चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो राज्य शासकीय कर्मचारी सहभागी होणार.
सावली : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना २०१५ पासून ०१ नोव्हेंबर २००५ व त्यानंतरच्या सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांना १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी म्हणून ०९ वर्ष झाली अविरत कार्य करीत आहेत.या लढ्याला यश म्हणून ०१ नोव्हेंबर २००५ व त्यानंतरच्या सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांना मृत्युनंतर ची फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युइटी, रुग्णता पेन्शन व सेवानिवृत्ती नंतरची graduty लागू झाली. पण काही धूर्त लोक एनपीएस सारखीच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना कर्मचाऱ्यावर लादू पाहत आहेत.
पण महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना १९८२/८४ च्या जुन्या पेन्शन योजनेवर ठाम आहेत.मुजोर शासनास वठणीवर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने पेन्शन राज्य महाअधिवेशन १५ सप्टेंबर २०२४ ला शिर्डी येथे आयोजन केले आहे. या अधिवेशनास जुन्या पेन्शनपासून वंचित १८ लाख कर्मचारी उपस्थित राहून सरकारला जो जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान करू म्हणजेच Vote for OPS चा इशारा देणार आहेत या राज्यअधिवेशनात शासनाने उपस्थित राहून जुनी पेन्शनची मागणी पूर्ण न केल्यास सरकार बदलण्याचा १८ लाख कर्मचारी संकल्प करणार आहेत.
सत्ताधाऱ्यानी १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास या सत्ताधाऱ्याना व्होट फॉर ओपीएस च्या माध्यमातून घरी बसविण्याचा संकल्प कर्मचारी यांना केला आहे. - श्री.विपीन धाबेकर,जिल्हाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर)
1982/84 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी होत असलेल्या शिर्डी येथील पेन्शन राज्य महाअधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार राज्य शासकीय कर्मचारी उपस्थित राहणार. - श्री.लखन साखरे,जिल्हा सचिव (महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर)
चंद्रपूर,कोरपना/:- जिल्हा परिषद हाॅयस्कुल कन्हाळगाव येथे मा ना श्री हंसराजजी अहिर ओ बि सी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माझी केंद्रीय गृह राज्य मंत्री भारत सरकार यांच्या पुढाकारातुन ओकाड फाऊडेंशन व एच पी कार्पोरेशन च्या माध्यमातुन जिल्हा परिषद हाॅयस्कुल कन्हाळगाव येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात करन्यात आले या शिबीराचा लाभ 118 विद्यार्थी,विध्यर्थीनींनी घेतला या विद्यार्थ्याची निशुल्क तपासनी करुण गोळ्या औषधी देवुन उपचार करन्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा मा शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे श्री शिवाजीराव शेलोकर एस पी ओ,श्री डॉ निखिल शेरकी,श्री रविकुमार बंडीवार औषध निर्माता,श्री स्वतंत्र कुमार शुक्ला सर,नवले सर,श्री डोहे सर,श्री मडावि सर,सौ मडावी मॅडम,जिवणे सर आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जनसेवा हिच ईश्वर सेवा असून याच माध्यमातुन जनतेची सेवा करन्याची संधी मिळाली हे सौभाग्य मा ना हंसराजजी अहिर यांच्या सहकार्याने आमच्या तालुक्याला फिरते रुग्णालय मिळाले या माध्यमातुन गावागावात, घराघरात पोहचुन गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा मिळत आहे या मुळे गावातील नागरिकांना आपले आरोग्य निशुल्क तपासून,गोळ्या,औषध मिळत आहे या मुळ गोरगरीब जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे मनोगत व्यक्त केले तसेच ईतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विध्यर्थी,विध्यार्थीनी,शिक्षक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच संचालन शुक्ला सर यांनी केले तर आभार नवले सर यांनी मानले
चंद्रपूर :- ४ जुलै रोजी चंद्रपूरच्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे भरदिवसा मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर गोळीबार झाला होता, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावन्यात आलेली आहे.
सदाशिव उर्फ सिद्धू अशोक वाघमारे रा. कोरपना, प्रफुल्ल उर्फ टिल्लू सातघरे रा. मोरवा, असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे प्रकरण एलसीबीकडे सोपवण्यात आल्यानंतर शनिवारी उमरेड पोलिसांच्या मदतीने दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली.
