CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
14-12-2023
जिल्ह्रातील नागरिकांनी केल्या 46 भरमार बंदुका पोलीस दलाच्या स्वाधिन
पीएलजीए सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांकडून पोलीस दलाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद
दिनांक 02 ते 08 डिसेंबर दरम्यान माओवाद्यांकडुन राबविल्या जाणाया पीएलजीए सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. यांचे नेतृत्वात माओवाद विरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून, या सप्ताहादरम्यान जिल्ह्रातील सर्व उपविभागांतर्गत पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या एकुण 46 भरमार बंदूका पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्रात मोठ¬ा प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करीत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत. अशा प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम-अतिदुर्गम भागात माओवादी याच बाबींचा फायदा घेवून, सर्वसामान्य जनतेला माओवादी चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतुन मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने गडचिरोली पोलीस दलाकडे स्वाधिन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग कुरखेडा हद्दीतील 08, उपविभाग भामरागड हद्दीतील 03, उपविभाग पेंढरी कॅम्प कारवाफा हद्दीतील 02, उपविभाग सिरोंचा हद्दीतील 05, उपविभाग जिमलगट्टा हद्दीतील 02, उपविभाग अहेरी हद्दीतील 04, उपविभाग एटापल्ली हद्दीतील 07 व उपविभाग धानोरा हद्दीतील 15 अशा एकुण 46 भरमार बंदुका गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलासमक्ष उपविभागातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर स्वाधिन केल्या. तसेच मागील वर्षी सन 2022 मध्ये एकुण 73 भरमार बंदुका जिल्ह्रातील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलासमक्ष स्वाधीन केलेल्या होत्या.
याकरिता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील सर्व प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments