गडचिरोली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील ३८ वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेली जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह ११ नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात १ डीकेएसझेडसीएम, ३ डीव्हीसीएम, २ एसीएम व ४ दलम सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ८६ लाख ५ हजार रुपयांचे बक्षीस होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला.
दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तारक्का ही मागील ३८ वर्षापासून नक्षल चळवळीत होती. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची ती पत्नी आहे. तिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. विमला चंद्रा सिडाम उर्फ तारक्का उर्फ वत्सला उर्फ तारा डीकेएसझेडसीएम, सुरेश उईके उर्फ चैतू उर्फ बोटी, डीव्हीसीम कुतुल एरिया कमिटी व त्याची पत्नी कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी (डीव्हीसीएम), अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीव्हीसीएम राही दलम व त्याची पत्नी सम्भ पांडू मट्टामी उर्फ बंडी (एसीएम डी. के. झोन डॉक्टर टीम), वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशीला (एसीएम भामरागड दलम), निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमिली दलम, श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना, सदस्य कंपनी क्रमांक १०, शशिकला पतीराम धुर्वे पश्चिम सबझोनल प्रेस टीम सदस्य, सोनी सुक्कू मट्टामी राही दलम सदस्य, आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर ३२ यांचा आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही, हे नक्षलवाद्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत, असे फडणवीस म्हणाले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग करीत असलेल्या विकासकामांमुळे मागील चार वर्षात नक्षल चळवळीत एकही नवीन भरती झाली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी विविध चकमकींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कोण आहे तारक्का?
६२ वर्षीय तारक्का नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तसेच दंडकारण्य विभागाच्या वैद्यकीय पथकाची प्रमुख होती. अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथील मूळ रहिवासी असलेली तारक्का ही मागील ३८ वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होती. तिची प्रचंड दहशत होती. अनेक चकमकी आणि खुनांमध्ये तिचा सहभाग होता.
लाहेरी-मलमपोडूर चकमकीचे नेतृत्व
८ नोव्हेंबर २०१० रोजी लाहेरी-मलमपोडूर गावांमध्ये झालेल्या चकमकीत १७ पोलीस शहीद झाले होते. या चकमकीचे नेतृत्व तारक्काने केले होते. शिवाय त्याची चित्रफितही तिने प्रसारित केली होती. या चकमकीच्या वेळी नक्षलवाद्यांनी सामान्य महिला व पुरुषांच्या वेशभूषेत पाने तोडत असल्याचे भासवून पोलिसांवर हल्ला केला होता. भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमधील आदिवासींमध्ये तारक्का सामान्य महिलेसारखी वावरत असे. त्यामुळे तिच्यावर कुणी संशयही घेत नसे. परंतु वय वाढल्याने मागील काही वर्षांपासून ती अबुजमाडमध्ये वास्तव्यास होती.
गडचिरोली : तालुक्यातील दिभना येथे२४ नोव्हेंबर रोजी एका तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता. एका महिन्यानंतर या प्रकरणात नवा द्विस्ट आला. पत्नी सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने आत्महत्या करत असल्याचा मृताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सासऱ्याच्या फिर्यादीवरुन आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुनेविरुध्द २५ डिसेंबरला गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
विवेक पुंडलिक भरडकर (३५, रा. गोगाव ता. गडचिरोली) असे मयताचे नाव आहे. तो गवंडीकाम करायचा. २०१३ मध्ये त्याचा विवाह निमगाव (जि. चंद्रपूर) येथील अल्का हिच्याशी
झाल्या. लग्नानंतर काही दिवस सुखात गेले, नंतर पती पत्नीत कौटुंबिक कारणावरुन खटके उडू लागले. यातून काही दिवस ती माहेरी राहत होती. नातेवाईकांनी समजावल्यानंतर ती परत नांदण्यास आली. दरम्यान, १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पती-पत्नीत वाद झाला. १७ नोव्हेंबरला रोजी तो बाम्हणी येथे बांधकामावर कामासाठी गेला. नंतर तो परतलाच नाही. २४ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह आढळला. विवेकने १७ नोव्हेंबरला आपल्या
मोबाइलमध्ये एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्याने पत्नी सतत चारित्र्यावर संशय घेते, तिच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे, असे म्हटले होते. या व्हिडिओआधारे पुंडलिक भरडकर यांच्या फिर्यादीवरुन गडचिरोली ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८ अन्वये गुन्हा नोंद झाला. तपास उपनिरीक्षक दीपक मोहिते करत आहेत.
🟠दोन मुली प्रेमाला पारख्या
अल्का व विवेक यांना काव्या व त्रिशा अशा दोन मुली आहेत. कौटुंबिक कलह व संशयातून वडिलांनी आत्महत्या केली, या गुन्ह्यात आईवर गुन्हा नोंद झाला. त्यामुळे या दोन्ही मुली प्रेमाला पारख्या झाल्या आहेत.
गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातूनvगडचिरोलीकडे दुचाकीवरून दारू आणताना एकास पोलिसांनी हात दाखवून थांबवले. मात्र, त्याने गाडी रस्त्यावर उभी करून अंधारात धूम ठोकली. दहा हजारांच्या दारूसह दुचाकी असा एकूण ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नवेगाव (ता. गडचिरोली) येथे १९ रोजी रात्री साडेअकरा वाजता केली.
आकाश प्रकार भोयर (रा. व्याहाड, बु. ता. सावली, जि.चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. तो दुचाकीवरून (एमएच ३३, सीके ६१५१) गडचिरोलीत दारू घेऊन येत
असल्याची माहिती मिळाल्याने गडचिरोली पोलिसांनी नवेगाव येथे १९ रोजी रात्री साडेअकरा वाजता सापळा लावला.
तो येताच पोलिसांनी इशारा करून रोखले असता त्याने दुचाकी उभी करून अंधारातून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, पण तो हाती लागला नाही.
दुचाकीसह देशी दारू असा एकूण ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याबाबत पो.ना. धनंजय चौधरी यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात आकाश भोयरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपास हवालदार स्वप्नील कुंदावळे करत आहेत.
गडचिरोली : माझी बदनामी का करतो, अशी कुरापत काढून एकास घरात शिरून मारहाण केली. ही घटना १३ डिसेंबरला सायंकाळी सात वाजता नवरगाव येथे घडली.
वामन ब्रह्मानंद कोकीळ (३८, रा. नवरगाव, ता. गडचिरोली) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. ते मजुरीचे काम करतात. १३ डिसेंबरला ते सायंकाळी शेतातून आले होते. यावेळी गावातीलच स्वप्नील थोरात (२६) याने घरात शिरून तू माझी गावात बदनामी का करतो, असा जाब विचारत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शर्टही फाडले. यावेळी त्याचे वडील त्यास घेऊन गेले. मात्र, जातानाही तो शिवीगाळ करत होता. याबाबत गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक दीपक मोहिते तपास करीत आहेत.
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल : बाह्य आकर्षण, चित्रपटांचा प्रभाव
गडचिरोली :
प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर मुलाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यास त्याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात मुलाला अटक होऊन न्यायालयात हजर केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३५ अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आले, अशी माहिती पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित असलेले कायदे केंद्र शासनाने अतिशय कडक केले आहेत. थेट पोक्सो या कायद्यांतर्गत मुलाविरोधात गुन्हा दाखल होते. या कायद्यामध्ये आरोपीला अतिशय कठोर शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. मुलाला अनेक वर्ष तुरूंगात घालवावी लागतात.
🟠 आठवी- नववीच्या मुलीला लग्नाचे आमिष
आठव्या ते नवव्या वर्गात असलेल्या लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले जाते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होते.
🟠पोलिसांकडून 'ऑपरेशन मुस्कान'
अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर त्यांचे पालक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतात. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिस विभागामार्फत ऑपरेशन मुस्कान राबविले जाते. या ऑपरेशन अंतर्गत अनेक पळवून नेलेल्या मुलींचा शोध पोलिसांनी घेतला आहे.
🟠अकरा महिन्यांत ३५ मुली पळविल्या
जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरातील जवळपास ३५ अल्पवयीन मुलींना पळवून नेले आहेत. त्याच्याशी संबंधित गुन्हे संबंधित पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत.
🟠अपहरणाचा गुन्हा; मुलाला थेट अटक
अल्पवयीन मुलीला पळवून नेणे हा अतिशय गंभीर गुन्हा मानल्या जाते. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यास मुलाविरोधात थेट अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक केली जाते. न्यायालय शिक्षा देते.
अनेक प्रकरणांत मुलगाही अल्पवयीन
काही प्रकरणांमध्ये मुलीसोबतच मुलगासुद्धा अल्पवयीन असल्याचे आढळून येते. अशावेळी मुलाला सुधारगृहात ठेवले जाते.
अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर
मोठ्या शहरांमध्ये अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर होत असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. गुन्हेगारी करण्यासाठी त्यांचा ब्रेन वॉश केला जाते. त्यांना गुन्हेगारीशी संबंधित प्रशिक्षणसुद्धा दिले जाते.
काही मुलींना पळवून नेल्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. ही अतिशय गंभीर बाब आहे.
निवडणूक प्रक्रियेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग समन्वय समिती सदस्य राहूल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली येथिल जिल्हा अध्यक्ष संदिप पेद्दापल्ली व संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले
दि: 03/12/ 2024
गडचिरोली: पोलीस बाईज संघटना ही सतत महाराष्ट्र पोलिसांच्या हितासाठी व संरक्षणासाठी त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत शासनाशी लढा देत असून आतापर्यंत शेकडो पोलिसांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला आहे.
आदिवासी अति दुर्गम व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. याकरिता विशेष परिश्रम घेणारे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी राहूल मीना यांचा पोलिस बॉईस सघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदिप पेद्दापल्ली व संघटनेचे पदाधिकारी यांनी भेट घेतली निवडणूक यशस्वीपणे राबविल्याबद्दल यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
निवडणूकिच्या या कार्यकाळात कोणतीही अनूचीत घटना न घडता अत्यंत शांततामय परिस्थिती मध्ये पार पाडण्यात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यश आले. यासाठी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचेहि विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी पोलिस बाईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप पेद्दापल्ली ,जिल्हा उपाध्यक्ष सागर हजारे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरज गुंडमवार, जिल्हा सचिव रोशन कवाडकर,शहर अध्यक्ष अनुराग कुडकावार,जिल्हा सहसचिव हेरिष हकिन ,संतोष पडिहार,मिथून देवगडे महिंद्रा ठाकरे आदि उपस्थित.
अहेरी : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लैंगिक शोषण केले. त्यात ती गर्भवती झाल्यानंतर गर्भपातासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध दिले. यात पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणात तरुणास सात वर्षे सश्रम कारावास, तर त्याच्या मावशीला चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ३ डिसेंबरला येथील अतिरिक्त सत्र न्या. आर. एन. बावणकर यांनी हा आदेश दिला.
अनिल नानाजी ईजमामकर (वय ३४, रा. आलापल्ली, ता. अहेरी), त्याची मावशी चंद्रकला सुरेश धानोरकर (४७, रा. अनखोडा, ता. चामोर्शी) अशी आरोपींची नावे आहेत. २०१७ मध्ये अहेरी ठाणे हद्दीत अनिल इजमामकर याच्यावर अल्पवयीन मुलीवर
अत्याचार प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार तसेच अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, गर्भधारणा झाल्याने अनिल ईजमामकर याने मावशी चंद्रकला धानोरकर हिच्या मदतीने पीडित मुलीला औषध प्यायला दिले. या औषधानंतर गर्भपात झाला. यात पीडितेचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे तिची तब्येत खालावली. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे खुनाचे कलमही वाढले. तपास करून तत्कालीन उपअधीक्षक गजानन टोम्पे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. ३ डिसेंबरला न्यायालयाने अनिल इंजमामकर यास सात वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, तर चंद्रकला धानोरकर हिला ४ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.
मृत्यूपूर्व जबाब, अहवाल महत्त्वाचा
या प्रकरणात पीडितेचा मृत्यूपूर्व जबाब, वैद्यकीय अहवाल हा आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचा धागा ठरला. यासोबत सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
गडचिरोली : शहरापासून तीनकिलोमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात चार शाळकरी मुले बुडाली. सुदैवाने यातील तिघे थोडक्यात वाचली. मात्र, एकाचा मृत्यू झाला. ही घटना ३० नोव्हेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, उत्तरीय तपासणीला विरोध करत नातेवाईकांनी मृत मुलाचे शव जिल्हा रुग्णालयातून नेले.
जयंत आझाद शेख (१०,रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे नाव आहे. रियाज शब्बीर शेख (१४), जिशान फय्याज शेख (१५), लड्डू फय्याज शेख (१३, सर्व रा. तेली मौहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) हे बालंबाल बचावले. हे सर्व जण मिळून ३० नोव्हेंबरला दुपारी शहराजवळील बोरमाळा नदीघाटावर फिरण्यासाठी गेले होते. सोबत जिशान व लड्डू यांची आई ताजु शेख या देखील होत्या. वैनंगगा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे. पण पात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने मौजमजाम्हणून उतरलेली चारही मुले एकापाठोपाठ एक बुडाली.दरम्यान, यातील जयंत शेख यास जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतरडॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. इतर तिघे जिल्हा रुग्णालयात उपचारास आल्याची नोंद नाही. या घटनेनंतर हनुमान वॉर्डातील तेलीगल्लीत मोठी गर्दी झाली होतीयाबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात नोंद उशिरापर्यंत झाली नव्हती.
