PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

आरमोरी शहरात एकाच रात्री 6 दुकाने फोडली ,अज्ञात चोरट्यांनी 34700 …


 

आरमोरी, (ता.प्र). अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 6 दुकानाचे शटर तोडून एकूण 34 हजार 700 रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना आरमोरी शहरात रविवारी (दि. 1) रात्री घडल्याने शहरवासींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

शहरातील दुकान लाइनमधील दुकानदार शनिवारी (दि. 30) रात्री 8.30 वाजतानंतर आपापली दुकाने बंद करून घरी परतले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चंदू किराणा दुकानाचे शटर तोडून काउंटरमध्ये ठेवलेले एकूण 10 हजार रुपये, अनिरुद्ध रमेश निमजे यांच्या मेडिकल दुकानातील 15 हजार रुपये, वैभव मोटघरे यांच्या मोबाइल दुकानाच्या काउंटरमधील 5 हजार 900 रुपये, वैभव मोटघरे यांच्या मोबाइलच्या दुकानातील 2300 रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा इयर बर्ड, प्रीतम निमजे यांच्या पॅथॉलॉजी लॅबमधील टेबलमध्ये ठेवलेले 1000 रुपये, भोजराज दहिकर यांच्या फर्निचर दुकानाच्या काउंटरमधून 500 रुपये रोख असे एकूण 34 हजार 700 रुपये लंपास केले. दुसऱ्या दिवशी रविवारी सर्व दुकानदार नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेले असता, दुकानात चोरीझाल्याचे उघडकीस आले. 

 

एकाच रात्रीसहा दुकानांमध्ये चोरी झाल्याने व्यापा- यांसह शहरवासीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेबाबत आरमोरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी सर्व सहा दुकानांचा पंचनामा करून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि प्रताप लामतुरे, पोहवा विशाल केदार करीत आहेत.

 

चोरीच्या घटनेने दहशतीचे वातावरण

 

आरमोरी शहरात रविवारी (दि. 1) झालेल्या दुकानफोडी व चोरीच्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरावर आळा बसवणारी यंत्रणा ठप्प झाली का, अशी चर्चा आरमोरीवासींमध्ये केली जात आहे.

 

 

सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही होताहेत चोऱ्या

आरमोरी शहराच्या मुख्य चौकात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. आरमोरी पोलिस प्रशासनातर्फे शहरात गस्तीसुद्धा केली जाते. प्रशासनातर्फे एवढ्या सुविधा असतानादेखील शहरात होत असलेलेचोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

बांगलादेशवर तुकडे-तुकडे टोळी कधी बोलणार ? गिरीराज सिंह यांची राहुल …


 

 

दिल्ली, वृत्तसंस्था. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांनी बांगलादेश हिंसाचारावर विरोधकांच्या मौनाचा समाचार घेतला आहे. या मुद्द्यावर त्यांनी केवळ इंडिया अलायन्सच्या बड्या नेत्यांवरच नव्हे तर ऑल इंडिया मजलिस ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही हल्ला चढवला. तसेच राहुल गांधी, अखिलेश यादव बांगलादेशातील हिंसाचारावर कधी बोलणार अशी टीका केली.

 

एका वृत्तसंस्थेशी बोलताना गिरीराज सिंह बांगलादेशातील हिंसाचारावर बोलताना, बांगलादेशात ज्या प्रकारे हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते पाहून भारत सरकारनेही त्यांना फटकारले आहे, आता लोकांनीही यात हस्तक्षेप करायला हवा. असे मलावाटते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह इथेच थांबले नाहीत. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा उल्लेख करत त्यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, ओवैसी अशी व्यक्ती आहे जी राष्ट्रगीताच्या वेळी सभागृहात उपस्थित नसते. तो संविधानविरोधी आहे. बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत, पण ते या मुद्द्यावर एकदाही तोंड उघडत नाहीत.

 

पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरच त्यांची जीभ उघडी होती. आपल्या वक्तव्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ना राहुल गांधी बांगलादेशच्या मुद्द्यावर काहीही बोलत नाहीत आणि अखिलेश यादव कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीत.

 

 

आंतरराष्ट्रीय समुदायाला 'हे' आवाहन

गिरीराज सिंह यांनी बांगलादेश हिसाचारावर आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढेयेऊन बोलण्याचे आवाहनही केले आहे. ते म्हणाले, बांगलादेशात आता कट्टरतावादी वर्चस्व गाजवत आहेत. त्याठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत आहेत. कायदेशीर मार्गानेही त्यांना भारतात येण्याची परवानगी दिली जात नाही. हिंदू संतांना तुरुंगात टाकले आहे. ते लोक तिथे कोणत्या स्थितीत राहतात माहीत नाही. आता वेळ आली आहे की जगातील लोकांनी बांगलादेशातही हस्तक्षेप केला पाहिजे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, हवालदारावर गुन्हा गडचिरोली ठाणे हद्दीतील घटनेने …


गडचिरोली : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयात कार्यरत हवालदारावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. गडचिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ डिसेंबरला ही घटना उघडकीस आली.

 

बंडू गेडाम (५२,रा. नवेगाव ता. गडचिरोली) असे त्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तो पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. उपअधीक्षक अजय जगताप, पो.नि.रेवचंद सिंगनजुडे यांच्यापुढे मुलीने आपबिती सांगितली. त्यानंतर सायंकाळी बंडू गेडामविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या खाकी वर्दीतीलच कर्मचाऱ्यावरच लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने जिल्हा पोलिस दलाच एकच खळबळ उडाली आहे.

 

 


PostImage

MH 33 NEWS

Yesterday   

PostImage

डीईआयसी येथे ‘बालकांच्या डोळ्यांचे आजार’ तपासणी शिबीर संपन्न


 

गडचिरोली,(जिमाका):-जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके/विध्यार्थी यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, थेरेपी, उपचार, त्याचप्रमाणे उच्च स्तरीय बाल विशेषज्ञ सल्ला/सेवा, गरजेनुसार उच्च स्तरीय चाचणी/तपासणी व शस्त्रक्रिया करिता तृतीय स्तरीय संदर्भ सेवा इत्यादींकरिता राज्यशासनाच्या मार्गदर्शकानुसार “द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष” म्हणून बालआरोग्य  विभाग  “डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर” (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित आहे.
       सदर डीईआयसीयेथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच इतर तालुक्याच्या ठिकाणाहून प्राथमिक तपासणी दरम्यान आढळून आलेले बालके/विद्यार्थी ज्यांना पुढील तपासणी, निदान निश्चिती, त्याचप्रमाणे उच्च स्तरीय बाल विशेषज्ञ सल्ला/सेवा, उच्चस्तरीयउपचार, अश्या द्वितीय स्तरीय सेवांची गरज असते अश्या बालकांची डीईआयसी (द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष) येथे नोंदणी केली जाते. डोळ्याचे आजार असलेल्या बालकांच्या डोळ्याचे निदान निश्चिती साठी बाल नेत्र विशेषज्ञ सल्ला आवश्यक असणाऱ्या बालकांकरिता दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘विशेषज्ञ बाल डोळे तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये साराक्षी नेत्रालय नागपूर येथील उच्च स्तरीय बाल नेत्र विशेषज्ञ चमू उपस्थित झाली. शिबिर मध्ये जिल्ह्यातील एकूण ९४ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यांचा पालकांना डोळ्यांच्या आजाराबाबत, शस्त्रक्रियेबाबत समुपदेशन, मार्गदर्शन करण्यात आले. यापैकी ज्या  बालकांना शस्त्रक्रियेची गरज आहे या बालकांच्या विशेष चाचण्या करून शस्त्रक्रियेकरिता पात्र बालकांना तृतीय स्तरावर संदर्भित करण्याचे नियोजन होणार असून काही नवजात बालकांना शिघ्र हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याने लवकरात लवकर या चिमुकल्यांना शस्त्रक्रियेकरिता उच्चस्तरावर संदर्भित करण्याचे नियोजन झालेले आहे. 
       या सर्व सेवा निशुल्क आणि मोफत तसेच बाहेरील तज्ञ जिल्ह्यातच उपलब्ध झाल्याने बालकांचे पालक समाधानी आहेत. 
        लहान बालकांच्या डोळ्यासंदर्भात, दृष्टीसंदर्भात वेळीच आणि लवकर हस्तक्षेप करणे गरजेच आहे. तसे न केल्यास मूल्यांच्या वाढीच्या टप्प्यावर परिणाम होण्याचे संकेत असते. व भविष्यात मोठ्या संकटांना समोर जाव लागू शकतो.   
         सदर ‘विशेषज्ञ बाल डोळे तपासणी शिबीर’ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके,  डॉ.धुर्वे सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.आखाडे जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या नियोजनाखाली पार पडले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता डीईआयसीतील अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ.माधुरी किलनाके यांनी कळविले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Yesterday   

PostImage

जागतिक एड्स दिननिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन समानतेने जगण्याचा संदेश


 

गडचिरोली : १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून या वर्षीचे घोषवाक्य “मार्ग हक्काचा सन्मानाचा" या आधारावर जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक माधुरी किलनाके यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महावि‌द्यालयाच्या  सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. तर  डॉ नागदेवते  यांनी एडस् विरोधी शपथेचे वाचन केले.  जिल्हा शल्य चिकित्सक यांनी "मार्ग हक्काचा सन्मानाचा" या आधारावर जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधीत रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच शासनाच्या योजना याविषयी माहिती देऊन एड्स प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणेने कार्य करावे, यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत आखाडे. डॉ. दुर्वे, डॉ. साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महेश भांडेकर, CSO डॉ. अभिषेक गव्हारे, जिल्हा महिला व बाल सामान्य रुग्णालय अधीसेविका, एआरटी, ICTC व विहान प्रकल्पाचे कर्मचारी यांची उपस्थीती होती.
एडस् विरोधी शपथ घेऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. ही रॅली जिल्हा महिला व बाल रुग्णालय ते गांधी चौक, कारगिल चौक मार्गे परत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे समाप्त करण्यात आली. रॅली मध्ये महावि‌द्यालयीन व नर्सिंग कॉलेजच्या वि‌द्यार्थिनीनी एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध घोषवाक्य म्हणून व माहिती पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली. तसेच नर्सिंग कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली  येथील विद्यार्थ्यांच्या मार्फतीने पथनाटय सादर करण्यात आले व बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली. 

कार्यक्रमाचे संचालन आयसीटीसी समुपदेषक राजेश गोंडाणे यांनी तर पाहुण्यांचे आभार अधीसेविका रामटेके यांनी मानले.


PostImage

MH 33 NEWS

Yesterday   

PostImage

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्या. खासदार …


 

गडचिरोली : गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय अर्थमंत्री ना. निर्मला सितारामन यांची दिल्ली येते संसद भवनाच्या कार्यालयात भेट घेतली.
 गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र अतिदुर्गम व मागास क्षेत्र असल्याने लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अद्याप पायाभूत सुविधाचा विकास झालेला नाही, बऱ्याच गावात रस्ते, वीज, आरोग्य केंद्र नाही, त्यामुळे  अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागते. लोकसभा क्षेत्रात रोजगाराचे कोणतेही मोठे साधन नसल्याने लोकसभा क्षेत्रात  बेरोजगारीचेही प्रमाण वाढत आहे, अश्या परिस्थिती गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीन विकासासाठी व लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या समस्याच्या निराकरणा करीता केंद्र शासनाच्या वतीने किमान 10 हजार कोटी रुपयाच्या आर्थिक पॅकेज ची मदत करावी अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या भेटी दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे केली.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Yesterday   

PostImage

एकनाथ शिंदे बिगडवू शकतात भाजपाचा डाव !


राज्यातील मतमोजणी होऊन एक हप्ता उलटून गेला तरी पण नव्या सरकारचा गटन होऊ शकले नाही किंवा राज्याच्या मुख्यमंत्री कोण ? यावर सुद्धा शिक्का मुहूर्त होऊ शकला नाही.म्हणजे दाल में कुछ काला है,अशी अवस्था सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपाची झालेली आहे.

काळजीभाऊ मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जरी वरवर म्हणत असतील की भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे परंतु ते मनातून नाराज आहेत,हे स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवते.माननीय एकनाथ शिंदे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याकडे मुख्यमंत्री नाही तर मग गृहमंत्री पद आम्हाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली परंतु भाजपाने याही गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.

राज्यात जरी भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला असला तरी पण केंद्र सरकारमध्ये एकनाथ शिंदेचे सात खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये सामील आहेत.चंद्राबाबू नायडू,नितेश कुमार नंतर एकनाथ शिंदे चा नंबर लागतो.आजच्या घडीला सात हा आकडा अल्पसा वाटत असला तरी पण केंद्र सरकारसाठी सात हा आकडा खूप मोठा आहे.एकनाथ शिंदे यांनी आपला पाठिंबा काढून घेतला तर सर्वच पक्ष आपला डोका कधी वर काढतील आणि केंद्रातील मोदी सरकार कधी गडगडेल याची कल्पना न केलेली बरी ही आजची वस्तुस्थिती आहे आणि याला भाजपाचे वरिष्ठ पातळीवरचे नेते सुद्धा नाकारू शकत नाही.