कोरची : तालुका मुख्यालयापासून सहाकिलोमीटर अंतरावर येत असलेल्या सोहले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्य प्रवेशद्वार व सिमेंटचे पिलर कोसळून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. १३ रोजी ही घटना घडली.
पूर्वशी मदन उंदिरवाडे (वय ६, रा. सोहले) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास शाळेच्या वेळेत पूर्वशी शाळेच्या मुख्य द्वाराजवळ खेळत होती. तेव्हा अचानक तिच्या अंगावर शाळेचा लोखंडी प्रवेशद्वार व पिलर कोसळले.
यात तिचा डावा पाय तुटला व डोक्याला जबर मार लागल्यामुळे रक्तस्त्राव झाला. त्यानंतर कोरची ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार देऊन दुखापत गंभीर असल्यामुळे तिला रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
रुग्णवाहिकेला विलंब, विद्यार्थिनी ताटकळत
१०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे बराच वेळपर्यंत विद्यार्थिनीला ताटकळत राहावे लागले. १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तेव्हा ग्रामीण रुग्णालयातील १०२ रुग्णवाहिका होती; परंतु येथील वाहनचालक रवी बावणे हे उपस्थित नव्हते. तिच्यावर ब्रह्मपुरी येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
कोरची : तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. विशेष म्हणजे, अत्याचारग्रस्त अल्पवयीन पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतर सदर घटना उघडकीस आली आहे. यानंतर पीडितेनी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनंतर आरोपी फरार झाला आहे. विशेष म्हणजे, पंधरवड्यात कोरची तालुक्यातील ही दूसरी घटना असून तालुक्यातील एकाच गावातील दोन पीडित आहेत.
प्रवीण महेश मडावी (२०) रा. कोटरा, तालुका कोरची असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीशी ओळख करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडितेला गर्भधारणा झाली. तिला ग्रामीण रुग्णालय चिचगड भरती करण्यात आले. येथे तिने एका निरागस बाळाला जन्म दिला आहे असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. मुलगी गोंदियाजिल्ह्यातील चिचगड रुग्णालयात प्रसूत झाल्यामुळे चिचगड पोलिस ठाण्यात कलम ३७६ (१) सहकलम ४, ६ पोस्को अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सध्या पसार आहे. कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार हे पुढील तपास करीत आहेत.
गोंदिया येथे उपचार सुरू
अत्याचार झाला त्यावेळी मुलगी १७ वर्षांची होती. आता मात्र, १८ वर्ष पूर्ण झाले आहेत. अत्याचाराच्या वेळी वय कमी असल्याने पोलिसांनी पोक्सो दाखल केला आहे.
कोरची : तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील दोडके येथे पतीने घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ६ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. महिलेवर उपचार सुरू आहेत.
संतारोबाई कोरेटी (४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. आशू कोरेटी (५०, रा. दोडके) हा ६ रोजी सायंकाळी दारूच्या नशेत घरी आला. यावेळी घरगुती कारणावरून दोघांत शाब्दिक चकमक उडाली. यानंतर आशू
कोरेटी याने रागाच्या भरात कुन्हाडीने पत्नीवर हल्ला चढविला. यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जखमी संतारोबाई यांना त्यांच्या भावाने कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
कोरचीः तालुका मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम आंबेखारी जंगल परिसरात झाडूचे गवत तोडण्यासाठी गेलेल्या महिलेला अर्धवट पुरलेला मानवी सांगाडा आढळून आला. ही घटना २९ नोव्हेंबरला घडली. तथापि, ज्या महिलेला हा सांगाडा आढळला तिचा मुलगा पाच महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे हा सांगाडा त्याचा असल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
आंबेखारी गावातील महेश कडयामी (२२) हा जुलै महिन्यामध्ये मायालघाट येथे अक्षय मडावी सोबत मासेमारीसाठी गेला होता. त्या दिवसापासून तो बेपत्ता आहे. त्याची आई दुलमाबाई कडयामी (५०) या गावाजवळील जंगलात झाडू बनविण्यासाठी सिंधीच्या पाने तोडण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हात्यांना अर्धवट जमिनीत पुरून ठेवलेला सांगाडा आढळला. तिला हा महेशचा सांगाडा असावा असा संशय आहे. कोरची पोलिसांना याबाबत माहिती दिली असून तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी हा सांगाडा ताब्यात घेतला.
यावेळी उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया बुद्धे व स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
डीएनए चाचणी करणार
सांगाड्याच्या हाडाचे नमुने डीएनए तपासणी करिता ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हा सांगाडा नेमका कोणाचा हे समोर येणार आहे. सर्व शक्यता पडताळून तपास केला जाईल, असे पो.नि. शैलेंद्र ठाकरे यांनी सांगितले.
कोरचीः रस्त्याचे काम सुरु असताना सिमेंट काँक्रिट मिक्सरमध्ये अडकून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २८ नोव्हेंबरला कोटगुल परिसरातील बडीमाध्ये गावात घडली.
कैलास ब्रिजलाल पुडो (२५,रा. बडीमाध्ये) असे मयताचे नाव आहे. कोरचीपासून २० किलोमीटरवरील बडीमाध्ये गावात २८ रोजी दुपारी १ वाजता ११ मीटर सिमेंट रस्ता बनविण्याचे काम सुरु होते. यावेळी सिमेंट मिसळत असताना यंत्रात
कैलास पुडो याचा हात गेला, यानंतर तो आत खेचला गेला व त्याचे संपूर्ण शरीर यंत्रात गुंडाळले गेले. यात त्याचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला.
कैलासला १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित केले. कोरची पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.
चालक जखमी कोरची- भिमपूर मार्गावरील
कोरची - बंगलोर येथुन पाईप वाहुन नेणाऱ्या ट्रकने झाडाला धडक दिल्याने चालक जखमी झाल्याची घटना आज २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कोरची पासुन १ कि.मी अंतरावर वनश्री कला महाविद्यालय समोर घडली.
सी.जी.०४ एम.जी. ६७२३ क्रमांकाचा ट्रक बंगलोर वरून पाईप घेऊन रायपुरला जात असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगाने विद्युत खांबास धडक देऊन १०० मी अंतरावर असलेल्या झाडाला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ट्रकचा पुर्णतः चेंदामेंदा झाला. विद्युत खांब खाली कोसळल्याने विद्युत लाईन खंडित झाली. ट्रक चालक जसंवत पटेल रा. सेवरागांव ता. जबलपुर हा ट्रक मध्ये फसला होता. त्यांना आवागमन करणाऱ्या लोकांनी बाहेर काढून कोरची ग्रामीण रुग्णालयांमध्ये भरती केले. त्याच्या डाव्या हाताला व पायाला जबर मार लागला आहे.
कोरची : तालुक्यातील मसेली येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करून त्यांच्यावर हात उचलणे एका युवकाला चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुरुषोत्तम माधव हलामी (२९, रा. बोदालदंड, ता. कोरची) असे आरोपीचे नाव आहे. डॉ. नरेंद्र खोबा (३१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २० जानेवारी रोजी ते कर्तव्यावर असताना दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास रस्ता अपघातातील जखमी ऋत्विक श्रीराम सयाम (२३, रा. मसेली) याला त्याच्या मित्रांनी दवाखान्यात आणले होते.
डॉ. नरेंद्र खोबा यांनी रुग्णाची गंभीर दुखापत बघून रुग्णास रेफर करण्याची कागदपत्रे तयार केली आणि रुग्णाच्या नातेवाइकांना रुग्णास वाहनात बसवण्यास सांगितले. पुरुषोत्तम हलामी याने रुग्णास रेफर करण्याची कार्यवाही बघून डॉ. नरेंद्र खोबा यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.