दोन्ही तरुणांनी उमरेड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही २१ वर्षीय तरुण गुन्हेगार प्रवृत्तीचे असून यापूर्वी खून व विनयभंगाच्या गुन्ह्यात तुरुंगात गेले आहेत. दोन्ही आरोपींवर विविध गुन्हे दाखल आहे. या दोन्ही तरुणांच मनसेचे अमन अंदेवार यांच्याशी वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिक वाचा :- Entertainment News :- अंबानीच्या संगीतामध्ये जस्टिन बीबर 'चड्डी-बनिया' वर पोहचला
अधिक वाचा :- Teacher Recruitment :- राज्यात लवकरच ZP आणि खाजगी शाळेत १०,००० शिक्षक पदभरती होणार
अधिक वाचा :- Nagpur News :- हत्याकांडाचा गुन्हा दाखल असलेल्या तीन मुली बालसुधारगहातून पळाल्या
अधिक वाचा :- Chandrapur News :- जिल्ह्यात पुन्हा एकदा गोळीबार आणि बॉम्ब हल्ला
अधिक वाचा :- Today Horoscope :- ८ जुलै २०२४ ; कामात यश मिळेल आणि कुटुंबासह वेळ घालवला !
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा. Chandrapur
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा teacher
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा, teacher recruitment
☎️ : - ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
भयावह : पिता - पुत्रांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने वार करत खून केला
मूल (चंद्रपूर) :- मूल तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदी गावामध्ये आज, शनिवार दिनांक- ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास भयावह घटना घडली. घराशेजारी असलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर राजू बोदलकर यांनी पिपरे यांना केबल बाजूला करा असे सांगितले, मात्र केबल बाजूला कर असे का म्हटले म्हणून पिता-पुत्रांनी राजू यांच्यावर हल्ला केला. गुरुदास पिपरे व त्यांचा २१ वर्षीय मुलगा सूरज गुरुदास पिपरे यांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय राजू शेषराव बोदलकर यांचा कुऱ्हाडीने वार करत खून केला. या हल्ल्यात बोदलकर यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांचा राग अनावर झाल्याने ते आरोपींना पकडण्यासाठी जमले. यावेळी आरोपी गावकऱ्यांच्या हाती लागले असते तर त्यांना जिवंत जाळण्याचा प्रकार गावात घडला असता. मात्र मूल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी बाप-लेकाला ताब्यात घेतले
वीज खांबाला बांधून महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण
महावितरणच्या कर्मचाऱ्याला वीज खांबाला बांधून सरपंचाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घुग्घुस शहरात उघडकीस आला. महावितरणच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार घुग्घुस पोलिस ठाण्यात सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुरज परचाके असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
घुग्घुस येथील महावितरणचा कर्मचारी सुरज परचाके यांच्याकडे उसगाव आणि नकोडा या गावांचा प्रभार आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी परचाके उसगावला निघाले होते.
मार्गात नकोडा येथील सरपंच किरण बांदुरकर यांनी त्यांना एसीसी सिमेंट कंपनीजवळ अडविले. बांदुरकर यांनी त्यांना डीपीजवळ काम असल्याचे सांगून नकोड्याला घेऊन गेले. नकोड्याला गेल्यावर त्यांनी महावितरण कर्मचारी परचाके यांना त्यांच्याच दुपट्ट्याने वीज खांबाला बांधले. त्यानंतर गावकऱ्यांना गोळा केले. साधारणतः दोन तास त्यांनी कर्मचाऱ्याला बांधून ठेवले. यामध्ये मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. नयन भटारकर यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडविले.
*गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई २५ लाखाचे चोर बिटी बियाने जप्त*
गोंडपिपरी :-
गोंडपिंपरी येथे गोंडपिपरी पोलिसांनी व कृषी विभागाच्या भरारी पथकाने दि 23 गुरुवारी रात्री बारा वाजता दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एका आरोपीला २५ लाखाचे चोर बिटी बियाणे वाहतूक करताना बियाणे जप्त केले.
अनाधिकृत चोरबीटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही .कृषी विभागाने अनाधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. मात्र गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असल्याने व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने चोरबीटी बियाणे वाहतूक होत असते.शेतकऱ्यांना चोर बिटि विक्री करून फसवणूक केली जात आहे.या सगळ्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी कृषी विभाग,पोलीस विभाग हे अलर्ट आहेत.ठाणेदार रमेश हत्तिगोटे व पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना दि.२३ रात्री १२ वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर गोंडपिपरी पोलिसांनी आकाश गणेश राऊत वय (24) रा.अहेरी, जिल्हा गडचिरोली यांचे गाडी क्रमांक MH 34 एम 8635 वाहनाची तहसिल कार्यालय गोंडपीपरी समोर वाहन थांबवून झडती घेतली असता वाहनात अनधिकृत कापूस बियाणे 12.90 क्विंटल 25.80 लक्ष रुपये किमतीचे बियाणे सापडले. संबंधित बीटी वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.दि. (24)शुक्रवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चौकशी व कारवाई प्रक्रिया पार पडली. ही कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का,पोलीस उपपविभागीय अधिकारी शिवलाल भगत,विकास पाटील संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण आयुक्तालय,जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार,मुख्य गुणवंत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख,कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत,उपविभाग कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी,कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पंचायत समिती कृषिअधिकरी महेंद्र डाखरे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे,श्रावण बोढे,विवेक उमरे,पोहवा देविदास सुरपाम,मनोहर मत्ते,शांताराम पाल, प्रशांत नैताम,पूनेश्वर कुळमेथे यांनी कार्यवाही केली. चोरबीटी बियाणे, युरिया खत व पिकप वाहन असा एकूण 30 लाख 86 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सिंदेवाही : ०४ मे २०२४
सिंदेवाही : तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. रोजी रोटी साठी हातावर पान असणारी जनता जीव मुठीत धरून तेंडु पत्ता संकलित करण्यासाठी जीवाचे रान करीत असल्याचे दिसून येते.
दिवसाचे रात्र करून तेंदू हंगामात दोन पैसे शिल्लक पाडण्याकडे तेंदू हंगाम करणाऱ्या जनतेचा कल दिसून येतो.
त्यामुळे नेहमीप्रमाणे आज दिनांक ०५ मे २०२४ रोजी सकाळी दीपा दिलीप गेडाम नामक महिला राहणार बामणी माल तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर तेंदू पत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेली असता ०८.३० च्या सुमारास दीपा तेंदू संकलन करण्यात गुंग झाली असता आणि सोबती थोडे लांब असल्याचा फायदा घेत पट्टेदार वाघाने दिपावर हल्ला करून दिपाला जागीच ठार केले.
सभोवतालच्या सोबत्यांना सदर घटना माहिती होताच एकच गोंधळ उडाला.
सदर घटना सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीत वन विभाग शिवणी कंपार्टमेंट नंबर ३२२ मधील पेटगाव खातेरा जंगल परिसरात घडली.
जमावाने संताप व्यक्त केल्याने आणि प्रेत नेऊ देण्यास मनाई केल्याने वनविभागाची धांदल उडाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाने सिंदेवाही पोलीस स्टेशनला माहिती दिली.
पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण टीम सह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन हाताबाहेर जात असलेल्या जमावाची वनविभागाच्या मार्फत समजून काढून संतापलेल्या जमावाला शांत केले आणि पंचनामा करून प्रेत ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रवाना करण्यात आले.
सदर ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात शांतता आहे.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची ऐतिहासिक कारवाई.
(गडचांदूर हद्दीत 150 जनावरे,1 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल जप्त.)
गडचांदूर:-
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथके नेमून त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.याच श्रेणीत 1 मे महाराष्ट्र दिनी एका गोपनिय बातमीदाराकडून पोलीस स्टेशन गडचांदूर हद्दीतील मौजा हिरापूर येथील अब्दुल अजीज अब्दुल रा.गडचांदूर,हा आपला भाऊ अब्दूल अनीस रा.गडचांदूर,याच्या शेतात गाई-बैल(गोवंश)गोळा करून एका ट्रकमध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात कोंबून अवैधरीत्या वाहतूक करून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेणार आहेत.अशा खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा हिरापुर शेतशिवारात धाड मारून पाहणी केली असता,सदर शेत शिवारात अशोक लेलॅन्ड कंपनीचा आयचर ट्रक, टाटा कंपंनीचा पिकअप,असे एकूण सात वाहने थांबून दिसली.
सदर वाहनांची पाहणी केली असता,त्यामध्ये अवैधरीत्या जानावरांना कृतेने हात,पाय, तोंड बांधुन चारा पाण्याची व्यवस्था न करता, वाहनाच्या डाल्यात क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल(गोवंश)यांना आखूड दोराने कचकचून दाटीने भरून त्यांची कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी अपप्रेरीत करून,डांबून भरून, तेलंगणा राज्यात घेवून जाण्याचे समजले.सदर सातही वाहनातील एकूण 150 जनावरे व वाहने किंमत एकुण 1 कोटी,30 लाख रूपयेचा माल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील एकूण 15 आरोपींना घटनास्थळा वरून ताब्यात घेवून गडचांदूर पोलीस येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना गडचांदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.तसेच वाहनांतील गोवंशाना राजुरा-नांदाफाटा नगरपालिकाच्या कोंडवाड्यात जमा करण्यात आले.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू,यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,यांच्या नेतृत्वात व उपस्थितीत सपोनि हर्षल ओकरे,पोउपनि विनोद भुरले,पोहवा धनराज,स्वामीदास,अजय, प्रकाश,नागरे,नितीन,सुभाष,सतीश,किशोर,रजनिकांत,दिनेश,संतोष,पोशि प्रशांत,मिलींद स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली आहे.
अंगाला हळद लागण्यापूर्वीच नववधूने घेतला जगाचा निरोप
बल्लारपूर : जो आवडत होता त्याच्याशी तिचे लग्न जुळले. भावी आयुष्याचे स्वप्न ती रंगवत होती. एक दिवसा नंतर तिचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. २८ एप्रिल रविवारला तिची हळद होती परंतु निर्दयी काळाने तिच्या बापावर तिचे सरण रचण्याची वेळ आणली निशब्द होवून वडील व भावी पती तिच्या शवाकडे एकटक पाहतच होते. हे पाहून गावकऱ्यांचे सुद्धा डोळे पाणावले. ही दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे घडली. तिच्या उपचाराच्या खर्चासाठी गावकऱ्यांनी आर्थिक मदत सुद्धा केली होती. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिचा उपचारादरम्यान नागपूर येथील एम्स रुग्णालयात २७ एप्रिल शनिवारला सायंकाळी ८ वाजता मृत्यू झाला. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली महादेव गेडाम (२४) असे मृत पावलेल्या भावीवधूचे नाव आहे. वैशालीचा विवाह तिला आवडत असलेल्या गावातीलच जय टेकाम या युवकासोबत २९ एप्रिल २०२४ ला विसापूर येथे होणार होता. आठ दिवसापूर्वी तिचे पोट खूप दुखत होते अचानक जास्त अस्वस्थता वाटत असल्याने तिला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.
चार दिवस तिच्यावर उपचार झाल्यावरही प्रकृतीत पाहिजे तशी सुधारणा झाली नसल्याने डॉक्टरांनी तिला कावीळ सदृश आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिला नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्याचां सल्ला दिला. तिथे तिच्यावर चार दिवस उपचार चालला होता. परंतु प्रकृती आणखीनच खालवत होती २७ एप्रिल शनिवारला सायंकाळी तिची प्रकृती खूपच गंभीर झाली ही बाब गावकऱ्यांना माहीत झाल्यावर तिच्या उपचारासाठी सर्वांनी यथाशक्तीने आर्थिक मदत केली. परंतु त्याचा मदतीचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर शनिवारी सायंकाळी ८ वाजता उपचाराला दाद देणे तिने बंद केले. आणि तिची प्राणज्योत मावळली.
शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा आपण तिला वाचवू शकलो नाही या विवंचनेत तिचा वडील व भावी पती निशब्द होवून तिच्या कडे एकटक पाहत होते. ज्या दिवशी तिची हळद होती त्या दिवशी तिचे सरण रचण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे पाहून परिसरातील नागरिकांचे डोळे सुद्धा पाणावले.
अवैध वाळूची वाहतूक करताना टीप्पर व ट्रॅक्टर जप्त
बल्लारपूर : अवैध वाळूची ची वाहतूक करणारे टिप्पर व ट्रॅक्टर जप्त केले. असून तहसील कार्यालय परिसरात जमा केले आहे. टिप्पर मध्ये अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मंडळ निरीक्षकांना मिळताच, त्यांनी बामणी फाट्यावर टिप्परची तपासणी केली.
यावेळी टिप्पर चालकाकडे वाळूची वाहतूक परवाना आढळून आला नाही. तसेच नांदगाव पोडे येथील ट्रॅक्टरमधून वाळूची अवैध वाहतूक करीत असताना त्याची चौकशी करून तसेच दोन्ही वाहने जप्त करून तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेला टिप्पर क्रमांक एमएच ३४ बीजी ६२४७ असून ते राजुरा येथील एम. चौधरी यांच्या मालकीचा आहे.टिप्परमध्ये पाच ब्रास रेती आढळून आली. तर ट्रॅक्टर नांदगाव पोडे येथील श्रीकांत देऊळकर यांच्या मालकीचा आहे. दोन्ही वाहनांवर बल्लारपूर तालुका मंडळ निरीक्षक प्रकाश सुर्वे यांनी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांत प्रचंड दहशत पसरली आहे.
धावत्या ट्रकने अचनक घेतला पेट..
कोरपना तालुक्यातील घटना.
कोरपना:-
कोरपना तालुक्यातील आसन गावाजवळ ओव्हरलोड गिट्टी भरलेल्या एका धावत्या हायवा ट्रकने अचानकपणे पेट घेतल्याची घटना आज 22 एप्रिल रोजी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास घडली.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून ट्रक मात्र पुर्णपणे जळाला.यवतमाळ जिल्ह्यातील मोहदावरून कोरपना मार्गे गिट्टी भरून येत असताना मागच्या टायरने अचानक पेट घेतला.टायर पेटत असल्याची माहिती रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी चालकाला दिली असता तो वाहन थांबवून लगेच खाली उतरला.वाहनात कुठलेही अग्निशामक साहित्य नसल्याने तो आग विझवण्यात अपयशी ठरला आणि पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले.
राजुरा,गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या मार्गाच्या कामावर असलेल्या पाणी टँकरच्या पाईपने सुद्धा आग विझवण्याचा प्रयत्न झाला.मात्र,आग नियंत्रणात आली नाही.दरम्यान घटनेच्या अर्धा तासानंतर गडचांदूर नगर परिषद व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अग्निशमन वाहन आले व आगीवर नियंत्रण मिळवले.तोवर हायवा ट्रक पुर्णपणे जळाला होता.आगीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व वाटसरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.
विषप्राशन करून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा.
कोरपना तालुक्यातील धक्कादायक घटना.
कोरपना:-
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना तालुक्यातील 'पिपर्डा' गाव येथे एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 20 एप्रिल रोजी समोर आली आहे.खुशाल राठोड वयवर्ष अंदाजे 62,असे मृत शेतकऱ्याचे नाव असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली सदर घटना सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत असल्याचे बोलले जात आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सविस्तर असे की,मृत शेतकरी खुशाल राठोड यांनी मागील सन 1993-94 मध्ये बियाणे,रासायनिक खते व औषधी खरेदीसाठी एका सावकाराकडून 50 हजारांचे कर्ज घेतले होते.सदर रक्कम टप्प्या-टप्प्याने त्यांनी 1997 मध्येच परत केली.असे असताना मात्र,त्या सावकाराने लाखो रुपयांचे कर्ज दाखवून राठोडकडे वसुलीचा तगादा लावला.याविषयी राठोड यांनी स्वतः त्याची भेट घेऊन सांगितले होते की,माझ्याकडे कर्ज नसताना तुम्ही मला कसे काय नोटीस पाठवता.'तू मला दिलेल्या पैशांच्या पावत्या दाखव,अन्यथा तुझ्यावर मी कोर्टात दावा दाखल करतो’ असा दम सावकाराने दिल्याचे कळते.या कारणाने राठोड सतत चिंतेत रहायचं.
दरम्यान 4 दिवसापुर्वीच कारणे दाखवण्यासाठी न्यायालयाने त्याला 20 एप्रिल रोजी न्यायालाया समोर हजर राहण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले होते.त्यामुळे पुन्हा राठोडच्या चिंतेत भर पडली. त्याने 19 एप्रिल रोजी आपला मतदानाचा हक्क बजावून 'मी कर्जापाई त्रस्त आहो,तो माझा जीव घेत आहे'असे रात्रभर बडबडत होता अशी माहिती आहे.20 एप्रिल रोजी कुटुंबातील सर्व जण शेताकडे जात असताना, 'मी कोर्टात जाणार आहे,तुम्ही शेताकडे जा.' असे राठोड यांनी त्यांना सांगितले.यामुळे घरचे सर्व शेताकडे निघून गेले.आणि त्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषप्राशन केले व उलट्या करतानाचे चित्र पाहून घरी असलेला नातू रडू लागला.हे ऐकून इंदल राठोड या शेजाऱ्याने राठोडच्या घराकडे धावा घेत पाहिले तर,त्याची प्रकृती खराब दिसली.त्याला तातडीने कोरपना ग्रामीण रुग्णालयात भरती केले.मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. दुर्दैवाने त्याचा प्रवासा दरम्यान मृत्यू झाला.
न्यायालयाचा आधार घेऊन त्या सावकाराच्या अशा पद्धतीच्या वसुलीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाल्याचे बोलले जात असून याच्या अशा कारभारामुळे कर्जदार शेतकरी मोठ्या प्रमाणात दहशतीत असल्याची चर्चा आहे. खुशाल राठोडच्या मृत्यूला तोच व्यक्ती जबाबदार असल्याचे आरोप करत याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी त्याच्या पत्नी व मुलाने केली आहे. तसेच शासनाने तातडीने राठोडच्या परिवाराला मदत करावी व सावकारावर ताबडतोब कारवाई करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस(अजीत दादा गट)प्रदेश सहसचिव सैय्यद आबीद अली, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष उत्तम पेचे व इतरांनी कुटुंबाच्या भेटी दरम्यान केली आहे.
अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदारांनी घेतला ताब्यात
पोंभूर्णा : - अंधारी नदी भिवकुंड घाटातून अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर बुधवार दि.२० मार्चच्या मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास पोंभूर्णा एमएसईबी ऑफीसजवळ तहसीलदारांनी पकडून तहसिल कार्यालयात जमा केले.
तालुक्यात रेतीघाटांचे लिलाव झालेले नाही व या दिवसात रेती उपसा पूर्णपणे बंद आहे. असे असताना रेती माफिया अंधाराचा फायदा घेत अवैध रेती वाहतूकीचा सपाटा लावला आहे.पोंभूर्णा तालुक्यातील अंधारी नदी भिवकुंड घाटातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी कदम यांना मिळताच बुधवार दि.२० मार्चला मध्यरात्रीनंतर दिड वाजताच्या सुमारास रुपेश चन्नावार यांच्या मालकीची अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर क्र. एमएच ३४ बीएफ-१७७५ व ट्राली क्र. एमएच ३४ बीव्ही ७३७७ पकडुन तहसीलदार यांनी तहसील कार्यालयात जमा केली.महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८(७)व (८)अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे.
जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा संघर्ष,समूह शाळे विरोधात भर उन्हात पंचायत समिती समोर विद्यार्थी पालकांचे धरणे आंदोलन....
