*कन्नेपल्ली येथील वासुदेव मडावी यांना माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी केली आर्थीक मदत.!*
*अहेरी:-* कन्नेपल्ली येथील वासुदेव मडावी हे झाडाची छाटणी करायला चढले असता पडल्याने मणक्यांमध्ये गंभीर दुखापत झाली.किष्ट व गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रीया करावी लागणार असल्याने नागपुरला रुग्णालयात भरती करण्यात आले.हलाखीची परिस्थिती असल्याने ऊपचाराचा खर्च झेपणारा नव्हता.माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी कुटूंबीयांना मोठी आर्थीक मदत करुन सहारा दिला व पुढेही पुर्णपणे सहकार्य करण्याचे शब्द देवून आश्वस्त केले.कूटूंबीयांनी तसेच गावकर्यांनी राजे साहेबांचे मनःपुर्वक आभार मानले.