आरमोरी, (ता.प्र). शहरातील ब्रह्मपूरी मार्गावरील जीवानी राईसमिल समोर वास्तव्याने राहत असलेल्या एका व्यक्तीच्या घरासमोरील रस्त्यावर ट्रक उभे केल्याप्रकरणी संबंधिताने विचारणा केली असता ट्रक मालकाने शिवीगाळ केल्या प्रकरणी बुधवारी (दि.15) आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रोहित नामदेव नाणे (28, रा.आरमोरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
शहरातील ब्रह्मपूरी मार्गावरील जिवानी राईस मिलसमोर वास्तव्याने राहत असलेले सेवानिवृत्त पोस्ट मास्तर जगदीश गंगाधर निमजे (70) घरासमोर रोहित नाणे यांनी ट्रक उभा केला. यामुळे त्यांना आवागमनास त्रास होत असल्याने याबाबत त्यांनी नाणे यास जाब विचारला. यावर आरोपीने फिर्यादीच्या घराच्या संरक्षण भिंतीजवळ येत त्यांना शिवीगाळ करून तू
घराबाहेर निघ, तुला चिरून काढतो, अशी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यादरम्यान फिर्यादीच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही शिवीगाळ केली. याप्रकरणी जगदीश निमजे यांनी थेट आरमोरी पोलिस ठाणे गाठून आरोपी नाणे याच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावरून आरमोरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार नीलकंठ कोकडे करीत आहेत.
आरमोरी : तालुक्यातील मोहटोला येथेगावठी दारुअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ९ जानेवारीला केली.
राजेंद्र संपत कुमरे (३६, रा. मोहटोला ता. आरमोरी) याने शेतात मोहफुलांची दारू बनविण्यासाठी २०० लिटर क्षमतेच्या पाच ड्रममध्ये सडवा टाकला होता. याबाबत आरमोरी पोलिसांना माहिती मिळाल्याने तेथे छापा टाकला. एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून राजेंद्र कुमरे यास ताब्यात घेतले.
अंमलदार जयपाल बांबोळे यांच्या फिर्यादीवरून आरमोरी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास हवालदार राकेश टेकाम करत आहेत. या कारवाईने दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आरमोरी : आरमोरी पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार, आरोपी खुशाल रंदये हा आपल्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित तंबाखू विक्रीसाठी बाळगून असल्याची गोपनीय माहिती आरमोरी पोलिसांना न मिळाली. आरमोरी पोलिसांना र माहिती मिळताच आरोपीच्या घरी
पोलिसांनी एका सुगंधित तंबाखू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून त्याच्याकडून ६९ हजार ७० रुपयांचा तंबाखू हस्तगत करून त्यास अटक केल्याची घटना २३ डिसेंम्बरला दुपारी २ ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली. खुशाल संजय रंदये (१९) रा. राममंदिर वॉर्ड आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
धडक देऊन त्याच्या घराची तपासणी केली असता पहिल्या खोलीत १२ हजार ४०० रूपये किमतीचे ईगल हुक्का शिशा तंबाखूचे सुगंधी तंबाखू असलेले प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाचे ४० नग पॉकेट, १८ हजार ४० रूपये किमतीचे होला हुक्का शीशा तंबाखूचे प्रत्येकी २०० ग्रॅम
वजनाचे ११० नग पाकीट, २६८० रूपये किमतीचे निघाला हुक्का शीशा तंबाखूचे प्रत्येकी ४० ग्रॅम वजनाचे ४२० नग पाकीट, ११७०० रूपये किमतीचे मजा १०८ शीशा तंबाखूचे प्रत्येकी ५० ग्रॅम वजनाचे ५० नग असा एकूण ६९०७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन कार्यालय गडचिरोली येथील कर्मचारी सुरेश तोरेम यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी. कैलास गवते, सपोनि. प्रताप लामतूरे, पो. हवा. विशाल केदार, पो.अं. सुरेश तांगडे, पोअं. हंसराज धस यांनी केली.
आरमोरी. येथील शिवाजी चौकातील रहिवासी किरण मनोहर दुमाने याला 8 दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. त्याला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 23) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. किरण आठ दिवसांपूर्वी मासेमारीसाठी नदीवर गेला होता. यावेळी त्याच्या पायाला एका विषारी सापाने दंश केला. परंतु त्याला चावा घेतल्याचे जाणवले नाही. त्यानंतर काही वेळाने तो आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला.
तेव्हा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला गडचिरोली येथील दवाखान्यात पुढील उपचार घेण्यासाठी सांगितले. परंतु तो भरती न होता थेट घरी परतला. आठ दिवसांनंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला सोमवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता पुन्हा आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
आरमोरी तालुक्यातील आष्ठा शिवारातील तलावाजवळ राजरोस सुरू असलेल्या मोहफूल दारूचा अड्डा येथील पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यात तिघांना रंगेहाथ पकडून ५३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एका आरोपीने पोबारा केला. ही कारवाई १६ डिसेंबरला केली.
कालिदास रामा मडावी एकनाथ तुळशीराम दाणी, नंदकिशोर राजीराम कोल्हे (तिघे रा. जोगीसाखरा, ता. आरमोरी) अशी आरोपींची नावे आहेत, तर संतोषसिंग जुनी (रा. बीएसएनएल टॉवरजवळ, आरमोरी) हा फरार आहे.
संतोषसिंग जुनी हा आष्ठा शिवारात तलावाच्या पाळीजवळ मोहफुलांपासून दारू बनवत असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी दारूसह सडवा असा सुमारे ५३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य आरोपी संतोषसिंग जुनी हा मात्र हाती लागला नाही. पोलिस अंमलदार हंसराज धस यांच्या फिर्यादीवरून आरमोरी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास हवालदार निळकंठ कोकोडे करीत आहेत.
आरमोरी: नियतीचा खेळ कधी कुणाला कळलाच नाही, पाशातून नियतीच्या कधी कोणी सुटलाच नाही... एका कवीने लिहून ठेवलेल्या या ओळींची प्रचिती येथे १८ डिसेंबरला दुपारी आली अन् संपूर्ण शहर शोकमग्न झालं. तान्हुलं लेकरू घरी ठेवून दुसऱ्या बाळाला कॉन्व्हेंटमधून आणायला सायकलवर निघालेल्या आईला वाटेत काळ बनून आलेल्या ट्रकने चिरडले. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तिकडं घरी तान्हुलं अन् इकडं शाळेत लेकरू आईची वाट पाहत होतं, पण माय-लेकरांची भेट अधुरी राहिली.
किरण संजय गोंदोळे (२५, रा. बर्डी परिसर, आरमोरी) असे मयत महिलेचे नाव आहे. मोलमजुरी करून जीवन कंठणाऱ्या गोंदोळे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची. पदरात दोन मुलं. राजू (५)व वल्लभ (अडीच वर्षे) नावं त्यांची. जानकाबाई कोल्हे कॉन्व्हेंटमध्ये मोठा मुलगा राजू शिकत होता.
रोज सकाळी वडील संजय हे त्यास शाळेत सोडून कामावर जायचे तर दुपारी आई किरण ही त्याला घेण्यासाठी सायकलवरून जायची. नेहमीप्रमाणे दुपारी बारा वाजता ती छोटा मुलगा वल्लभ यास घरी ठेवून मोठा मुलगा राजूला आणण्यासाठी सायकलवरून जात होती. मात्र, वाटेत पोस्ट कार्यालयासमोर देसाईगंजहून आरमोरीकडे निघालेल्या मालवाहू ट्रकने (एमएच ३४ एव्ही- १२९६) जोराची धडक दिली. यात किरण गोंदोळे ही चिरडली गेली. शरीरावरून चाक गेल्याने तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
ट्रक चालक मनीषकुमार वीरबहादुर सिंग (रा. कोलवारा, बिहार) यास ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे.
निरागस भांवडं मातृप्रेमाला पारखी
शाळेत गेलेला राजू प्रवेशद्वारावर आईची वाट पाहत होता, पण आई आलीच नाही. ती गेल्याची खबर धडकली. त्यामुळे माय-लेकराची भेट झालीच नाही. या घटनेने दोन चिमुकली निरागस भावंडं मातृप्रेमाला पारखी झाली.
नागरिकांची धाव, गोंदोळे कुटुंबाला दिला धीर
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ वाहतूक ठप्प झाली. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे व आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. आशिष कोरेटी यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देऊन मृत किरणच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. • मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला. यावेळी कुटुंबीय व नातेवाइकांनी काळीज पिळवटणारा आक्रोश केला.
आणखी किती बळी गेल्यावर अतिक्रमण हटविणार, शेडमाके यांचा सवाल
या घटनेनंतर आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव छगन शेडमाके यांनी पालिकेवर टीका केली आहे. शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. महामार्ग असूनही रस्ता अरुंद बनला आहे. वळणावर, गर्दीच्या ठिकाणी सिग्नल नाहीत. पालिकेच्या हलगर्जीचा हा बळी असल्याचा आरोप त्यांनी केला. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा जळजळीत सवाल त्यांनी केला आहे. गोंदोळे कुटुंबाचे सांत्वन करुन त्यांनी मदतीचा हातही दिला.
हर्ष साखरे सुपर फास्ट बातमी संपादक
आरमोरी : दुचाकीवरून सासरवाडीला जाताना वाटेत अपघात होऊन जावयाचा मृत्यू झाला. १० डिसेंबरला घडलेल्या या घटनेत १६ रोजी कार चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.
इंद्रजीत दुलाल मंडल (३४, रा. सुभाषग्राम ता.चामोर्शी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. १० रोजी ते दुचाकीवरून (एमएच ३३ एक्स ७६९६) अरुणनगर येथे सासरवाडीला जात होते. वाटेत आरमोरी येथे एका लॉन्ससमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने (एमएच ३४ जे-११५३) जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमीझाले. त्यांना आरमोरी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यानंतर, ब्रह्मपुरी येथे उपचारादरम्यान १३ डिसेंबरला उपचारादरम्यान इंद्रजीत यांची प्राणज्योत मालवली.
याबाबत दुलाल मंडल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित कारच्या अज्ञात चालकाविरुद्ध आरमोरी ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास हवालदार प्रेमानंद लाडे करत आहेत.
आरमोरी: ठाणेगाव येथील दूध डेअरीवर दूध विकून दुचाकीने गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या तीन चाकी मालवाहू रिक्षाने समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीचालक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास वनखी गावाजवळ घडली.
मंथन प्रकाश लाकडे (१९) रा. चामोर्शी (माल) ता. चामोर्शी, असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मंथन हा परगावी आपल्या नातेवाइकाकडे राहून शिक्षण घेत होता. तीन दिवसांपूर्वी चामोर्शी मालयेथे स्वगावी तो आला होता. मंथन हा एम. एच. ३३ ए.एफ. ७५५३ या क्रमांकाच्या मोटार सायकलने सकाळी घरचे दूध डेअरीवर देण्यासाठी ठाणेगावला गेला. डेअरीवर दूध देऊन मोटार सायकलने चामोर्शी माल या आपल्या गावाकडे परतत असताना वनखी ते चामोर्शी माल डांबरी रोडवरील रामदास खेवले यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या एम. एच.
३४ बी. एच. २०२४ क्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या तीनचाकी मालवाहू रिक्षाने मंथनच्या मोटरसायकलला समोरासमोर जबर धडक दिली. अपघातात मंथन याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक देवराव शंकर साळुंखे, नेहरूनगर (चंद्रपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडील गेले धान केंद्रावर; स्वतः नेले दूध
मंथन हा बाहेरगावाहून घरी आला. त्यामुळे वडिलांना उसंत मिळाली व ते रविवारी वैरागड येथील हमीभाव केंद्रावर धान विकण्यासाठी गेले होते. वडिलांच्या जागी मंथनने दूध विक्रीसाठी नेले. मात्र, परतत असताना घात झाला.
आरमोरी : तालुक्यातील कुरंडीमाल ग्रामपंचायतीचा शिपाई अमृत सुखदेव सराटे (३०, रा. कुरंडीमाल) हा १६ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह ३ डिसेंबरला गावालगतच्या जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला. त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
अमृत सराटे हा १६ नोव्हेंबरला सकाळी शौचास जातो म्हणून घरून निघून बाहेर पडला होता, परंतु बराच वेळ होऊनसुद्धा तो घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी त्याचा शोधा घेण्यास सुरुवात केली, पण त्याचा शोध लागला नाही. अखेर कुटुंबातील व्यक्तींनी आरमोरी पोलिस ठाणे गाठून बेपत्ताची तक्रार नोंदविली. दरम्यान, ३ रोजी गावातील एक व्यक्ती सरपण आणण्यासाठी जंगलात गेला असता त्यास कोजबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली होती.