जिल्हा परिषद शाळेत २० पैकी कमी पटसंख्या असलेल्या ६२,००० शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.यात गोंडपीपरी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.२० पैकी कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याच्या शासनाचे विचाराधीन आहे.यात तालुक्यातील विठ्ठलवाडा या शाळेचा समावेश आहे.येनबोथला,कोरंबी,चेक विठ्ठलवाडा,तारसा (बुज),नांदगाव,नवेगाव या जिल्हा परिषद शाळांचा समावेश असून समूह शाळेचा निर्णय रद्द करण्यात यावा याकरिता ६ जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी (दि.१५) रोजी पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर भरउन्हात शाळा वाचविण्यासाठी धरणे आंदोलन केलीत.
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका गॉडपिपरी अंतर्गत २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६ शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला तर दुसरीकडे विठ्ठलवाडा येथे समूह शाळा सुरू करण्यात येत असून
या सहाही गावचे पालक,शेतकरी, शेतमजूर व कामगार असून या गावातील शाळा बंद झाल्यास इयत्ता १ ते ४ थी मध्ये शिक्षण घेत असलेली वर्ष ६ ते १० या वयोगटातील मुले विठ्ठलवाडा येथे ये-जा करू शकत नाही किंवा शेतीवाडीचे कामे सोडून मुलांना दररोज ६ ते ७ किमी.उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूत ने-आण करू शकत नाही.पर्यायाने आमची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. तसेच कोरंबी व चकविठ्ठलवाडा हि दोन गावे विठ्ठलवाडा जिथे की समूह शाळा नियोजित आहे.या गावामधून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे.सदर महामार्गावरून सुरजागड लोहप्रकल्पाचे कच्च्या माल वाहतुकीचे अनेक हायवा ट्रक ये-जा करतात.यापूर्वी या महामार्गावर विद्यार्थ्यांचे अनेक अपघात झालेले आहे.तेव्हा आमच्या गावची शाळा बंद करून विठ्ठलवाडा येथे आमची ग्रामीण भागातील मुले पाठविणे पूर्णता गैरसोयीचे आहे.तेव्हा गाव तिथे शाळा या तत्वाला अननुसरुन आमची शाळा बंद करु नये व आमच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित करू नये.अशा विषयाचे निवेदन गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे यांना देण्यात आले.शिक्षणाबाबतचे जनहित विरुद्ध धोरण तात्काळ रद्द करावे म्हणून सकाळी ११ वाजता गटविकास अधिकारी,पंचायत समिती गोंडपिपरी यांच्या कार्यालयासमोर पालक व विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले.यावर प्रशासनाने काही दखल न घेतल्यास सर्व पालक व विद्यार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.चंद्रपूर यांच्या कार्यालय समोर धरणे आंदोलने करणार असल्याचे पालकांनी सांगितले.यावेळी
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम उराडे ,दिपक ठेंगणे , शारदा मांडवगडे ,अंतकला निकोडे , कालिदास सातार ,शरद मेश्राम, अड.वामनराव चटप,शलिक माऊलीकर, मोरेश्वर सूरकर,सोनी दिवसे,अशोक कुडे, यासह अनेकांची उपस्थिती होती.
देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास पकडले, 4,52,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त
गोंडपिपरी पोलिसांची कारवाई
अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती गोंडपिपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना मिळाली.पोलिसांनी गोंडपिपरी शहरातील मुख्य मार्गावर नाकाबंदी केली. दरम्यान शिवाजी चौक गोंडपिपरी येथे एका वाहंनाला अडवून तपासणी केली असता त्या वाहनात दारू सापडली. अवैध दारू सह 4,52,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत आरोपी प्रकाश विजय बोरकर रा. सिद्धार्थ नगर दुर्गापूर यांच्या वर मदाका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्हयाची सीमा गोंडपिपरी तालुक्याला लागून आहे. गोंडपिपरी मार्गे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू पुरविली जाते. चंद्रपूर येथून चारचाकी वाहनाने अवैध दारू येतं असल्याची माहिती ठाणेदाराना मिळाली. लागलीच सापळा रचून वाहन क्र. एम. एच.05 सी. एच.1699 या वाहनांची तपासणी केली असता देशी दारू आढळली.
निळ्या रंगाच्या आठ मोठ्या प्लॅस्टिक पिशवी मध्ये रॉकेट संत्रा देशी दारूचे प्रत्येकी ९० एम एल चे ज्यावर आर .व्ही .बिन ४२४ फेब २०२४ असे बॅच नंबर लिहून असलेले एकूण १५०० नग प्रत्येकी किंमत ३५ रुपये प्रमाणे ५२,५०० रुपये व पांढरा रंगाची हुडाई कंपनीची चारचाकी वाहन किंमत चार लक्ष रुपये असा एकूण ४,५२,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीचे नाव प्रकाश विजय बोरकर असे आहे. आरोपीची चौकशी केली असता सदर दारू हि शैलेश वानखेडे रा. तुकुम, चंद्रपूर यांची असून त्यांनी लगामबोरी येथे नेण्यास सांगितले अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ६५ (अ) मदाका अंतर्गत गून्हा नोंद करन्यात आला आहे.
सदरची कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे , पी.एस.आय. मोगरे , वागदरकर, गौरकार, चालक पवार यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
कुलथा यात्रा महोत्सवाला गेलेला युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. कुलथा येथे दोन नद्यांचा संगम असून मोठ्या प्रमाणात नदीवर आंघोळ करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते अशातच आज दि ९ शनिवारी दुपारी एक वाजता दरम्यान आंघोळ करायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा हनुमान मंदिर येथे सर्व धर्म समभावाचे दर्शन पाहायला मिळते.हनुमानजींच्या मूर्तीचे दर्शन घेणारे हजारो भक्त शिवरात्री,आषाढी एकादशीनिमित्त कुलथा यात्रा महोत्सवाला येतात हजारो भक्त दर्शनासाठी धार्मिक भावनेतून रांग लावतात.यावेळी हनुमानजीची मूर्ती त्यांचे दुःख दूर करतात हा तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा आत्मविश्वास आहे.
कुलथा हे गाव गोंडपिपरी - मूल मार्गावर वढोली येथून उजवीकडे ४ कि. मी अंतरावर आहे.अंधारी व वैनगंगा ह्या दोन्ही नद्यांच्या मधोमध वसलेले कुलथा गाव आहे.
महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत असते. दि.७ गुरुवार पासून यात्रा महोत्सवाला सूरवात झाली असून ही यात्रा १२ तारखेपर्यंत असते तालुक्यातील धानापुर येथील आकाश अशोक शेडमाके वय २३ याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुळुन मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनास्थळी गोंडपिंपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे दाखल होऊन पंचनामा करत प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठविले आहे
दुर्दैवी घटना :नाल्यात कोसळलेल्या कारने घेतला पेट; कारचालकाचा आगीत होरपळून मृत्यू
नागपूर-चंद्रपूर महामार्गावर प्रवास करीत असताना एक मारूती इग्नेश कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळी आणि तिने अचानकपणे पेट घेतला. या आगीत होरपळून कार चालकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना 8 मार्च रोजी सकाळी अंदाजे 7 च्या सुमारास भद्रावती शहरा जवळील कोंढा नाल्यात घडली. या घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि अर्धवट जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला.
बातमी लिहिस्तोवर सदर घटनेतील मृत चालकाची ओळख पटलेली नव्हती. सदर कार मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरवरून चंद्रपूरकडे येत असताना ती कोंढा नाल्याच्या पुलावरील कठड्याला धडकून नाल्यात कोसळली. कोसळल्यानंतर कारने पेट घेतला. चालकाने कार मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, त्याला बाहेर निघता न आल्यामुळे कारला लागलेल्या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला. असे अंदाज वर्तविले जात आहे. घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे
4 हजाराची लाच घेताना महिला तलाठी अडकल्या एसीबीच्या जाळ्यात
चंद्रपूर - महिला तलाठी ला 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी मौजा सिदूर पिपरी येथील शेती पत्नी व मुलांच्या नावे बक्षिस पत्र करून दिले होते, बक्षीस पत्राच्या आधारे शेतीचे फेरफार करण्याच्या कामाकरिता मौजा नागाळा येथील तलाठी कार्यालयात जात तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुडूंरवार यांच्याकडे अर्ज केला, काही दिवस झाल्यावर अर्जाचे काय झाले याबाबत फिर्यादी हे तलाठी कार्यालयात गेले, त्यांनी तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी फेरफार व सातबारा तयार करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली.
फिर्यादी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली, 7 मार्च रोजी तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील सापळा रचला, त्यावेळी तलाठी प्रणाली तुडूंरवार यांनी तडजोडीअंती 4 हजाराची लाच मागितली.
तलाठी कार्यालय नागाळा येथे प्रणाली तुडूंरवार यांना 4 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली..तलाठी तुडूंरवार यांना शासनाची सेवा करताना अंदाजे 40 हजार रुपये पगार मिळतो तरी त्यांनी शेतक-याला 4 हजाराची लाच मागितली हे विशेष.
सदर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, हिवराज नेवारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे यांनी केली.
शुल्लक कारणावरून आरोपीने केली आपल्या पत्नीसह दोन मुलींची कुऱ्हाडीने हत्या....
नागभीड तालुक्यातील मौशी येथील घटना.
ब्रह्मपुरी: घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा व दोन मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची थरकाप उडवीणारी घटना नागभीड तालुक्यातील मौशी या गावात घडली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. पत्नी अल्का तलमले(वय 40), मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20), लहान मुलगी तेजस्विनी तलमले (वय 18)असे मृतांची नावे आहेत.यामध्ये मुलगा अनिकेत बचावला आहे. संशयित आरोपी पती अंबादास लक्ष्मण तलमले (वय 50)याला नागभीड पोलिसांनी अटक केली आहे.
