अहेरी : तालुक्यातील आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.या ठिकाणी नागरिकांना आवागमन करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
अहेरी तालुक्यातील अनेक विकासकामे सुरू आहे.आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलंचे बांधकाम करण्यात येत आहे.सदर काम पर्यायी रस्ते तयार न करताच सुरू करण्यात आल्याने पावसाळ्यात परिसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावं अलगाता आहे.
परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी व आरोग्य सुविधेकरीता तालुका व जिल्हास्तरावर जाणे कठीण झाले आहे.त्याकरीता या दोन्ही मार्गावर पुलांचे व रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना काळ्या यादीत टाकुन संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व होणाऱ्या त्रासाला जवाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.
१५ दिवसात कार्यवाही व पक्का रस्त्याचे पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा १३ ऑगस्ट २०२४ पासून आलापल्ली - सिरोंचा, आलापल्ली भामरागड, आलापल्ली अहेरी व आलापल्ली आष्टी या चारही मार्गावर राष्ट्रीय कांग्रेस पक्ष तर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पत्राद्वारे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
अप्पर जि्हाधिकारी श्री. विजय भाकरे साहेब यांना निवेदन देताना श्री.अजयभाऊ कंकडालवार सहीत माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलाडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच अशोक येलमुले राकेश सडमेकसह आदी उपस्थित होते
अहेरी : मागील चार - पाच दिवसांपासून सगळीकडे संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने याची फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात बसले असून संततधार पाऊस व पूरजन्य परिसथितीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील अनेक नागरिकांचे घरांचे पडझड झाली असून तसेच शेतकऱ्यांचे सुध्दा अतोनात नुकसान झाली असून सरकार व संबंधित विभागाने नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी काँगेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आह.
संततधार पावसामुळे नुकसान झालेल्यांची आणि पूरजन्य परिस्थितीत अडकलेल्यांची अजयभाऊ कांकडलवार यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भेटी देत आपल्यापरीने मदत कार्याला सुरुवात केली आहे.तसेच त्यांनी नागरिकांसाठी आपल्या स्वतःची चोवीस तास हेल्पलाईन सेवा सुध्दा सुरू केली आहे.
अजयभाऊ कंकडालवार यांनी आज पूरग्रस्त गावांना भेट देऊन तेथील नागरिकांची अडीअडचणी जाणून घेतले.तसेच अनेक नुकसान ग्रस्तांना आपल्यापरीने आर्थिक मदतीचे हात दिले.
पूरग्रस्त गावांची पाहणी दरम्यान कंकडालवार यांचे समवेत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदारमचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गुलाबराव सोयाम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.