PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023   

PostImage

Chandrapur news: वाघाच्या हल्ल्यात बैल ठार


 

 

 पळसगाव (पि) नेरीवरून जवळ असलेल्या वडसी-वाघेडा मार्गावरील रिसॉर्ट बांधकामाच्या मागील बाजूस बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतात चरत असलेल्या बैलावर एका पट्टेदार वाघाने हल्ला करून जागेवरच ठार केले.

हा बैल हा वडसी येथील शेतकरी धनराज शिवदास मेश्राम यांच्या मालकीचा असून, त्यांचे यात हजारोंचे नुकसान झाले आहे. मेश्राम यांनी बुधवारी सकाळी या बैलाला शेतात चरायला सोडले, दुपारपर्यंत बैल शेतात चरत होता. मात्र काही वेळानंतर बैल दिसला नाही. मेश्राम त्या जागेवर गेले असता बैल मृतावस्थेत दिसला. वनविभागाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. वाघाच्या हल्ल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

 

बातमी आणि जाहिरात साठी संपर्क साधा 9518913059


PostImage

Vidharbh News

Dec. 25, 2023   

PostImage

Tiger news ; सावली वनपरिक्षेत्रत वाघाचा मृत्यू; पाच दिवसात तीन …


चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील कापसी बीट परिसरात सोमवार २५ डिसेंबर च्या पहाटेच्या सुमारास गोसेखुर्द नहराच्या बाजूला शेतात वाघाचा मृतदेह सापडल्याने सर्विकडे एकच खळबळ उडाली आहे. सदर वाघाचा मृतदेह दिसल्याने ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनपाल कोडापे सह वनविभागाची चमू लगेच घटनास्थळी दाखल होऊन सदर वाघाचा मृत्यू कसा झाला या संदर्भातून पंचनामा सुरू आहे.

 

वाघाच्या शवविच्छेदनानंतरच वाघाचा मृत्यू कसा झाला आहे उघडकीस येणार असून या वाघाचा मृत्यूने या परिसरात खळबळ माजलेली आहे. दरम्यान २१ डिसेंबर रोजी ब्रम्हपुरी वन विभाग येथे, नंतर २४ डिसेंबर रोजी शेतामाधील विहिरीत वाघाचा मृतदेह आढळला तर आता सावली येथे वाघ मृत मिळाला.

*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.*             

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

 

*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*

☎️ : _७७५८९८६७९८_

 

*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*