संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
29-01-2024
चिमूर क्रांतीभूमीचे नाव केले लौकीक
शिक्षणाची ओढ असली तरी आर्थिक परिस्थिती समोर जावू देत नाही असा समज असल्यामूळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मागे पडताना दिसतात अशीच परिस्थिती शहरातील एका विद्यार्थावर आली. कुंटूब सुशिक्षीत मात्र आर्थिक विवंचनेत असताना मनाची तयारी केली अन यशालाही गवसनी घालता येते अशीच संकल्पना मनात ठेवून आर्थिक परिस्थितीला न घाबरता कठीण परिश्रमाच्या संघर्षातून मार्ग काढत पर्जन्य वैज्ञानिक झाला. तो दिल्ली येथील केंद्र सरकारच्या इलेट्रानिकी एव सुचना प्रौधोगिकी मंत्रालयात वैज्ञानीक बी सहायक निदेशक ( आई टी ) या पदावर कार्यरत आहे.
पर्जन्य चे वडिल शिवशंकर चोपकर सिव्हील इंजिनीअर आई उषा चोपकर गृहिनी होत्या ते चिमूर येथील गांधी वार्ड येथील रहिवासी आहेत. पर्जन्य ने प्राथमिक शिक्षक संस्कार विद्या निकेतन व बारावी पर्यंतचे शिक्षण नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथुन केले . इथे झाले. खरतर पर्जन्यचे अख्खे बालपन आर्थिक व मानसीक समस्येत गेले. मात्र जिवणात काही मोठं व्हायच हे आधीपासुनच ठरवल होत यासाठी खुप स्ट्रगल करत रात्रनं दिवस अभ्यास केला. यासाठी शैक्षणिक कर्ज घेतल खुप संघर्ष करत असतानाच स्पर्धा परिक्षेचा पहिला अटेम्प दिला मात्र यात अपयश हाती आले. दरम्यान कॉलेजमधून प्लेसमेंट झाल व कंपनी जॉईन केली. या कंपनीतील नौकरीमुळे थोडी आर्थिक समस्या कमी झाली मात्र शैक्षणिक कर्ज असल्यामुळे एक नौकरी सोडून दुसरी नौकरी करायला जमत नव्हते त्यामूळे पूर्ण वेळ स्पर्धा परिक्षेचा दुसरा अटेम्पट देवू शकत नव्हता तेव्हा नौकरी सोबतच अभ्यास करायच ठरविले. यात थोडफार यश आल.
पर्जन्य ला पहिली नौकरी चेन्नई येथे सॉफ्टवेअर इंजिनीयर ची मिळाली त्यानंतर पुन्हा परिक्षेचा दुसरा अटेम्पट दिला यातही अपयश आल. तेव्हा आपल्याला मोठं व्हायच आहे हे लक्षात ठेवून परिक्षेला तिन महीने असताना नौकरी सोडली व जिद्द चिकाटी व मेहनतीने करो या मरो या स्थितीत अभ्यास केला अखेरिस मेहनितीचे फळ मिळायला सुरुवात झाली लागोपाठ GATE, BARC, JNUEE, NET, JRF, NIC परिक्षा झाली. पर्जन्य ने NIC मध्ये वैज्ञानिक सहायक निदेशक या पदावर आपले नाव कोरून क्लास 1 गॅझेटेड अधिकारी झाला असून पर्जन्य ने चिमूर क्रांतीभूमी चे नाव लौकीक केले आहे.
..............................
कुठल्याही परिस्थितीला न खचता मेहनतीने व जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. आयुष्यात काही करायचे असेल तर सुर्या सारखे तपायला शिकलं पाहिजे. हेच मोटिवेशन ठेवून अभ्यास केला तर यश नक्की मिळते.
पर्जन्य चोपकर
वैज्ञानिक सहायक निदेशक ( आइ टी ) दिल्ली.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments