पेट्रोल पंपावरील स्वच्छालय सामान्य लोकांच्या वापरासाठी आता खुले करण्यात आली आहे. याचा वापर करू न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतची मनपाच्या आरोग्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी रिलायन्स पेट्रोल पंप शहरातील सर्व चालकांना बजावणी दिली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नागरिक कार्य मंत्रालयाने तसे आदेश मानपा सर्व पालिकांना काढले आहे. देशभरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व पेट्रोल पंपावरील स्वच्छालय हे सर्वसामान्य जनतेसाठी खुले राहणार आणि यामध्ये अडथळा आणल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे केंद्रीय गृहनिर्माण व नागरिक कायदा मंत्रालय यांचे कडून आले आहे. ही अधिसूचना सर्व पेट्रोल पंप धारक मालकांना देण्यात आली आहे.
आयुध निर्माणी भंडारा( दारू गोळा निर्मिती कारखाना) येथील टी २३ ( एल टीपी) बिल्डिंग येथे आज दिनांक २४.जानेवारी वेळ सकाळीं १०.३५ वाजता स्फोट झाला.या स्फोटात ५ ते ६ कर्माच्यांचे होरपळून मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
या बिल्डिंग मध्ये सकाळ पाळीत एकूण ८ व्यक्ती होते. त्यातील २ गंभीर जखमींना आयुधं निर्माणी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आले. उर्वरित ६ व्यक्ती घटना स्थळी बिल्डिंग स्फोटात मृत्यू मुखी झाल्याचे अंदाज आहे
गडचिरोली जिल्ह्याच्या ठीकानापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचायत समिती अंतर्गत मौजा काटली ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक शरद राजेश्वर येल्टीवार यांची प्रशासकीय कारकीर्द अत्यंत बेजबाबदार असून ते आपल्या पदाच्या कार्यात हयगय करत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे वा त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी तक्रार दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष अनुप मेश्राम व बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी आपापल्या तक्रारीतून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.
ग्रामसेवक शरद राजेश्वर येल्टीवार नेहमीच आपल्या कार्यालयात गैरहजर असतात तसेच त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता उडवाउडवीची उत्तरे ते देत असतात. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला ते नेहमीच गैरहजर असतात. मासिक सभेला सुद्धा उपस्थित राहत नसल्याचे तक्रारीत त्यांनी नमूद केली आहे.
अनेकदा कार्यालयीन वेळेत ते नशेत असल्याचे सुद्धा तक्रारीत नमूद केले आहे. त्याच प्रमाणे त्यांच्या कार्यकत्यांनी काही महत्वाची माहिती मागितली असता त्यांनी माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन सुद्धा केले असे ही निवेदनात म्हटलं आहे. ग्रामसेवकांच्या अशा वागण्यामुळे लोकांना त्रास होत असल्याने काटली वासिय नागरिकांची पण मागणी आहे. यावर शासन कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे.
गडचिरोली :- आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत 1 फेब्रुवारीपासून बदल होणार असून, शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळेत आयोजित आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे सहआयुक्त दिगांबर चव्हाण, सरपंच पूनम किरंगे, तसेच प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), नमन गोयल (भामरागड), कुशल जैन (अहेरी) व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र गरिबांच्या कल्याण आणि विकासासाठी वाटचाल करीत आहे, त्यांचेसोबत राज्याचा आदिवासी विकास विभाग देखील भरारी घेईल, याबाबत मी आपणास आश्वस्त करतो असे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व आश्रम शाळा तसेच वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. उईके यांनी 7 फेब्रुवारी रोजी विविध शाळांमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम होईल, असे जाहीर करताना प्रकल्प अधिकाऱ्यांना स्वायत्त निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, असे सांगितले. "एकही आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी अधिकाधिक शाळा व वसतिगृहे उभारण्यात येतील," असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी व पालकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आर्थिक मदतीमुळे व्यवसाय सुरू करूंन रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आदिवासी विकास विभागाचे आभार व्यक्त केले. तसेच घरकुलाची रक्कम वाढविण्याचीही मागणी केली.
यावेळी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या वित्तीय सहाय्याचे व जात प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी राहुल मीना यांनी केले.
मेळाव्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
आमदार विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लब च्या वतीने GPL क्रिकेट स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्यास गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती होती .
या उदघाट्न सोहळ्यास राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुदिन, प्रसिद्ध मराठी सिनेतारका श्रुती मराठे, आमदार सुधाकरजी अडबाले, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिलाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, प्रा. समशेरखान पठाण, रवी वासेकर, ऍड. राम मेश्राम, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले सह इतर मान्यवर, पदाधिकारी व विविध ठिकाणाहुन आलेले खेळडू यावेळी उपस्थित होते.
गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील वनविभागाशी संबंधित विविध समस्यांना घेऊन गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा केली यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार, गडचिरोली जिल्ह्यातील वनविभागाचे सर्व उपवनसंरक्षक, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, जावेद शेख, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वन्यप्राण्याच्या हल्यावर प्रभावी उपययोजना करणे, वन्यप्रान्याच्या हल्यातील मृत, जखमी किंवा नुकसान ग्रस्ताना तातडीने आर्थिक सहाय्यक देने, वनविभागाच्या परवानगी करीता प्रलंबित असलेली विकास कामे, रस्ते यांना परवानगी देणे, आवश्यक त्या ठिकाणी बिट, बांबू उपलब्ध करून देने या सारख्या विविध विषयावर चर्चा सविस्तर चर्चा या बैठकित करण्यात आली.
गडचिरोली :: आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे आदर्श फाउंडेशन च्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
मोबाईल सोशल मीडिया च्या काळात तरुण पिढीचा वेळ चुकीच्या गोष्टीसाठी खर्ची होत असून तरुणांना सोशल मीडिया चे वेळ लागले आहे, तरुनांचा वेळ सत्कामी खर्ची करण्याकरीता त्यांच्यामध्ये वाचणाची गोडी निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी गाव तिथे वाचनालय संल्पना रुजवून गावागावात अभ्यासिका निर्माण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी यावेळी केले.
तर महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी अभ्यासिकेच्या माध्यमातून चांगले अधिकारी घडून फक्त आपल्या गावाचाच नाही तर जिल्ह्याचाही नाव लौकिक करणारे अधिकारी घडावे अशी इच्छा व्यक्त केली.
या उदघाट्न सोहळ्यास तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, सरपंच देलनवाडी प्रियंकाताई कुमरे, माजी सरपंच रामनंदन गेडाम, उपसरपंच देलनवाडी त्रिलोकजी गावतुरे,विजयजी ठवरे, प्रदीपजी बोळणे, उपसरपंच उराडी राधेश्याम दडमल, रत्नाकर धाईत, व्ही.डी. बावणकर, दिगेश्वर धाईत, जांभळे साहेब सह इतर मान्यवर गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
भामरागड,दिं. २० जानेवारी २०२५:
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल अविकसित भामरागड भागात भारतीय जनता पक्षाच्या "घर चलो" विशेष सदस्यता नोंदणी मोहिमेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या अभियानाची जोरदार सुरुवात झाली.
अभियानाचा हेतू आणि आवाहन म्हणजे "समर्थ भारत आणि विकसित भारतासाठी भाजपाचा भाग बना," असे आवाहन अशोकजी नेते यांनी नागरिकांना केले. या मोहिमेच्या माध्यमातून स्थानिक जनतेपर्यंत पक्षाची उद्दिष्टे आणि विकासाची दृष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदस्य नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाइन नोंदणीसाठी: ८८००००२०२४ या क्रमांकावर मिस कॉलद्वारे नोंदणी होत असुन ऑफलाइन नोंदणी: भामरागड हा अतिदुर्गम भाग असल्याने या भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने विशेष फॉर्मद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली गेली जात आहे.
या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा व तालुका स्तरावरील विविध पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी, सहकार आघाडी, नगरसेवक आणि शक्ती केंद्र प्रमुख यांची उत्साही उपस्थिती होती.
या अभियानाला जेष्ठ नेते व ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल बिशवास, भामरागड न.पं.च्या नगराध्यक्षा रामबाई कोमटी महाका, तालुकाध्यक्ष अर्जुन अलाम, महामंत्री तपेश हलदार, ता.उपाध्यक्ष जाधव हलदार,नगरसेवक सरजू सेडमेक,माजी नगरसेविका रंजु सेडमेक,पोर्णिमा मडावी,लाहेरी शक्ती केंद्र प्रमुख दिनेश घोसरे, ता.उपाध्यक्ष राजेंद्र मडावी, ताडगांवचे जेष्ठ नेते राजुभाऊ तिर्थगीरवार, कमलेश अधिकारी तसेच भामरागडतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भामरागडच्या नागरिकांनी मोहिमेला दिलेला प्रतिसाद हा भाजपाच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचा परिणाम मानला जात आहे. या मोहिमेमुळे पक्षाची ताकद स्थानिक स्तरावर वाढत असून जनतेशी थेट संवाद साधण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे.
अशा अभियानांच्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विकासाची नवीन पहाट उगवेल, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथील प्रसिद्ध आरती मासिकातर्फे दरवर्षी कथा व कविता स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदा आयोजित करण्यात आलेल्या "ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर, पुणे पुरस्कृत उत्कृष्ट कवितास्पर्धा -२०२४" मध्ये झाडीपट्टीतील साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या "पेरते व्हा" या कवितेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे "आरती" मासिकाचे संपादक प्रणव भागवत व भारत गावडे यांनी कळविले आहे.
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,प्रमाणपत्र व दिवाळी अंक भेट अशी असून वरील कविता आरती दिवाळी अंक- २०२४ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी याच संस्थेच्या कथा व कविता लेखन स्पर्धेत चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'श्रृंखला' या कथेस द्वितीय क्रमांकाचे व 'रानगर्भ फुलत आहे ' या कवितेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाले.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ.राजकुमार मुसणे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रा. पराग लोणकर (प्रकाशक) , डॉ. एस. एन.पठाण, डॉ. परशुराम खुणे, नरेश बावणे, उपसंपादक देशोन्नती, व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.
गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदासाठी ईच्छा बोलून दाखविल्यानंतर गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होईल हे स्पष्ट झाले होते.. मुख्यमंत्री एखाद्या जिह्याचे पालकमंत्री घेणे हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहे. जिल्ह्यात, आरोग्य, रस्ते, सार्वजानिक वाहतूक व्यवस्था, यासारखे मूलभूत सुविधांचे प्रश्न आवासून उभे असून गेल्या अडीच वर्षाच्या त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही.. किमान पुढील पाच वर्ष तरी ते याकडे लक्ष देतील या अपेक्षेने गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक नजरा लावून बसले आहे. गडचिरोली सारख्या बहुल आदिवासी भागात आता मुख्यमंत्र्यांनी पालक मंत्री हे पद भूषवल्यामुळे आता तरी गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्याचे विकास होईल याच नजरेत सर्व नागरिक बघून राहिले आहे.
दिं.१७ जानेवारी २०२५
व्याहाड बुज येथील भूपेंद्र ऊर्फ दादू गोविंदा मांदाडे यांचा काही दिवसांपूर्वी मोटार सायकल ने हरणघाट मार्गावर दुर्दैवी अपघात झाला होता. त्यांच्या प्रकृतीच्या गंभीरतेमुळे त्यांना तातडीने नागपूर येथील चिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच व्याहाड बुज ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गेडाम यांनी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्याशी संपर्क साधला.
नेते साहेबांनी तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चिरायु हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी भूपेंद्र यांच्या प्रकृतीची डॉक्टर शशांक वरखडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच डॉक्टरांना आवश्यक ती सर्व काळजी घेण्याच्या सूचना केल्या. त्यांनी डॉक्टरांना सांगितले की, “हा पेशंट माझ्या क्षेत्रातील असून, त्याच्या उपचारात कुठलीही कसूर होऊ देऊ नका.”
यानंतर मा.खा. नेते साहेबांनी भूपेंद्र यांच्या कुटुंबियांशी भेट घेतली. त्यांनी त्यांच्या आई व निशिगंधा मांदाडे यांना धीर देत सांगितले, “तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे.” त्यांच्या शब्दांनी कुटुंबीयांच्या मनाला मोठा आधार मिळाला. तसेच नेते साहेबांनी आपल्या माणुसकीच्या भावनेतून आर्थिक मदतही प्रदान केली.
व्याहाड बुज या गावावर नेते साहेबांचे विशेष प्रेम आहे. या प्रसंगी त्यांनी एक आदर्श नेता कसा असतो, याचा उत्कृष्ट नमुना सादर केला. माणुसकीचा हा हात आणि त्यांनी दाखवलेली तत्परता संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
दिं. ०९ जानेवारी २०२५
सावली:- मौजा-अंतरगाव (तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर) येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यस्मरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचा मुख्य आकर्षण होता भव्य खंजेरी भजन स्पर्धा, ज्यामध्ये ३१ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
मा.खा.नेते यांनी आपल्या विचारात सांगताना *धर्म, संस्कार, आणि राष्ट्रनिर्मितीचे संदेश* या शब्दाचा उल्लेख केला.
या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी प्रमुख उपस्थिती लावली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले, “धार्मिक व आध्यात्मिक उपक्रम केवळ संस्कारच नव्हे, तर देश व समाजाच्या उभारणीसाठीही महत्त्वाचे आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित असे उपक्रम आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहेत.”
अंतरगावावरील आपले प्रेम व्यक्त करताना त्यांनी या गावासाठी सभामंडप बांधून दिल्याचे नमूद केले. गावकऱ्यांनी पुढे आणलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देत, कार्यक्रमात सहभागी होणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. “गुरुदेवांचे दर्शन व या पवित्र कार्यात सहभागी होण्याचा योग लाभणे, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे,” असेही ते म्हणाले.
पुढे बोलतांना मा.खा.नेते म्हणाले
या कार्यक्रमाने सामाजिक एकात्मता व संस्कारमूल्ये जपण्याचे कार्य केले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून यशस्वी झाला.असे मि समजतो असे प्रतिपादन या प्रसंगी अशोकजी नेते यांनी केले.
या खंजेरी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय गुरुदेव सेवा मंडळाला जाते. या स्पर्धेचे संचालन जितेंद्र मस्के यांनी करताना सांगितले की, “गेल्या पाच वर्षांपासून ही खंजेरी भजन स्पर्धा अंतरगावात सातत्याने होत आहे. दरवर्षी अशोकजी नेते साहेबांची उपस्थिती व सहकार्यानेच या कार्यक्रमाला गती मिळत असते.नेते साहेब हे माजी खासदार असले तरी आमच्यासाठी ते आजही खासदारच असल्यासारखेच वाटतेय..”
स्पर्धेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने गुरुदेवांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केले आहे.
या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीकांतजी भुगुवार, भाजपा तालुका अध्यक्षा व गुरुदेव मंडळाच्या सचिव छायाताई चकबंडलवार, नियोजन समिती सदस्य जितेंद्र मस्के, चंद्रशेखर काचीनवार, लीलाधर नागोसे, गणेश शेट्टीवार, राहुल बोरकुटे यांच्यासह गावातील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनांक 9/01/2025
ताज मलबार रिसॉर्ट कोचीन (केरळ) येथे ऊर्जा संबंधी संसदीय स्थायी समितीची बैठक पार पाडली. सदर बैठकीत भारत पेट्रोलियम, गेल, इंडियन ऑइल, एन एच पी सी, एन टी पी सी, एस जे व्ही एन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपण्यांचा आढावा घेण्यात आला. एन एच पी सी ही कंपनी हायड्रो पॉवरशी संबंधित असल्याने गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रात अनेक नद्या असून पाण्याची मुबलकता आहे पण वाहत्या पाण्याचा कोणताही उपयोग या क्षेत्रात होत नाही. करिता या लोकसभा क्षेत्रात हायड्रो पॉवर प्रोजेक्ट निर्माण करण्याची शिफारस कमिटी सदस्य खासदार डॉ. किरसान यांनी केली आहे.
आज वंजारी समाज जिल्हा गडचिरोलीचे वतीने वंजारी समाजाचे विरोधात बदनामीकारक विधान करणाऱ्या मनोज जरंगे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावीत या मागणी साठी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक येथे मोर्चा काढून निषेध दर्शवण्यात आले. तसेच आज मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले यामध्ये वंजारी समाजाचे बहुसंख्या स्त्री-पुरुष सामील झाले होते . त्यानंतर वंजारी समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी गडचिरोली, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन वंजारी समाजा बद्दल जो बदनामीकारक शब्दप्रयोग करण्यात आले त्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी वंजारी समाजाचे कार्यकर्ते म्हणून चंद्रशेखर भडांगे यांनी केले आहे.
NDTV आणि बस्तर जंक्शन पत्रकार म्हणून कार्यरत असलेले छत्तीसगडमधील मुकेश चंद्रकार यांच्या हत्याप्रकरणी आज दिनांक 9/01/2025 ला इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे मूक मोर्चा काढण्यात आला. या वेळीस मुकेश चंद्रकार यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहून गडचिरोली पत्रकार बंधूंनी मूक मोर्चा काढून जिल्हा कलेक्टर यांना निवेदन सादर केले. त्या निवेदनात मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
मुकेश चंद्रकांर यांच्या या घटनेमुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूं मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण की गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या टोकाच्या दिशेला असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी तसेच रेतीमाफीया यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे आणि या सर्व गोष्टींना पत्रकारांना सामोरे जावे लागते म्हणून कलेक्टर साहेबांना निवेदन देते वेळेस ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी कलेक्टर साहेबांना अवगत केले.
तसेच पत्रकार संघटनेतर्फे त्यांना निवेदन केले की पत्रकारांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी असे पत्रकार बंधू कडून बोलण्यात आले. या मूक मोर्चा साठी बहुसंख्य स्त्री-पुरुष पत्रकार उपस्थित होते.
दिनांक: ०७ जानेवारी २०२५
सावली तालुक्यातील आसोला (चक, मेंढा) आणि सावंगी दीक्षित या पुनर्वसित गावांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुल येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
अशोकजी नेते यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, "आपल्या गावांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुनर्वसन खात्याच्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. शासन दरबारी निवेदन सादर करून आणि अधिकारी वर्गासोबत बैठक घेऊन लवकरच यावर तोडगा काढला जाईल."
*चर्चेतील मुख्य मुद्दे:*
या बैठकीत पुनर्वसित गावांच्या शेती मोबदला, प्रकल्पग्रस्त दाखल्याचा पुरवठा, अनुदान आणि अन्य मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
*पुनर्वसित गावांच्या मुख्य मागण्या:*
१) २०१८-१९ मध्ये भूसंपादनानंतर शिल्लक शेती विक्रीसाठी परवानगी.
२) भूसंपादन झाल्यानंतर सामुग्रह अनुदान मंजूर करणे.
३) १८ वर्षांवरील कुटुंबांना मोबदला व अनुदान देणे.
४) विवाहित कुटुंबांसाठी वाढीव अनुदानाचा पुरवठा.
५) १८ वर्षांवरील मुलांना मोबदला व अनुदान देणे.
६) शासन निर्णयानुसार पाच लाख रुपये अनुदानासह प्रकल्पग्रस्त दाखल्याचा पुरवठा.
७) पुनर्वसन समितीच्या नियमित बैठका आयोजित करणे.
*उपस्थित मान्यवर:*
या बैठकीला उपविभागीय अधिकारी अजयजी चरडे, गोसीखुर्द प्रकल्पाचे अभियंता चिंतलवार, सिंचाई व पुनर्वसन विभागाचे अधिकारी तसेच भाजपा तालुका महामंत्री व नगरसेवक सतिश बोम्मावार, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंतजी ताडाम, पुनर्वसन समितीचे सदस्य इंदरशहा पेंदाम, मुखरु जुमनाके, होमराज वलादे, राकेश सुरपाम, श्रावण गेडाम, सोमेश्वर पेंदाम यांसह आसोला चक (मेंढा) व सावंगी दीक्षित गावातील ४०-५० नागरिक उपस्थित होते.
गडचिरोली -
झाडीपट्टीचा पुन्हा एकदा गौरव
संत चोखामेळा, संत दामाजी, संत कान्होपात्रा आदी १४ संत ज्या जन्मभूमीने दिले,व पंढरपूरच्या विठूरायांची ज्या नगरीवर कृपादृष्टी आहे, त्या मंगळवेढा गावातील शब्दकळा साहित्य संघाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट साहित्यस्पर्धा घेण्यात येते.व साहित्यिकांना त्यांच्या दर्जेदार साहित्यनिर्मीती साठी 'शब्दकळा उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने' पुरस्कृत करण्यात येते. व दहा विजेत्या साहित्यिकांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.शब्दकळा साहित्य संघाच्या स्पर्धेचे हे चोविसावे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी नाट्य वाड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'महापूजा' या महानाट्याची 'शब्दकळा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार - २०२४' साठी निवड करण्यात आली.
दि.०५ जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात झालेल्या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे (मा.पालकमंत्री सोलापूर) व मा.आम. समाधान (दादा) अवताडे (वि.प.सदस्य पंढरपूर मंगळवेढा), व मा. दत्तात्रय सावंत(वि. प. सदस्य, पुणे) यांचे हस्ते प्रा.शिवाजीराव काळूंगे (संचालक धनश्री परिवार), शिवानंद पाटील (चेअरमन, दामाजी शुगर), डॉ. शिवाजी शिंदे (सहा.कुलसचिव, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर), डॉ. सुरेश शिंदे (ज्येष्ठ कवी), टि.एस.चव्हाण, डॉ.महादेव देशमुख, प्रा.दिलीप जाधव, हरिष बंडीवढार, मनोहर मुधोळकर, श्रीमंत लष्करे, प्रा.डॉ. वामनराव जाधव,ॲड. नंदकुमार पवार इ. साहित्यिक, व प्रा.डॉ. शशिकांत जाधव (स्पर्धा प्रमुख तथा साहित्यिक) यांच्या उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यिकांना सन्मानित आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या 'महापूजा अर्थात महासती सावित्री' या नाटकाचे लेखनासाठी शब्दकळा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार -२०२४ या पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, विजेते साहित्यिक व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
'महापूजा' हे संपूर्ण झाडीपट्टीत गाजलेले महानाट्य असून या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग सादर झालेले आहेत .
-------------------------------------------
विशेष म्हणजे 'महापूजा' नाटकास यापूर्वी नागपूर येथील 'साहित्य विहार', व बोरगाव (जि. सांगली) येथील 'आधार प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले असून यंदाचा तिसऱ्यांदा मिळालेला हा वाड्.मय पुरस्कार आहे. यामुळे संपूर्ण झाडीपट्टीची मान उंचावली आहे.
----------------------------------------------
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा. यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ. योगीराज नगराळे, प्रा.डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, रमेश निखारे, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा. नवनीत देशमुख(साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर, व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
झाडीबोली साहित्य मंडळाची काव्यमैफल संपन्न.
गडचिरोली - दिनांक 4 जानेवारी रोजी नववर्षाच्या पर्वावर झाडीबोली साहित्य मंडळाची सभा प्रा. विनायक धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत झाडीबोली प्रातिनिधिक कवितासंग्रह काढण्याबद्दल चर्चा झाली. ह्या कवितासंग्रहाचे संपादक कवी डॉ. प्रवीण किलनाके असतील . हा झाडीबोली कवितांचा एकमेव काव्यसंग्रह असणार आहे. हयात वाचकाना विविध विषयावरच्या कविता वाचायला मिळतील असे सचिव संजीव बोरकर ह्यांनी सांगितले.
ह्या निमित्याने मंडळाच्या सभागृहात सायंकाळी ४ वाजता छोटेखांनी काव्यमैफल घेण्यात आली.ह्या मैफलीत
सल्लागार डॉ. चंद्रकांत लेनगुरे, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण किलनाके, वर्षा पडघन, संजीव बोरकर,उपेंद्र रोहनकर, जितेंद्र रायपुरे, कमलेश झाडे, गजानन गेडाम,खेमराज हस्ते,प्रेमीला अलोणे,मालती सेमले, रोशणी दाते, प्रतीक्षा कोडापे, ह्यांनी विविध विषयावर आपल्या झाडीबोलीत कविता सादर केल्या." घाटरु" ही प्रा. विनायक धानोरकर ह्यांची कविता विशेष दाद देऊन गेली. कार्यक्रमाचे संचलन वर्षा पडघन ह्यांनी केले.तर आभार गजानन गेडाम ह्यांनी मानले.
मेहा बुजरुक -:
ता सावली येथे इयत्ता ७ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहेत. ह्यात ७ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक यांची गरज आहे. पण मागील २ वर्षापासून फक्त ४ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे एकाच वेळेस दोन अलग वर्गाला शिकवल्या जात आहेत. त्यामुळे ह्यात गरीब आणि खेड्यातील विद्यार्थाचा खूप मोठा शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. आणि त्यांचा भविष्यात खूप मोठा फटका ह्या गोष्टीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याला बसेल. आणि पालक हे गरीब असल्यामुळे ते त्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवू शकत नाही त्यामुळे त्यांच्या पुन्हा नुकसान होईल. आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होणार नाही आणि त्यांचे भविष्य हे अंधारमय होईल.
त्यामुळे ह्या विरोधात एक महिन्याच्या आता मेहा बुजरुक येथे ३ शिक्षक तसेच सावली तालुक्यात जिथे जिथे शिक्षक कमी आहेत अश्या सर्व ठिकाणी शिक्षक द्यावेत. अन्यथा न दिल्यास मोठा आंदोलन संपूर्ण सावली तालुक्यातून छेडण्यात येईल.
ह्या विरोधात जितूभाऊ धात्रक, प्रकाशजी कोलते, नंदाजी पेंदाम, सरपंच रुपेशजी रामटेके, चिमणदासजी निकुरे,देवरावजी गेडाम, वामनजी कोरडे, किशोरजी गंडाटे,कांतेशजी बानबले, मदनजी निकुरे, सुभाषजी ढोलणे तसेच इतर महिला उपस्थित होत्या.
मा.खा.अशोकजी नेते यांच्याकडून गडचिरोलीचे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे स्वागत
दिनांक: ०३ जानेवारी २०२४
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या भेटीदरम्यान, अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली. गडचिरोलीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सखोल विचार विनिमय करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांचीही उपस्थिती होती. या भेटीने जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशानिर्देश निश्चित होण्याची अपेक्षा आहे.