विधानसभा निवडनुकिचा निकाल लागुन आज एक हप्ता संपुन गेला तरी पण राज्यात नवे सरकार सत्तास्थानी अजुन ही आरूढ झालेली नाही तर म्हणजे आजही महायुतीत सत्तेचा समिकरण जुळून आलेलं नाही .हे आता राज्यातील सामान्य जनतेच्या लक्षात आलेले आहे.
महायुतीमधिल नेत्यांचा हेकेखोर पणा आज ही कायम आहे
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जर सर्व नेते ठाम असते तर ऐण सत्ता स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःचा गावी गेलेच नसते हा पहिला कारण आहे . आता राज्यात नवीन समिकरण अस्तीत्वात येवु शकते.आणी तो म्हणजे महाविकास आघाडी.
एकनाथ शिंदे ची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र येऊन नवे सरकार सत्तास्थानी आरूढ होवु शकते आणि मुख्य मंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान होवु शकतात.आणीतशी हालचाल देखील चालू झाली आहे .कारण हे नेते जर एकत्र आले तर यांच्या कडे सुद्धा बहुमताचा जादुई आकडा आजच्या घडीला उपलब्ध आहे .
महाविकास आघाडी - ४९
शिवसेना (शिंदे गट) - ५७
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- ४१
एकूण - १४७
बहुमताचा जादुई आकडा 145 जागेचा आहे आणि तो सहज पार केल्या जाऊ शकतो.आता राज्यातील सत्तेचे समीकरण या नेत्यांच्या मनावर आहे.आले देवाजींच्या मनात येते कुणाचे चालेना.याआधी सुद्धा महाराष्ट्रात असले प्रकार घडलेलेच आहेत.आणि हे राजकारण आहे इथे सर्व काही आलबेल आहे.कुणी कुणाचा मित्र नाही तर कुणी कुणाचा शत्रू देखील नाही हे फक्त सत्तेचा सारीपाट आहे.एकमेकांवर कुरकोडे करून कोण कोणावर वरचढ ठरणार हे येणारा काळच सांगू शकतो.
जिवन गाणे गातच रावे,झाले गेले विसरुन जावे,पुढें पुढें चालावे
शिक्षन विभागामार्फत शिक्षण सप्ताह
चिमूर -
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षण सप्ताह साजरा केला जात आहे.या सप्ताहाचे औचित्य साधून जि.प.प्राथ.शाळा कवडशी (डाक) येथे वृक्षारोपण करण्यात आले. एक मुल एक झाड याप्रमाणे शाळेच्या प्रांगणात, परिसरात,शेताच्या बांधावर आंबा, फणस, चिकू, चिंच, वड, पिंपळवृक्ष, इत्यादी फळझाडे, गुलाब,कृष्णकमळ, शेंवती, मोगरा, सदाफुली आदी फुलझाडे, तुळस,अडूळसा, पानफुटी, कोरफड आदी औषधी वनस्पती, वांगी,टमाटर,दोडका,चवळी शेंगा, लौकी आदी भाजीपाला, सांबार, पालक ईत्यादी पालेभाज्याचे रोपण करण्यात आले. वृक्षलागवड करून संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली.प्रधानमंत्री पोषण आहार योजना यामूळे प्रभावी होईल असे प्रतिपादन सहाय्यक शिक्षिका कविता लोथे यांनी केले. तर वृक्षांवर माया कराल तर ते आपल्याला भरभरून देतात असे मुख्याध्यापक धनराज गेडाम यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळाव्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, पालक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.शि. कविता लोथे, मुख्याध्यापक धनराज गेडाम व आजी-माजी विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.
समाज प्रबोधन, विवीध कार्यक्रम स्पर्धा, नृत्य, खेळ कार्यक्रमाचे आयोजन
दिवाळी उत्सवाच्या निमीत्ताने सामजीक बांधीलकी जपत रोटरी क्लब चिमूरच्या वतीने पहिल्यांदाच चिमूर क्रांतीभूमीत दिनांक २० नोव्हेंबर सोमवार ते २५ नोव्हेंबर शनीवार पर्यत सहा दिवसीय रोटरी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन बिपीएड ग्राऊंड, आदर्श विद्यालय, संविधान चौक वडाळा ( पैकु ) चिमूर येथे करण्यात आले आहे.
मागील अनेक वर्षापासुन चिमूर येथील रोटरी क्लब सामाजीक बांधीलकी जपत पर्यावरण, आरोग्य, शिक्षण या विषयी जनजागृती करून शिबीर राबवीले आहे. रोटरीने असहाय्य अशा व्यक्तीना मदतही केली आहे. रोटरी काय आहे ? रोटरी नेमकं समाजासाठी काय करते हे पटवून देन्याच्या उद्देशाने चिमूर क्रांतीभूमीत रोटरी उत्सवा निमीत्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले आहे. सोमवार पासून उत्सवाला सुरुवात होनार आहे. या पाच दिवसीय रोटरी उत्सव कार्यक्रमात नृत्य व विवीध स्पर्धा, रॉक बँड, फॅशन शो व विवीध खेळ, समूह नृत्य स्पर्धा व एड्स जागृतीवर पथनाटय, उत्पादनाची विशाल प्रदर्शनी, सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आकाश पाळना, झुले, ड्रगन, मौत का कुआ, रेलगाडी व विवीध प्रकारचे मनोरंजन, स्वादिष्ट पदार्थांचा दिलखुलास स्वाद, शाळेतील विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा, नृत्य, गायन, व्यक्ती महत्व विकास, महिला व युवतींसाठी विवीध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी उत्सव कार्यक्रम सहा दिवस राहनार आहे. तरी परिसरातील नागरीकांनी या रोटरी उत्सवात सहभाग दर्शवून लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष रोटे वैभव लांडगे तथा रोटरी क्लब चे रोटे पदाधिकारी यांनी केले आहे.