PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024   

PostImage

प्रियकराकडून दोन बहिणी अन् वडिलांचा खून, परिसरात खळबळ


 

पाटणा: बिहारमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका विचलित असलेल्या प्रियकराने दोन अल्पवयीन मुली आणि त्यांच्या वडिलांची निघृणपणे हत्या केली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकरानेही हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. तर पोलिसांनी गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना त्वरित अटक केली आहे.

 

बिहारच्या सारण जिल्ह्यातील रसूलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यातील सारेच हादरले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचेही मृतदेह तात्काळ पोस्टमॉर्टमसाठी छपरा रुग्णालयात पाठवले. 

 

तर या जीवघेण्या हल्ल्यात मुलींची आई थोडक्यात बचावली आहे. तिच्यावरही सध्या छपरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेत जीव गमावलेल्या मुलींचे नाव चांदनी कुमारी, १७ वर्षे आणि आभा कुमारी १५ वर्षे असून त्यांच्या वडिलांचे नाव तारेश्वर सिंह आहे. पीडित मुलींची आई शोभादेवी यांनी घटनेबद्दल सांगितले की, हल्लेखोर पहाटे २ च्या सुमारास धारदार शस्त्रांसह त्यांच्या घरात घुसल आणि त्यांनी माझ्यासह मूली आणि नवऱ्यावर हल्ला केला.

 मी त्यातून बचावली आणि मी तेथून पळ काढला आणि गावामध्ये जाऊन आरडाओरड केली. जेणेकरुन गावकरी पोलिसांना घटनेबद्दल कळवतील. याप्रकरणी अधिक माहिती देत शोभादेवी पुढे म्हणाल्या, माझी मुलगी चांदनी कुमारी हिचे खूप दिवसांपूर्वी आरोपी सुधांशू कुमार याच्याशी बोलणे झाले होते. पण नुकताच तिने हे बोलणे थांबवले होते. तसेच त्याने माझ्या मुलीला धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी या घटनेत तातडीने तपासाची चक्र फिरवत सुधांशू कुमार उर्फ रोशन आणि त्याचा साथीदार अंकित कुमार याला अटक केली आहे. तर त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे.