी गडचिरोली, डॉ. अविनाश दहीफळे, हत्तीरोग अधिकारी धानोरा,तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिकारी, हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी , तालुकास्तरीय पर्यवेक्षक उपस्थित होते.
गडचिरोली : सध्या मकरसंक्रांतीच्यापर्वावर पतंगबाजीला चांगलेच उधाण आले आहे. शहरातील रस्त्यांवर लहान मुलांसह तरुणही पतंग उडवताना दिसत आहेत. दरम्यान शाळेतून घराकडे जाणाऱ्या दुचाकीस्वार नायलॉन मांजाने जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. १३) दुपारी ४.३० वाजता शहरातील धानोरा मार्गावरील लांझेडा परिसरात घडली. शैलेश आकरे (३५) असे जखमीचे नाव असून ते स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
नुकताच गडचिरोली शहर पोलिसांनी २० हजार रुपये किंमतीचाबंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, सोमवारी दुपारी ४.३० वाजता शाळा सुटल्यानंतर स्कूल ऑफ स्कॉलर्सचे उपप्राचार्य शैलेश आकरे हे दुचाकीने घराकडे जात होते.
दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी नुकतीच नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. नगर पालिकेनेही या संदर्भात जनजागृती केली होती. मात्र, यानंतरचही नायलॉन मांजाचीही विक्री झाल्याचे समोर आले आहे. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
गडचिरोली हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून नावारूपास आलेला जिल्हा आहे आणि अशा उद्योग विरहित जिल्ह्यात आता एमआयडीसी निर्माण करून या जिल्ह्यामध्ये उद्योग निर्मितीला सुरुवात झालेली आहे.परंतु एकीकडे उद्योगपती निर्माण होणार आहे तर दुसरीकडे या या भागातील शेतकरी संपूर्णपणे जमीन दस्त होणार आहे,कारण शेतकऱ्यांच्या जमिनी आता उद्योगपत्यांच्या दावणीला बांधले जाणार आहे.
मान्य आहे उद्योग निर्मिती करण्याची म्हटल्या करायची म्हटल्यावर जमीन पाहिजे आहे परंतु उद्योग निर्मितीसाठी शेतकरी नागडा होणार आहे,म्हणजे त्याच्या पोटाची भाकर हिरावली जाणार आहे.उद्योगपती शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेणार आहे त्या बदल्यात त्यांना पैसे देणार आहे परंतु पैसा काही टिकून राहणारी वस्तू नाही.म्हणजे या भागातील शेतकरी हा नागडा होऊन एक दिवस रस्त्यावरती येण्याचा प्रकार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपती खरेदी करणार आहे त्या कुटुंबातील एकाला नोकरी मिळेल या गोष्टी आपण मान्य करू परंतु एका बापाला तीन मुले आहेत तर तिन्ही मुली-मुलांना नोकरी मिळणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि समजा नोकरी मिळाली तर त्याचा पद कोणता मिळेल हे मात्र नक्की सांगता येणार नाही,कारण कौशल्य विकासावर शिक्षण घेणारी विद्यार्थी बोटावर मापन इतपत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नशिबी कंपनी मधल्या टीकास आणि पावडा घेऊन दिवसभर राब राब राबण्याचं काम मिळणार आहे,म्हणजे पोटाची भाकर जाणारच आहे आणि तूट पूजा पगाराची नोकरी देऊन सांत्वन करण्याचा प्रकार आहे.
गडचिरोली हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे.जल,जंगल व जमीन हा या जिल्ह्याचा नारा आहे आणि हा नारा उद्योगपतीच्या दावणीला बांधला जाणार आहे.म्हणजे मुळासकट उकडून फेकल्या जाण्याचा प्रकार आहे.एवढ्या मोठ्या जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे तर इथले उद्योग सुद्धा जंगलाशी निगडित असायला पाहिजे म्हणजे जमीन अबाधित राहिली असती.शेतकरी रस्त्यावर आला नसता,जंगल जसेच्या तसे राहिले असते आणि समोर गडुळ होणारा पाणी सुद्धा शुद्ध राहिला असता.म्हणजे साप मेला असता आणि काठी सही सलामत राहिली असती,परंतु समोर धोका आहे !
युवा संकल्प ने गढ़चिरौली जिला कृषि अधीक्षक से पीएमकिसान ऑनलाइन दस्तावेज़ अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाने की मांग की।
गढ़चिरौली : पी.एम. किसान योजना के तहत कई नागरिकों ने अपना ऑनलाइन पंजीकरण कराया है। चूंकि पार्टू ऑनलाइन डॉक्यूमेंट में पीडीएफ को 200 केबी में अपलोड करना है। इस बिंदु पर दस्तावेज़ स्पष्ट रूप से दिखाई नहीं दे रहा है. इतने सारे नागरिकों के फॉर्म रद्द कर दिए गए हैं. और ऑफिस में उन्हें अक्सर भागदौड़ करनी पड़ती है। दस्तावेज़ अपलोड की अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाया जाना चाहिए। 2KB में परिवर्तन रजिस्टर एवं पति-पत्नी का आधार कार्ड एवं 16 वर्ष से कम उम्र के बच्चे का आधार कार्ड अपर्याप्त दस्तावेज हैं। सीमा को 2 एमबी तक बढ़ाया जाना चाहिए, इसके लिए उप निदेशक श्री सतीश पवार साहब से अनुरोध किया गया था, जिसमें राहुल भांडेकर, महेंद्र लठारे, रमेश कोठारे, तेजस कोंडेकर, राहुल वैरागड़े और अन्य उपस्थित थे।
ग्रामीण भागात वेळेवर बस फेऱ्या केव्हा येणार ; बस आगार व्यवस्थापकडे राहुल वैरागडे यांची मागणी.
चामोर्शी : तालुक्यात गडचिरोली आगारातील बसेस वाघोली, कळमगाव,घारगाव फराळा, वेलतूर तुकूम, बस वेळेत येत नसल्याने. विद्यार्थ्यांचे/विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुस्कान होत असल्याने सदरची बस वेळेत व नियमित लिहावी.याकरिता आग्रा व्यवस्थापक गडचिरोली यांना निवेदनातून म्हटले आहे. महामंडळाच्या बसेस सायंकाळच्या वेळेस उशिरा पोहोचत असतात. मुले विद्यार्थी हे सायकलीने घरी निघून जातात. मुली विद्यार्थिनी ही बसची वाट पाहत असतात. विद्यार्थ्यांची शाळा ही ५:०० सुट्टी होते किंवा शाळेकडून बाहेरगावच्या विद्यार्थिनींना ३० मिनिट पहिले सोडले जाते. तरीपण मुली विद्यार्थिनींना ७:०० वाजेपर्यंत वाट पहावी लागते महामंडळ बसेसच्या वेळापत्रकामध्ये उशीर होत. विद्यार्थिनींना बसेसची वाट पहावी लागते. उचित प्रकार केव्हाही नाकारता येत नाही.
बसेस महामंडळाकडून नियोजित वेळेत सोडावे याकरिता निवेदनातून मागणी करण्यात आली. उपस्थित तेजस कोंडेकर, ओमप्रकाश चौधरी, गंगाधर शेरमाके, राहुल वैरागडे,राहुल भांडेकर, राहुल गुरनुले, महिंद्रा लॉटरी, कर्मचारी वृंद इत्यादी उपस्थित होते.
शालेय क्रीडा स्पर्धेत मार्कंडा कंन्सोबा चे माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयी
आष्टी,
चामोर्शी तालुक्यातील आष्टी केंद्रांतर्गत चौडमपल्ली येथे घेण्यात आलेल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा च्या माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत देयदीपम्यान कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले. या केंद्र स्तरीय झालेल्या व्हाॅलीबाॅल सामन्यात विजेतेपदावर नाव कोरून मार्कंडा कंन्सोबा शाळे च्या विध्यार्थ्यानी यशाला गवसणी घातली. चौडमपल्ली येथे दिनांक 10 ते 11 डिसेंबर रोजी केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा येथील माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयावर नाव कोरले हा सामना ११ डिसेंबर रोजी झाला चुरशीच्या लढतीत विजय मिळविला
शालेय स्तरावर या क्रीडा स्पर्धांना महत्व असते. विध्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरत असतात त्यात मार्कंडा कंन्सोबा शाळेने दमदार कामगिरी बजावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा चौडमपल्ली येथे घेण्यात आल्या.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा च्या विजयी चमूने गावात विजयी रॅली काढून आनंद व्यक्त केला व शाळे च्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. चमू शिक्षक कु. नितीन बहिरेवार, मुरमुरवार, यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुख्याध्यापक बि. टी. घोडाम यांनी अभिनंदन करून मुलांचा उत्साह वाढविला
न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाच्या स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने मृत्यू
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात नेमणुकीस असलेले पोहवा /2752 उमाजी होळी, नेमणूक - पोलीस मुख्यालय गडचिरोली, हे आज दि 11/12/2024 रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचे एस्कॉर्ट ड्युटीकरीता कर्तव्यावर हजर होते. दुपारी 02:55 वा चे सुमारास होळी हे जिल्हा न्यायालय गडचिरोलीचे आवारात गाडीत बसलेले असताना त्यांचे स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने ते जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल केले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होळी यांना मृत घोषित केलेले आहे.
प्रथमदर्शनी होळी यांचेकडून अनावधानाने गोळी झाडली गेल्याचे दिसून येते आहे.
पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल व इतर वरीष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट देऊन घटनेची अधिक माहिती घेतली आहे. मयत होळी यांचे कुटुंबीयांना गडचिरोली पोलीस दलाकडून सर्व सहायता देण्यात येत आहे. उद्या दि. 12/12/2024 रोजी उमाजी होळी यांचा अंत्यविधी त्यांचे स्वगाव मोहटोला, बेळगाव ता. जि. गडचिरोली येथे सर्व सन्मानात करण्यात येणार आहे.
पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत .
जिल्हयात 15 दिवस जमावबंदी
गडचिरोली,(जिमाका),दि.11: जिल्ह्यात दिनांक 25 डिसेंबर 2024 या कालावधीत ख्रिसमस नाताळ जिल्हयात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु होणार आहे .याशिवाय काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी संजय दैने यांनी संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 12 डिसेंबर 2024 ते दिनांक 26 डिसेंबर 2024 चे मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागु करण्यात आलेले आहे.
सदर कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही.
नवजात शिशुच्या जौविक पालक व नातेवाईकांनी भेटण्याचे आवाहन
गडचिरोली,(जिमाका),दि.10: दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी अंदाजे वय 01 दिवस, मौजा, खरपुंडी ते आकरटोली कडे जाणारा रस्ता ता. गडचिरोली जिल्हा. गडचिरोली येथे बालक आढळुन आलेला असता मा. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचिरोली जि. गडचिरोली येथे सदर बालकांची तक्रार नोंद करण्यात आली असून त्या अनुषंगाने दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली यांनी सदर बालकाला मा. बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या समक्ष सादर केले असता, मा. बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या आदेशान्वये सदर बालकाला लोक कल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था, व्दारा संचालीत गडचिरोली, पंचवटी वॉर्ड, बजरंग नगर, हनुमाण मंदिराच्या पाठीमागे जि. गडचिरोली या विशेष दत्तक संस्था येथे दाखल करण्यात आलेले आहेत.
करिता सदर बालकांचे जैविक माता-पिता व नातेवाईक यांनी बालकांचा ताबा मिळणेकरिता बातमी प्रकाशीत झाल्यापासुन 15 दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय बॅरेक क्रमांक 01, खोली क्रमांक 26, 27 कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली मोबाईल क्रमांक- 9403704834, दुरध्वनी क्रमांक:-07132-222645 यावर संपर्क साधावा व जर मुदतीत दिलेल्या तारखेस संपर्क साधला नाही तर केंद्रिय दत्तक प्रधिकरण (CARA) नवी दिल्ली यांचे अधिसुचना नुसार दत्तक प्रक्रिये करिता सदर बालकास मा.बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या आदेशान्वये दत्तकाकरिता विधी मुक्त करुन सदर बालकांची दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे आवाहन श्री. अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.
ऑल इंडिया किसान सभेचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश : मागण्या मान्य करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
9 डिसेंबर 2024 रोजी अहेरी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन यशस्वीपणे पार पडले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक मा. बरगमकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, हेडरी येथे धान खरेदी केंद्र येत्या दिवसांत मंजूर करून खरेदी सुरू करण्यात येईल, तसेच गर्देवाडा केंद्रातील मागील हंगामातील धान उचल तातडीने करण्यात येईल.
आंदोलनात प्रमुख नेते ऑल इंडिया किसान सभा महाराष्ट्र राज्यकार्यध्यक्ष म्हणून कॉ.डॉ महेश कोपुलवार, कॉ सुरेश चवळे जिल्हा सचिव, सचिन मोतकुरवार (अहेरी विधानसभा प्रमुख, किसान सभा), कॉ. रमेश कवडो (तालुका अध्यक्ष, किसान सभा), मा सैनुजी गोटा (माजी जिल्हा परिषद सदस्य ), मा कन्ना गोटा गाव पाटील गट्टा, मा दोडगेजी गोटा माजी सरपंच, मा महारु लेकामी उपसरपंच गट्टा, मा महादू कवडो गाव पाटील रेकलमेट्टा, मा रामसू नरोटी पाटील वांगेतूरी, मा दानू हिचामी रेकणार, मा विशाल पुजालवार, राजेश मुजुमदार, रितेश जोई, रामलू गोटा,पत्तू पोटावी,धर्मा तिम्मा पाटील मेड्री तसेच स्थानिक पातळीवरील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांवर ठोस तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
या आंदोलनाने अहेरी विधानसभेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळवून दिले आहे. विशेषतः, धान खरेदी केंद्रांसाठी हेडरी, गट्टा, गर्देवाडा यांसारख्या ठिकाणी गोडाऊन मंजूर करणे, मागील हंगामातील धान उचल पूर्ण करणे आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणे या मुद्द्यांवर लोकाभिमुख लढा उभारला गेला.
अलीकडच्या काळात अहेरी विधानसभेत शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रित असा व्यापक आंदोलन पहिल्यांदाच पाहायला मिळाला. ऑल इंडिया किसान सभेच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सभेने पुन्हा एकदा आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.
- ऑल इंडिया किसान सभा
(अहेरी विधानसभा क्षेत्र )