बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
04-09-2024
गडचिरोली/ दिनांक, 03 :- गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. दिनांक 02/09/2024 रोजी बैल पोळा, तान्हा पोळा तसेच येत्या काही दिवसात असलेला गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये व पोस्टे हद्दीत अवैधरित्या चालणाया धंद्यांवर आळा बसविण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 02/09/2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्नील ईज्जपवार हे पोस्टेच्या स्टाफसह हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना मौजा कोलपल्ली तालुका अहेरी येथील आरोपी नामे 1) देवाजी निला सिडाम वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तह. अहेरी, जि. गडचिरोली हे त्यांच्या राहते घरुन देशी विदेशी दारुची अवैध विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन त्यांचे राहत्या घरी धाड टाकली असता, देशी विदेशी दारुसह एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यामध्ये, रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या एकुण 10,000 सिलबंद निपा किंमत 8,00,000/- रुपये, किंगफिशर स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या एकुण 80 नग बॉटल किंमत 24,000/- रुपये, हेवड्र्स 5000 स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या 230 नग सिलबंद बॉटल किंमत 57,500/- रुपये, ऑफिसर चॉईस कंपनीच्या 1000 मिली मापाच्या 54 नग सिलबंद बंपर किंमत 54,000/- रुपये असा एकुण 9,35,500/- (अक्षरी नऊ लाख पसतीस हजार पाचशे रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोउपनि. सागर माने, पोस्टे अहेरी यांचे लेखी फिर्यादीवरुन पाहिजे असलेले आरोपी नामे 1) देवाजी निला सिडाम, वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट, वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार, वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तालुका अहेरी, जि. गडचिरोली यांचे विरुध्द पोस्टे अहेरी येथे अप क्र. 258/2024 कलम 65 (ई), 83 महा. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे अहेरी पोनि. स्वप्नील ईज्जपवार यांचे नेतृत्वात, सपोनि. मंगेश वळवी, पोउपनि. सागर माने, पोउपनि. अतुल तराळे, पोहवा/1850 निलकंठ पेंदाम, नापोअं/5337 हेमराज वाघाडे, पोअं/5373 शंकर दहीफळे, मपोअं/8064 राणी कुसनाके, चापोहवा/2796 दादाराव सिडाम यांनी पार पाडली.
Your car is our responsibility
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments