• गडचिरोली, ब्युरो. मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवित असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पुलाखाली कोसळल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर पाचजण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 2) सायंकाळच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील उडेरा गावालगत घडली. पवन वनकर (35, रा. उडेरा) असे मृताचे नाव आहे. सदर ट्रॅक्टर एका शिक्षकाची असून, घटनेला चार दिवसांचा कालावधी लोटूनही संबंधित ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा नोंद न झाल्याने प्रकरण दडपडण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
एटापल्ली येथे शिक्षकी पेशात कार्यरत एक शिक्षक विविध व्यवसाय करीत आहे. याच शिक्षकाच्या मालकीचे ट्रॅक्टर घेऊन मद्यधुंद अवस्थेत असलेला ट्रॅक्टर चालक रविवारी सायंकाळच्या सुमारास उडेरा गावाकडे जात होता. यावेळी
ट्रॅक्टरमध्ये उराडी येथीलच पवन वनकर व इतर पाच बालके बसली होती. दरम्यान ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उडेरा गावालगतच्या पुलाखालून सदर ट्रॅक्टर उलटल्या गेले. ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. यात पवन वनकर याचा मृत्यू झाला. तर जखमी पाच बालकांना तत्काळ हेडरीच्या रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र यातील दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. तर तीन जखमींवर एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. एटापल्ली पोलिसांनी घटनस्थळ गाठित पंचनामा करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर जखमींची नावे कळू शकले नाही. विशेष म्हणजे अद्यापही ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद न झाल्याने प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे
दि. १५ जानेवारी गडचिरोली शहरापासून ५ किमी अंतरावरील गोगाव फाट्याच्या समोर मंगळवारी रात्री १० वाजता चे सुमारास एका कारने मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल वरील दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला आहे. मयुर विलास भुरसे (२५) रा. ठाणेगाव, ता. आरमोरी, विकास मधुकर धुडसे, (२५) रा. डोगरसावंगी, ता. आरमोरी अशी मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार मृतक मयुर विलास भुरसे हा त्याच्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३३ वाय २५१३ ने गडचिरोली वरुन ठाणेगाव कडे १० वाजताचे दरम्यान त्याचा मित्र विकास मधुकर धुळसे सह जात असतांना एक पांढऱ्या रंगाच्या रेनाल्ड कॉप्टर वाहन क्रमांक एम. एच. ३३ व्ही ४३३३ चा चालक आशीष माणीक एंचिलवार, रा. देऊळगाव, ता. आरमोरी याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन हयगयीने व भरधाव वेगाने व रस्त्याच्या परीस्थीतीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे वाहन चालवुन वाहनास जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही मोटरसायकल स्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचे नातेवाईक कार्तीक श्रीकृष्ण कुनघाडकर वय २० वर्ष, रा. तळोधी मोकासा ता. चामोर्शी यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपक मोहीते प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव व गुरवळा येथे दोन वेगवेगळे अपघात घडले. या अपघातांमध्ये दोघे जागीच ठार झाले, तर एकटा जखमी झाला. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देसाईगंज-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम अतिशय गतीने सुरू आहे. रेल्वेमार्गासाठी लागणारे साहित्य गोगाव येथे ठेवले जातात. त्यानंतर ते आवश्यकतेप्रमाणे नेले जाते. शुक्रवारी रात्री ८ वाजता कठाणी नदीकडे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने लोखंडी सळाखी नेल्या जात होत्या.
दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अगदी रस्त्याच्या बाजूला उलटला. यात ट्रॅक्टरचालक
तारीकुल अशरफपुल हक (१९, रा. पश्चिम बंगाल) हा जागीच ठार झाला, तर ट्रॅक्टरवर बसलेला कबीर उल इसाइत अली (२३, रा. पश्चिम बंगाल) हा जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
दुसरा अपघात गडचिरोलीपासून चार किमी अंतरावर गुरवळा मार्गावर शुक्रवारी सकाळी १० वाजता घडला.
अपघातात झाली वाढ
२०२४ डिसेंबरअखेर तसेच २०२५ च्या जानेवारी महिन्यात गडचिरोली शहर परिसरात अपघाताची मालिका सुरू आहे. डिसेंबर महिन्यात अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले. तर काही जणांचा बळी गेला. नियम मोडल्याने अपघात होतात.
गुरवळा येथील विनोद मुखरू तुनकलवार (४०) हे दुचाकीने गडचिरोली येथे येत होते. दरम्यान विरुद्ध दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने विनोद यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत विनोद हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मोहझरी: प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोहझरी येथील नीलकंठ सोनुले अंदाजे वय 45 हे कढोली येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने गेले होते .
आज सायंकाळी अंदाजे पाच वाजता सुमारास कढोलीवरून वैरागड मार्गे येत असताना कढोली जवळ असलेल्या पूलाच्या जवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. त्या धडकेमध्ये त्यांचा पाय मोडल्याचे घटनास्थळी दिसत आहे.
सदर अपघात ट्रकच्या धडकेमुळे झाल्याचे माहिती मिळालेली आहे .कारण या मार्गावर सतत ट्रकची वर्दळ असते त्यामुळे ट्रकमुळेच अपघात सांगितले जात आहे .या घटनेची माहिती तात्काळ नागरिकांना मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती.
नीलकंठ सोनुले यांना कुरखेडा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते पण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा वरून त्यांना पुढील उपचाराकरीता गडचिरोली येथील शासकीय रुग्णात हलविण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे अशा अपघात करणाऱ्या ट्रक चालकावर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गडचिरोली : दोन दुचाकींचीसमोरासमोर धडक बसल्याने दुचाकीस्वार तिघे जखमी झाल्याची घटना गडचिरोलीपासून दोन किमी अंतरावर कठाणी नदीपुलाजवळ सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
धनराज बोलिवार (५२) रा. उपरी, रवी वासेकर (४८), मोहन वाकुडकर (४८) दोघेही रा. भान्सी, ता. सावली जिल्हा चंद्रपूर अशी जखमींची नावे आहेत. यातील मोहन वाकुडकर हा गंभीर जखमी आहे. हे तिघेही दुचाकीने मिरची तोडण्यासाठी मजूर गोळा करण्यासाठी गोगावकडे जात होते.तिघेही दारू पिऊन तर्र होते.
दरम्यान, चालक धनराज बोलिवार याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत तिघेही जमिनीवर कोसळले. यात तिघांच्याही डोक्याला मारला लागला. मोहन हा बेशुद्ध पडला
होता. नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेने तिघांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
गडचिरोली-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्याने जखमींना बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
Road Accident: उत्तर प्रदेश के कन्नौज जिले में शुक्रवार दोपहर एक दर्दनाक सड़क हादसा हुआ। लखनऊ से दिल्ली जा रही यात्रियों से भरी एक डबल डेकर बस की टक्कर एक टैंकर से हो गई। यह दुर्घटना लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे पर हुई, जहां टक्कर के बाद दोनों वाहन डिवाइडर से टकराकर पलट गए। हादसे में 6 लोगों की मौत हो गई और 40 से अधिक यात्री घायल हो गए।
घटना के दौरान उत्तर प्रदेश के जलशक्ति मंत्री स्वतंत्रदेव सिंह का काफिला वहां से गुजर रहा था। उन्होंने तुरंत काफिला रुकवाकर हादसे की जानकारी ली और घायलों को अस्पताल पहुंचाने का प्रबंध किया। गंभीर रूप से घायल यात्रियों को मेडिकल कॉलेज तिर्वा और सैफई के अस्पताल में रेफर किया गया है।
ये भी पढ़े : Weapon License In India: हथियार का लाइसेंस कौन और कैसे ले सकता है?, जानिए पूरी जानकारी
गौरतलब है कि इस हादसे से पहले उत्तर प्रदेश के पीलीभीत और चित्रकूट में भी गुरुवार रात बड़े सड़क हादसे हुए थे। पीलीभीत में हुए हादसे में 5 लोगों की मौत हुई, जबकि चित्रकूट में 6 लोग अपनी जान गंवा बैठे। सर्दियों के मौसम में कोहरे के कारण सड़क हादसों की संख्या में लगातार वृद्धि हो रही है। कन्नौज में बीते 24 घंटे के अंदर यह तीसरा बड़ा हादसा है।
इस दर्दनाक हादसे ने सड़क सुरक्षा को लेकर एक बार फिर सवाल खड़े कर दिए हैं। अधिकारियों का कहना है कि कोहरे और तेज रफ्तार के कारण दुर्घटनाओं की संभावना और बढ़ जाती है।
दोघे जण जखमी वेगाने केला घात : बोडधाजवळची घटना
वडधा : दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एक जण ठार तर दोघेजण गंभीर झाले. ही घटना बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास वडधा पोर्ला
मार्गावरील बोडधा गावाजवळ घडली. या अपघातात प्रशांत रामलाल डोंगरे (वय, ३३ रा. तेली मोहल्ला गडचिरोली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी तर एकजण किरकोळ जखमी आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रशांत डोंगरे व अन्य एकजण पोर्ला- वडधा मार्गावरून वडधाकडे येत होते. तर बोरीचक येथील २ युवक वडधाकडून पोर्लाकडे जात होते. दरम्यान, दोन्ही भरधाव दुचाकींची बोडधा येथे समोरासमोर धडक बसली. यात तीघेजण गंभीर जखमी तर एकजण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना वडधा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. त्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.
यापैकी प्रशांत डोंगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोघेजण गंभीर जखमी आहेत. तर एक जण किरकोळ जखमी आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
धानोरा : गडचिरोलीवरून धानोराकडे निघालेली भरधाव कार चातगावजवळ उलटली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना १० नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता घडली. गडचिरोली येथून कार (एमएच १० सीएन- ३८८३) धानोराकडे जात होती.
चातगावजवळ वळणावर गतिरोधक न दिसल्याने चालकाने जोरात ब्रेक दाबले. यानंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सुदैवाने कारमधील कोणालाही गंभीर इजा झाली नाही. धानोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
धुळे: धुळे ते चाळीसगाव रोडवरील विंचुर फाट्यानजीक भरधाव दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्न करत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. भरधाव दुचाकी घसरून अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या रमेश शांताराम पवार (रा. खोरदड, ता. धुळे) यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास रमेश शांताराम पवार हे खोरदड गावातील नाना सखाराम पाटील यांच्या एमएच १८ सीबी ८९६५ क्रमांकाच्या दुचाकीवर मागे बसून धुळ्याकडे येत होते. त्यादरम्यान विंचूर फाट्याजवळ अचानक कुत्रा समोर आल्याने नाना पाटील यांनी जोराचा ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात मागे बसलेले रमेश पवार यांना गंभीर दुखापत झाली. नाना पाटील हे ही जखमी झाले. गंभीर अवस्थेत रमेश पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला अधिक मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत सुधाकर गंजीधर देवरे (रा. वलवाडी, ता. धुळे) यांनी धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अपघातप्रकरणी दुचाकी चालक नाना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.