🟠हिंमत करून मातेने दोन मुलांसह तिघांचे वाचवले प्राण
चारही मुले बुडाल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली. नदीकाठावर असलेल्या ताजु फय्याज शेख यांनी धावत जाऊन पाण्यात उडी घेतली, हिंमत दाखवत त्यांनी एकटीने जिशान, लड्डू या आपल्या दोन मुलांसह रियाज यास बाहेर काढले, पण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेलेल्या जयंत शेख यास वाचविण्यात त्यांना यश आले नाही. यावेळी मदतीसाठी काही मच्छीमार धावले. त्यांनी जयंत यास बाहेर काढले. मात्र, दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. इतर तीन मुले सुखरूप वाचली.
🟠जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालून दुचाकीवरून नेला मृतदेह
जयंत शेख याच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती कळवून शवविच्छेदन करण्याची तयारी केली. मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. २० ते २५ नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालून सुरक्षारक्षक, परिचारिकांशी हुज्जत घातली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तो दुचाकीवरुन नेला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
गडचिरोली, ब्युरो. गडचिरोली न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रघुवंशी यांच्या न्यायालयाने गडचिरोली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्या अट्टल दारूविक्रेत्यास 3 वर्षे कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी (दि. 25) सुनावली आहे. उमाकांत विठ्ठलराव शिवणकर, असे शिक्षा झालेल्या दारूविक्रेत्याचे नाव असून तो गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी आहे. गडचिरोली
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव येथील उमाकांत शिवणकर हा अवैध दारूविक्री करत होता. दरम्यान, 2022 मध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत हजारो रुपयांच्या देशी दारूच्या सुमारे 350 बाटल्या जप्त केल्या होत्या. त्याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, सोमवारी सुनावणीदरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रघुवंशी यांच्या न्यायालयाने दारूविक्रेत्याला दोषी ठरविले.
गडचिरोली,,
एका खासगी शाळेत वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादातून इयत्ता 9 वि तील विद्यार्थ्यांने त्यांच्याच वर्गात शिकण घेणारा मुलाचे काचेने गळा चिरला हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रसंगी एका 14 वर्षिय मुलाविरोधात कोणाचा प्रयत्न केला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच संबंधित मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. जखमी झालेल्या मुलानेच 14 वर्षिय मुलाविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार दार मुलगा एका खासगी शाळेत इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत आहे. 14 वर्षिय मुलगा देखील त्याच वर्गात शिकण घेत असून दोघांमध्ये वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता वर्गात संबंधित विद्यार्थ्यांनी खुणाची धमकी देत हे कृत्य केले.
देसाईगंज : देसाईगंज ते लाखांदूर मार्गावरील कार्मेल कॉन्व्हेंटजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना १३ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. अनिकेत ईश्वर आदे (२१, रा. नवीन लाडज, ता. देसाईगंज) असे मयताचे नाव आहे. तो देसाईगंजवरून दुचाकीने गावी परतत होता. ट्रकने (सीजी ०४ एलएस- २४५८) त्यास धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. दरम्यान, लाखांदूरकडून दुचाकीवरून येणाऱ्या शैलेश शालिक मेश्राम (२३, रा. जांभूळखेडा, ता. कुरखेडा) यास दुचाकीने हुलकावणी दिली. दुचाकी घसरून तो कोसळला. रुग्णालयात नेताना वाटेत त्याचा मृत्यू झाला.
बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
अहेरी : आलापल्लीवरून पेरमिलीकडे जाणाऱ्या दुचाकीला एस.टी. बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याची ओळख अद्याप पटली नाही. त्याच वाचविताना बस रस्त्याच्या खाली उतरली. वाहकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना १४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडाजवळ घडली. अहेरी आगाराची बस (एमएच ४० एक्यू ६०९४) सकाळी ७:४५ वाजता अहेरी आगारातून लाहेरीमार्गे सुटली. त्याच वेळी दुचाकी (एम.एच. ३३ पी. ८६८२) आलापल्लीवरून पेरमिलीमार्गे जात होता.
गडचिरोली : निवडणुकीच्या आचासंहितेमुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती पुलांवर पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत, तसेच गडचिरोली ठाण्याच्या पोलिसांनी दारू वाहतूक व विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने शहरासह, खुलेआम दारू विक्री करणाऱ्या गावांमध्ये दारूची टंचाई निर्माण झाली आहे. ज्यांच्याकडे दारू आहे ती दुप्पट दराने विकली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमधून दारूची वाहतूक होते. अहेरी, सिरोंचा तालुक्यात तेलंगणा राज्यातून दारू आणली जाते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीमावर्ती भागात असलेल्या पुलांवर पोलिस चौक्या उभारल्या आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनाने दारू आणणे कठीणझाले आहे. काही दारू तस्कर वैनगंगा नदीद्वारे दारू आणत आहेत. मात्र, हे काम प्रत्येकालाच शक्य होत नाही. कारण वैनगंगा नदीतून नावेशिवाय प्रवास शक्य नाही. गडचिरोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार रेवचंद सिंगणजुडेयांच्या मार्गदर्शनात दारू तस्करांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. लाखोंचा माल पकडला जात असल्याने दारूचा पुरवठा करणारे हैराण झाले आहेत. त्यामुळे काही दिवस दारूची वाहतूकबंद ठेवण्याचा निर्णय अनेकांनी घेतला असल्याने दारूचा पुरवठा कमी झाला आहे. गडचिरोली तालुक्यातील मोहारी, पोर्ला, मेंढा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात होती.
गडचिरोली शहराच्या प्रत्येकवॉर्डात दारू विक्रेते आहेत. त्यांच्याकडे आता दारूचा पुरवठा कमी होत आहे. काही दारूचे वाहतूकदार पोलिसांची नजर चुकवून दारू आणत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दारू मिळत आहे. मात्र, पुरवठा कमी झाला आहे.
७ लाखांची दारू जप्त
आचारसंहिता लागल्यापासून गडचिरोली पोलिस स्टेशनच्या पथकाने कारवाया करून जवळपास सात लाख रूपये किमतीची दारू जप्त केली आहे. तसेच ट्रॅक्टर, स्कार्पिओ यासारखी वाहने ताब्यात घेतली आहेत.
नदी मार्गातून वाहतूक
पुलांवर चौक्या बसल्याने आता नदीमार्गे दारूची वाहतूक केली जात आहे, तसेच भंडारा व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर नदी नाही. याचा फायदा घेत देसाईगंज तालुक्याच्या ग्रामीण भागातून वाहतूक करून दारू थेट इतर तालुक्यांमध्ये पोहोचवली जात आहे.
आष्टी (गडचिरोली) : कोंबडी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकास जिवंत जाळल्याची घटना आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या येनापूर जंगल परीसरात काल ६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. मनोज आनंदराव मेकर्तीवार (३२) रा. सोमनपल्ली ता. चामोर्शी असे मृतकाचे नाव आहे. तर सचिन राजेश मेकर्तीवार रा. सोमनपल्ली, राहुल गुंजेकर रा. चिंचाळा ता. जि. चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून मृतक मनोज मेकर्तीवार याच्या घरी जाऊन आम्हाला कोंबडा दे नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. या धमकीस घाबरून मनोज हा सांदवाडीत जाऊन लपला. त्यानंतर आरोपींनी मनोज याला पकडून शंकर पप्पुलवार यांच्या घरी नेले व त्यांच्या घरी लोकांसमोर हाता बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही. तर त्याला मोटरसायकलवर बसून
सोमनपल्ली ते येनापूर कडे जाणाऱ्या रस्त्याकडे घेऊन गेले. यानंतर येणापूर नाला जंगल परिसरात नेऊन जीवानिशी ठार मारून मृतकाच्या अंगावर काड्य टाकून जाळून टाकले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. य संदर्भात संगिता येलगलवाच रा. सावली हल्ली मु. सोमनपर्ल यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेच् गांभीर्य लक्षात घेता आष्ट पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
पालकांमध्ये खळबळ; जिल्हानजीकच्या नवेगाव येथे प्रयत्न फसला
गडचिरोली, ब्युरो. सद्यः स्थितीत दिवाळीचा उत्सव सुरू असून सर्वसामान्य नागरिक दीपोत्सवात मग्न आहेत. यात बालगोपालांचाही समावेश आहे. पालक वर्ग दीपोत्सवात व्यस्त असताना बच्चेकंपनी मौजमस्तीत दंग आहेत. अशातच जिल्हास्थळ असलेल्या गडचिरोली परिसरात मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 2) दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. जिल्हास्थळपासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या नवेगाव येथे अज्ञात इसमाने 12 वर्षीय बालकास बळजबरीने पळवून नेण्याचा प्रयत्न बालकाच्या धाडसामुळे फसला. मात्र, या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लक्ष्मीपूजनानंतर शनिवारी शहरासह ग्रामीण भागात (बलीप्रतिपदा) गायगोधनचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान जिल्हास्थळापासून चंद्रपूर मार्गावर 5 किमी अंतरावर असलेल्या नवेगाव येथे तोंडावर रुमाल बांधलेल्या एका अज्ञात इसमाने घरातील अंगणात खेळत असलेल्या 12 वर्षीय बालकास चॉकलेटचे आमिष दाखविले.
बालक घराबाहेर येताच तोंड तसेच हात दाबून त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घरापासून काही अंतरावर जाताच बालकाने इज्ञात इसमाच्या हाताला चावा घेत स्वतःची सुटका करून घेत घराकडे धाव घेतली. आपल्यावर घडलेली आपबिती बालकाने कुटुंबीयांना देताच एकच खळबळ निर्माण झाली. गांभीर्य लक्षात घेता पालकाने याची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. सद्यःस्थितीत दिवाळी सणानिमित्त प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहेत. काही अज्ञात व्यक्ती (मुले पळविणारी टोळी) फायदा घेत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. समयसूचकतेमुळे बालकाला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला गेला असला तरी या घटनेमुळे जिल्हास्थळ परिसरात मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने घेत या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
अज्ञाताने घेतली होती विशेष खबरदारी: मुले पळविणाऱ्या टोळीतील अज्ञात इसमाने बालकास पळवितांना विशेषखबरदारी घेतल्याचे एकंदरीत घटनास्थळावरून स्पष्ट होत आहे. अज्ञात इसमाने नवेगाव येथील संबंधित बालकाच्या घरासमोरील गेटवर येऊन बालकास चॉकलेटचे आमिष दाखवून घराबाहेर बोलाविले. त्यानंतर त्याचे तोंड व हात दाबून घेत त्याला पळवून नेले. यादरम्यान त्याने तोंडाला रुमाल, डोक्यावर टोपी घातली असल्याचे बालकाने सांगितले.
सीसीटीव्हीमध्ये आढळून आला इसम संबंधित बालकाच्या पालकाने घरासमोरील चंद्रपूर मार्गस्थित काही दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता काळा पेंट, हिरवा शर्ट, डोक्यावर टोपी घातलेला तसेच तोंडाला रुमाल बांधलेला स्थितीत असलेला अज्ञात इसम येताना दिसून आले. मात्र फुटेजमध्ये चेहरा स्पष्ट होत नसल्याने इसमाची ओळख पटविणे शक्य होऊ शकले नाही. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरुन चंद्रपूर मार्गावर एक चारचाकी उभी असल्याचे तसेच इसम संबंधितांना इशारा करीत असल्याचेही निर्देशनास आले. यावरुन यात आणखी काही आरोपी असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाचीअसंवेदनशीलता
बालकास पळविण्याचा प्रयत्न फसल्यानंतर संबंधित पालकाने यासंदर्भात तक्रार देण्यासाठी गडचिरोली पोलिस ठाणे गाठले असता ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल न करता उलट पालकास संबंधित घटनेचे फुटेज भागविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनाने घटनास्थळ गाठून विशेष चौकशी करणे गरजेचे होते. मात्र, याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाने दाखविलेली असंवेदनशीलता पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवरप्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
अज्ञाताने चाकू दाखवून मारण्याची दिली धमकी
संबंधित 12 वर्षीय बालकाने सांगितलेलेल्या आपबितीनुसार तोंडाला रुमाल बांधून असलेल्या अज्ञात इसमाने बालकास चॉकलेट आमिष दाखवून घराबाहेर काढले. बालक घराबाहेर येताच हाताने तोंड दाबून तसेच हात बांधून त्याला नेले. दरम्यान घरापासून काही अंतरावर जाताच बालकाने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता इसमाने चाकूचा धाक दाखवित तुझ्यासह तुझ्या आईवडिलांनाही मारून टाकण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.
अहेरी: पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई ज्ञानेश्वर केंद्रे जिल्हा नांदेड यांनी काल रात्र अंदाजे 10.00 च्या दरम्यान राखीव पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे एसडीएम बंगलाअहेरी येथे आत्महत्या केल्याची माहिती मिळालेली आहे.
त्यामुळे पोलीस विभागात एकच खडबड उडालेले आहेत. ज्ञानेश्वर केंद्रे यांनी या अगोदर c-60 मध्ये सुद्धा नोकरी केलेली आहे . त्यांची पोस्टिंग पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे होती. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे केंद्रे परिवारावर शोसकळा पसरलेली आहे. तरी या आत्महत्येसाठी जबाबदार कोण आहे ? याचा तपास करून त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केंद्रे परिवाराने पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे केली आहे
दारुविक्रेत्यांची धरपकड; तिघे पोलिसांच्या ताब्यात धाडसत्रात दारूसह 2.35 लाखांचा ऐवज जप्त
गडचिरोली, ब्यूरो. शहर पोलिसांनी दारुविक्रेत्यांविरोधात धाडसत्र अवलंबविले आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी राबविलेल्या धाडसत्रादरम्यान दारुविक्रेत्यांची धरपकड सुरु आहे. याअंतर्गत शुक्रवारी, (दि.2) राबविलेल्या धाडसत्रात एक दुचाकीसह 2 लाख 35 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात तीन दारुविक्रेत्यांना अटक करण्यात आली असून दारुविक्रेते पित्रा-पुत्र पसार झाले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये सौरभ सेन (रा. गडचिरोली, वासुदेव मेश्राम (रा. दिभना) व संगीता खोब्रागडे (रा. मोहझरी) यांचा समावेश आहे. तर तालुक्यातील काटली येथील लालाजी बारसागडे व नरेश बारसागडे पिता-पुत्र फरारी आहेत. शहर पोलिसांच्या डीबी पथकाने ठाण्याअंतर्गत येत असलेल्या काटली चक गावातील लालाजी बारसागडे यांच्या घरी धाड टाकून 1
लाख 54 हजार रूपये किंमतीची देशी दारु जप्त केली. मात्र पोलिसांची भनक लागल्याने पिता-पुत्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
दुसरी कारवाई पोटेगाव मार्गावर करण्यात आली. यात सौरभ सेन यास दारु विक्री करतांना रंगेहाथ पकडून त्याच्याकडून दुचाकीसह 7 हजार रूपये किंमतीची दारु असा एकूण 62 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला. दिभना येथील वासुदेव मेश्राम यांच्या घरी धाड टाकून 16 हजाराची देशी-विदेशी दारु तर मोहझरी येथील संगीता खोब्रागडे घरुन 3 हजार 70 रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात धनंजय चौधरी, अविनाश लंजे, तुषार खोब्रागडे, वृषाली चव्हाण यांनी पार पाडली. मागील काही दिवसांपासून गडचिरोली पोलिसांनी दारु विक्रेत्यांवर धाडसत्र आरंभिले असल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
प्रचंड पावसातही 99 टक्के उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा
महिला उमेदवारांची 100 टक्के उपस्थिती.
पुरपरिस्थितीमुळे संपर्काबाहेर असलेल्या भागातील 26 उमेदवारांना जिल्हा प्रशासन व एसडीआरएफच्या मदतीने बोटीद्वारे बाहेर काढुन त्यांना परिक्षा केंद्रावर पोहचविण्यात आले.
एकुण 6711 उमेदवारांमधून 6657 उमेदवारांनी दिली लेखी परिक्षा.
गडचिरोली/(28): गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 प्रत्यक्ष भरती 2024 च्या 912 जागांसाठी आज दिनांक 28/07/2024 रोजी गडचिरोली पोलीस दलातर्फे लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व अत्यंत पारदर्शक पध्दतीने गडचिरोली पोलीस दलामार्फत पार पाडण्यात आली.
गडचिरोली पोलीस दलातर्फे 912 पोलीस शिपाई पदांसाठीची मैदानी चाचणी ही दिनांक 21/06/2024 ते 13/07/2024 रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती. सदर मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांसाठी लेखी परीक्षा ही आज दिनांक 28/07/2024 रोजीचे सकाळी 08.00 वा. आयोजीत करण्यात आलेली होती. यामध्ये पहिला पेपर सामान्य अध्ययन या विषयाचा सकाळी 10.30 ते 12.00 या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी 13.30 ते 15.00 वा. दरम्यान घेण्यात आला. सदरची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील 1) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली, 2) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड गडचिरोली (महिला महाविद्यालय जवळ), 3) प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, आरमोरी रोड गडचिरोली, 4) आदिवासी इंग्लीश मिडीयम स्कुल, सेमाना रोड गडचिरोली, 5) कारमेल हायस्कुल, धानोरा रोड गडचिरोली, 6) स्कुल ऑॅफ स्कॉलर, धानोरा रोड गडचिरोली, 7) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली, 8) शिवाजी इंग्लीश अॅकॅडमी स्कुल, गोकुलनगर गडचिरोली, 9) शासकिय कृषी महाविदयालय, आयटिआय चौक गडचिरोली, 10) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली, 11) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली, अशा एकुण 11 केंद्रावर घेण्यात आली. सर्व 11 परिक्षा केंद्राच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. बंदोबस्ताकरीता 800 चे आसपास पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणुक करण्यात आली होती. सदर लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांपैकी 6657 पुरुष व महिला उमेदवारांनी लेखी परिक्षा दिली. सदर लेखी परिक्षेपासुन कोणतेही पात्र उमेदवार वंचित राहु नये म्हणुन वेळोवेळी सोशल मिडीया मार्फत गडचिरोली पोलीस दलाकडुन सुचना देण्यात आल्या होत्या. यासोबतच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्राभरात पुरपरिस्थिती निर्माण झालेली असतांना सुद्धा पुरपरिस्थितीमुळे संपर्काबाहेर असलेल्या भागातील 26 उमेदवारांना जिल्हा प्रशासन व एसडीआरएफच्या मदतीने बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले व त्यांना परिक्षा केंद्रांवर पोहचविण्यात आले. त्यामुळे लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांपैकी 100 टक्के महिलांसह 99 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता आपली हजेरी लावली. यासोबतच सर्व उमेदवारांना बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणीचे पुन:परिक्षण करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आले. तसेच पेपर क्र.01 व पेपर क्र.02 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची व पाण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली होती.
सदर लेखी परीक्षा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश, यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
नवरगावच्या जंगलातील घटना : वनविभागाची कारवाई; पाच दिवसांची कोठडी
गडचिरोली : जंगलात नीलगायीची शिकार करून तिच्या मांसाची गावात विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून १० आरोपींना जेरबंद केले. दोन आरोपी फरार आहेत. सदर घटना शनिवारी नवरगाव येथे घडली. आरोपींकडून नीलगायीचे शिर, पाय, मांस व इतर अवयव तसेच कापण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सदर घटनेने वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
पोर्ला वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नवरगाव (दक्षिण) नियत क्षेत्रामध्ये दि. १३ जुलै रोजी निलगायीची शिकार करण्यात आली. शिकारीनंतर निलगायीच्या मांसाची गावात विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून दहा आरोपींना अटक केली. त्यांना रविवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहाही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी,चुरचुराचे क्षेत्र सहायक के. बी. उसेंडी, पोर्लाचे क्षेत्र सहायक अरुण गेडाम, मरेगावचे क्षेत्र सहायक समर्थ, पोर्लाचे वनरक्षक विकास शिवणकर, दिभनाचे वनरक्षक गणेश काबेवार, किटाळीचे वनरक्षक संदीप लामकासे, देलोडाचे
वनरक्षक नितीन भोयर, वाहनचालक देवीदास चापले, वनमजूर विजय म्हशाखेत्री, गिरिधर बांबोळे, छत्रपती डहाले, दुर्योधन मेश्राम, सोनू खोब्रागडे, रवि डहाले, रूपेश मुनघाटे यांच्या पथकाने केली.
हे आहेत अटक झालेले आरोपी
खुदकम रघुनाथ गेडाम वय (२५, रा. कुहाडी), अक्षय प्रभाकर सेलोटे (२२, रा. नवरगाव), रोशन दामोधर भोयर (२२, रा. नवरगाव), निखिल गिरिधर ठाकरे (३०, रा. चुरचुरा), सौरभ सुरेश आवारी (२०, रा. नवरगाव), विक्रांत प्रकाश बोरकुटे (२३, रा. गोगाव), संकल्प संजय उंदीरवाडे (२४, रा. नवरगाव), संदीप कानिफ चुधरी (रा. नवरगाव), आकाश प्रभाकर सेलोटे (रा. नवरगाव), जगदीश देवराव थोराक (रा. नवरगाव) यांना अटक करण्यात आली आहे. समीर रवींद्र मडावी (रा. कुहाडी) व ओमराज विजय राजगडे (रा. चुरचुरा) हे दोन आरोपी फरार आहेत.
गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका ईसमाची हत्या केल्याची घटना आज शुक्रवार २९ मार्च रोजी अहेरी तालुक्यातील ताडगाव-दामरंचा रस्त्यावर पहाटेच्या सुमारास उघडकीस
आली. अशोक तलांडे असे मृतकाचे नाव आहे. ताडगावपासून पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर अशोक तलांडेचा मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकले असून, अशोक तलांडे पोलिसांचा खबऱ्या असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे
त्यात म्हटले आहे. अशोक तलांडे हा मागील काही दिवसांपासून ताडगाव येथे वास्तव्य करीत होता. मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र, नक्षल्यांनी आज त्याची हत्या केली. लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना ही हत्या झाल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी मृतक ईसम पोलीस खबऱ्या नसल्याचे सांगितले.
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली करावी, अशी मागणी काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी ३ मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.
दुर्गम भागातील वेंगपूर, सुरगाव, अळंगेपल्ली तसेच पडकाटोला या चार गावांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना कडक शब्दात फटकारले आहे. पेसा कायद्याची अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, कथित धान घोटाळ्यात दोषींना पाठिशी घातल्याचे प्रकरण, उद्योगांच्या नावाखाली जमीन संपादन करताना दडपशाही यामुळे जिल्हाधिकारी मीणा हे वादात सापडले असल्याचा दावा करत शेडमाके यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. विशिष्ट लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील म्हणून ते ओळखले जातात, त्यामुळे लोकसभा निवडणुका पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी त्यांची बदली गरजेची असल्याचे शेडमाके यांनी तक्रारीत म्हटले आहे.
प्रकरणे प्रलंबित
अतिक्रमणासह इतर प्रकरणे प्रलंबित असून जिल्हा प्रशासन वेळकाढू भूमिका घेत आहे. याचा देखील तक्रारीत उल्लेख आहे.