आरमोरी पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून जागेवरच उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आरमोरी ठाण्यात 'आकस्मिक मृत्यू'ची नोंद करण्यात आली आहे. व्हिसेरा राखून ठेवला असून अधिक तपास सुरू असल्याचे पो.नि. कैलास गवते यांनी सांगितले.
कारण अस्पष्ट
या प्रकरणात शिपाई अमृत सराटे याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आलेले नाही. बेपत्ता झाल्यानंतर तब्बल १९ व्या दिवशी त्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक व पोलिस विभागाकडून ठिकठिकाणी वाहने अडवून कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे अनेक दारू तस्कर दारूची तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करताना दिसून येत आहेत. तरीही पोलिसांनी सतर्कतेने मंगळवारी महामंडळाच्या बसमध्ये दारु पकडली.
एक दारू तस्कर महिला महामंडळाच्या बसमधून दारू तस्करी करीत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर एसटी बसमधून दारू तस्करी करणाऱ्या महिलेकडून २१ हजारांची दारु जप्त करीत तिला ताब्यात घेतल्याची कारवाई १२ नोव्हेंबर रोजी आरमोरी मार्गावरील बसथांब्याजवळ केली. रितादेवी देवेंद्र मिश्रा (रा. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून रितादेवी मिश्रा ही महिला रापमच्या बसने दारू तस्करी करत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने शहरातील आरमोरी मार्गावरील बसथांब्यावर सापळा रचला.
दरम्यान, एसटी बस आरमोरी मार्गावरील बसथांब्यावर येताच पोलिस कर्मचाऱ्यांनी बसची तपासणी करून महिला तस्कराकडून २१ हजार रुपये किमतीची देशी दारु जप्त केली. पोलिसांनी संबंधित महिलेवर कारवाई करत गुन्हा दाखल केला. तसेच डीबी पथकाने पोलिस ठाणे हद्दीतील इंदाळा येथील सुबल हिरामण मिस्त्री याच्या घरावर छापा टाकून त्याच्या घरातून ७ हजार रुपयांची दारू जप्त केली.
गडचिरोली : गावालगतच्या जंगलात झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना आरमोरी तालुक्याच्या चुरमुरा येथे शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
आनंदराव केवटराम सातपुते (४३), रा. चुरमुरा, ता. आरमोरी असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदराव यांची प्रकृती खंगत असल्याने ते काही दिवसांपासून तणावात होते. दररोज ते गावालगतच्या जंगला जाऊन शेळ्यांसाठी झाडाच्या पाल्याच्या
फांद्या आणत असत. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारीसुद्धा सकाळी शेळ्यांसाठी चारा आणण्याकरिता गेले होते; परंतु दुपारचे १२ वाजेनंतरही ते घरी परतले नाही. अखेर कुटुंबीयांनी इतरांच्या मदतीने जंगलात शोध घेतला. तेव्हा दुपारी १:३० वाजता एका झाडाला आनंदराव हे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकले नाही. यापूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिस पाटील सतीश जाम्पलवार यांनी आरमोरी पोलिसांना माहिती दिली.
आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, पाच दिवसांची पोलीस कोठडी
आरमोरीः फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर शारिरीक सबंध ठेऊन अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस आरमोरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुजित कैलास गेडाम (२२) रा. मोहाडी ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर असे आरोपीचे नांव असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार, आरोपी सुजित गेडाम व पीडितेची ओळख मागील ४ ते ५ महिन्यापुर्वी फेसबुक वरून झाली. दोघांची बोलचाल सुरू झाली. याचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने पीडित मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून पीडितेला आपले गावी भेटण्यास बोलाविले. तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून अल्पवयीन पीडितेस पळवून नेले.
या संदर्भात आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीचे तक्रारीवरून व पीडितेचे बयान ग्राह्य धरून आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत कलम ४,६,८,१२ तसेच भारतीय न्याय संहिता ६४(१), ६४ (२) (i), ६४(२) (२)८७, १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरमोरी पोलिसांनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी आरोपीस त्याच्या मोहाडी गावावरून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोहूर्ले करीत आहेत.
आरमोरी : सीताबर्डी येथील जिल्हा परिषद शाळेतील चौथ्या वर्गात शिकत असलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करणाऱ्या चंद्रभान मोतीराम बांबोळे या शिक्षकाला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षण विभागाने त्याला निलंबित केले आहे. तसेच शाळेत होत असलेल्या गैरवर्तनाबाबत वरिष्ठांना कळवण्यात कसूर केल्याबद्दल मुख्याध्यापिका दिलेश्वरी दामोधर कोटांगले यांनाही शिक्षण विभागाने निलंबित केले आहे.
चंद्रभान बांबोळे या आरोपी शिक्षकाची मुख्य नियुक्ती ठाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील आहे. मात्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला सीताबर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत पदस्थापना दिली. अशा विक्षिप्त स्वभावाच्या व्यक्तीला आरमोरी सारख्या शहरातील शाळेत नेमकी कोणत्या कारणासाठी पदस्थापना दिली, हे मात्र कळण्यास मार्ग नाही. आरमोरीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
आरमोरी: प्रेम सबंध प्रस्थापित केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पिडीतेचे शारीरीक शोषण करणाऱ्या आरोपी युवकाविरूद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची घटना आज २९ ऑक्टोबर रोजी आरमोरीत घडली.
कुणाल घनश्याम धाकडे (२१) रा. सिद्धार्थनगर, आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे. त्याला न्यायालयाने ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. पिडीत युवती ९ व्या वर्गात शिकत असतांना आरोपीने तिच्यासोबत प्रेमसबंध निर्माण केले व अश्लिल फोटो काढले. पिडीता १० वीत गेल्यानंतर आरोपीने तिच्याघरी तसेच नागपूर येथील एका युवकाच्या रूमवर बोलावून त्याच्या मोबाईलमध्ये असलेले अश्लिल फोटो व्हायरल करतो अशी धमकी देऊन शारीरीक अत्याचार केला तसेच मारहाण केली. याबाबत पिडीत युवतीने आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरमोरी पोलीसांनी आरोपी कुणाल धाकडे यास अटक करून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत ६४(२) (ग्) ६४(२) (२) ६४ (२) (स) ४,६,८,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. आज दिनांक २९ ऑक्टोबरला आरोपी धाकडे यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे करीत आहेत.
आरमोरी : शाळेतील मुलींना बॅड टच करणाऱ्या आरमोरी येथील सीताबर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक चंद्रभान बांबोळे (५०) याला आरमोरी पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. शिक्षकी पेशाला कलंक लावणाऱ्या या शिक्षकाला कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
चंद्रभान बांबोळे हा चौथ्या वर्गाचा वर्गशिक्षक आहे. मुलींच्या खांद्यावर हात ठेवणे, कमरेत हात घालणे, मुलींच्या खांद्यावर स्वतःचे डोके ठेवणे, खाऊ देऊन मुलींची पप्पी घेणे अशा प्रकारचे असभ्य वर्तन वर्गातच करीत होता. त्याचे हे वर्तन बघून काही मुली दुसऱ्या वर्गामध्ये जाऊन बसत होत्या. याबाबतची माहिती शाळेतीलच एका शिक्षकाने पालकाला दिली.
त्यानंतर पालकाने मुलींकडे शहानिशा केली. तेव्हा बाब सत्य असल्याचे दिसून आले. एका पालकाने याबाबतची तक्रार आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक चंद्रभान बांबोळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४ सहकलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास आरमोरी पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.
हर्ष साखरे सुपर फास्ट बातमी संपादक
आरमोरी: एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती करणाऱ्या आरोपी युवकास आरमोरी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केल्याची घटना दिनांक २४ ऑक्टोबर रोजी घडली. विनोद घनश्याम पात्रीकर (२०) रा. इंजेवारी ता. आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार यातील फिर्यादी पिडीतेची आई ही दि २२ ऑक्टोबर २०२४ रोजी काम करुन घरी आल्यावर त्यांना त्यांची मुलगी पिडीता ही घरी आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेवुनही ती मिळुन नआल्याने आरमोरी पोलीस ठाण्यात रिपोर्ट देण्यासाठी आली असता आरमोरी पोलीसांनी तिच्या लोकेशन बाबत माहीती काढुन तिचा त्वरीत शोध घेतला. मुलगी मिळुन आल्याने कोणतीही तक्रार करायची नाही असे लेखी दिले व रिपोर्ट न देता मुलीला ताब्यात घेवुन घरी गेली.