. नागभीड पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मौशी येथे अंबादास तलमले कुटुंबासह राहत होते. पत्नी अल्का, मोठी मुलगी प्रणाली, लहान मुलगी तेजस्विनी व मुलगा अनिकेत असे त्याचे कुटुंब होते. अंबादास व त्याची पत्नी अल्का शेतमजुरीचे काम करीत होते. रविवार ३ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास मुलगा अनिकेत गावातीलच एका हॉटेलात कामाकरिता गेला.यावेळी पत्नी व मुली झोपेत होत्या. मुलगा कामाकरिता बाहेर गेल्याची संधी साधून आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास अंबादासने एका पाठोपाठ एक पत्नी अल्का मुलगी प्रणाली व तेजस्विनी या तिघींवर सपासप कुऱ्हाडीने वार करून जीवाणीशी ठार मारले.
. सकाळी घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. संशयित आरोपी अंबादास तलमले याला पोलिसांनी अटक केली आहे. घरगुती भांडणातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून केल्याने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड करीत आहेत. हत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.घरगुती भांडणातून हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे
आरोपी दोन -तीन महिन्यांपासून सोबत कुऱ्हाड घेऊन झोपत होता. गावात दारू पिऊन धिंगाणा घालीत होता. तसेच गावातील शेजारच्या एका व्यक्तीचे घरातील टीव्ही व आलमारीची तोडफोड सुद्धा केली असल्याचे गावाकऱ्यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी मृतक एकाच खोलीत झोपलेल्या होत्या. तर आरोपी शेजारच्या खोलीत झोपला होता, घटनेनंतर आरोपीने दाराची कडी आतून लावून पुन्हा आपल्या खोलीत जाऊन झोपला सकाळी शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या भावास बाहेर कुणी न दिल्याने त्यांनी लोकांना बोलविले यावेळी खिडकीतून डोकावून पाहिले असता आरोपीची पत्नी व दोन्हीमुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या विशेष म्हणजे तेजस्विनीची बारावीची परीक्षा असल्याने तिच्या खाटेखाली अभ्यासक्रमाचे पुस्तके आढळून आली.
आई दोन महिन्याच्या तान्हुल्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर तयार केला पाळणा
गोंडपिपरी, ता. २१ : बारावीचा पहिला पेपर नवरा कामावर गेला अन् सोबतीला दोन महिन्याचे चिमुकल बाळ. घरी सांभाळ करणारे कुणीच नाही. दुसरीकडे पेपर सोडविणेही महत्वाचे होते. अशात ती आई दोन महिन्याच्या तान्हुल्याला घेत परीक्षा केंद्रावर पोहचली. केंद्राबाहेर एका झाडाखाली झुला तयार केला. त्यात तान्हुल्याला झोपवित ती परीक्षा देण्यासाठी सज्ज झाली. एका आईचे ममत्व, शिक्षणाप्रती गोडी बघून सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलिसाने आपले कर्तव्य जोपासत त्या तान्हुल्याचा तीन तास सांभाळ केला अन् आपल्या संवेदनशीलतेचाही परिचय दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील जनता विद्यालयात हा प्रकार बघून उपस्थितांनाही भारावून गेले.
भाग्यश्री रोहित सोनुने या कोठारी येथील रहिवासी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन महिन्याचे बाळ आहे. पती रोजीरोटी करून आपल्या संसाराचे रहाटगाडगे कसबसे चालवितात. भाग्यश्रीला शिक्षण घेण्याची इच्छा होती. तिने बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पतीनेही तिला साथ देत प्रोत्साहन दिले. आजपासून बारावीची परिक्षा सुरू झाली. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. पती नेहमीप्रमाणे कामावर गेले. आता परीक्षा तर द्यायची पण घरी बाळाचा सांभाळ करण्यासाठी कुणीच नाही. अशास्थितीत काय करायचे, असा प्रश्न तिच्यासमोर पडला.
अशात दोन महिन्याच्या बाळाला घेत ती परीक्षा केंद्रावर पोहचली. केंद्रालगत असलेल्या एका झाडाला तिने पाळणा बांधला, बाळाला या पाळण्यात झोपवित ती पेपरला गेली. पेपर सोडविताना अधुनमधून ती बाळाला बघायला बाहेर यायची. याचवेळी परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका महिला पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आला. तिने भाग्यश्रीला तू पेपर सोडव मी त्याच्याकडे लक्ष देते असे सांगितले. त्यानंतर संपूर्ण पेपर होईपर्यंत त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने बाळाकडे विशेष लक्ष दिले. एकदाचे पेपर संपला अन् भाग्यश्रीच्या जिवात जिव आला. हा प्रंसग बघताना उपस्थित भारावून गेले. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यांचा हा संदेश कोट्यवधी भारतीयांसाठी नवी प्रेरणा देणारा ठरला आहे.