त्यानंतर दि. २३ ऑक्टोबर रोजी पिडीतेच्या आईला व नातेवाईकांना पिडीता गर्भवती असल्याबाबत शंका आल्यानेपिडीतेच्या आईने केलेल्या तपासणीत पिडीता ही गर्भवती असल्याचे लक्षात आले. पिडीतेला विश्वासात घेवून तिच्या आईने विचारले असता पिडीतेने इंजेवारी येथील विनोद पात्रीकर याने आपल्यासोबत शारिरीक सबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.
यामुळे पिडीतेच्या आईने आरमोरी पोलीस ठाण्यात येवुन दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम ३७६ (२) (१), ३७६ (२) (नं, भा. द. वी. सहकलम ४,६,८,१२, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम२०१२ अन्वये गुन्हा नोंद केली व दिनांक २४ ऑक्टोबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीवर गुन्हा दाखल होताच आरोपीस न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.
पीडितेला पुढील वैद्यकीय उपचारासाठी गडचिरोली येथील महीला व बालरुग्णालय येथे पाठविण्यात आले.
आरमोरी तालुक्यात पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांची वाढली संख्या
आरमोरी हे विद्येचे माहेरघर असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी आरमोरी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र समाजमाध्यमांच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करीत असल्याने आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत पोक्सो खालील गुन्ह्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. याकरीता शाळा, कॉलेजमध्ये प्रबोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
आरमोरी : शेतात महिला एकटीच असल्याचे पाहून आरोपीने महिलेचा विनयभंग केल्याची घटना दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील चामोर्शी (चक) गावाच्या शेतशिवारात घडली. महिलेच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी आरोपी अशोक जनार्दन कारमिगे (४५) रा. चामोर्शी (चक) ता. आरमोरी याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालकाच्या शेतात खत शिल्लक आहे. ते जर पाहिजे असल्यास शेतात ये असे सांगितले. शेतात सोबत म्हणून पीडित महिलेने तिचा दीर याला सोबत घेतले होते. मात्र आरोपीने दिराला अर्ध्यात ठेवून महिलेला मालकाच्या शेतात नेले. खताची अर्धे पोते भरुन ते दिराकडे पोहचवून दिले. महिलेला शेतातच थांबण्यास सांगितले. खत पोहोचवून
अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरोपीला हाताने ढकलून दिले व आरोपीच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करुन घराकडे परतली. घटनेची माहिती घरच्या लोकांना व शेतात निंदणी करत असलेल्या बायकांना सांगितली. पीडितेचे तोंडी रिपोर्टवरून पोलिस स्टेशन आरमोरी येथे आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७६ अन्वये गुन्हा नोंद करून विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक केली. घटनेचा तपास आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती राक्षे, पोलिस हवालदार रजनीकांत पिल्लेवान करीत आहेत. आरोपी हा पीडित महिलेच्या नात्यातीलच आहे.
आरमोरी: दिनांक १५/०८/२०२४ रोजी बर्डी आरमोरी ता. आरमोरी येथील शिवम कॅफे येथे मोबाईल चार्जर दिला नाही या कारणावरून एका तरुणीस मारहाण करण्यात आली होती.
त्याबाबत दिनांक १७/०८/२०२४ रोजी प्रियंका सुकेंदू रॉय वय १९ वर्ष हिने दिलेल्या फिर्यादीवरुन पो. स्टे आरोमारी येथे गुरक्र २१८/२४ कलम ७४,७९,११५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी नामे १) सोहेल मेहमूद शेख २) अब्दुल अयुब नासिर शेख हे फरार झाले होते. गडचिरोली पोलिस दलाने सदर दोन्ही फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना आज दिनांक १९/०८/२०२४ रोजी सकाळी अटक केली अटकेनंतर दोन्ही आरोपितांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने दोन्ही आरोपितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास गडचिरोली पोलीस करत आहे