निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
23-02-2024
घोडा रथ यात्रा दरम्यान अश्वारूढ श्रीहरी बालाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे लाखो बालाजी भक्तांनी घेतले दर्शन
- शहरातील मुख्य मार्गाने निघाली घोडा रथ यात्रा
चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडारथ यात्रेला ३९७ वर्षाची परंपरा आहे. यावर्षी घोडा रथ यात्रा उत्सवाला २५१ वर्ष झाले आहे. मिती माघ शुद्ध पंचमी गुरुवार ला मध्यरात्रीच्या दरम्यान पुजा अर्चना करून लाकडी रथावरील लाकडी अश्वारूढ घोड्यावर लाकडी श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिकृतीत विष्णूची मूर्ती बसवून परंपरेनुसार शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असताना याच अश्वारूढ श्रीहरी बालाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे लोखो बालाजी भक्तांनी दर्शन घेतले. दरम्यान जय श्रीहरी बालाजी महाराज गोविंदा गोविंदाच्या गजराने चिमूर नगरी निनादली. यालाच रात घोडा असे म्हणतात.
श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाने याहीवर्षी घोडा रथ यात्रा उत्सवाचे आयोजन केले या उत्सवात गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, आमदार बंटी भांगडीया व परिवारांनी घोडा रथ यात्रा उत्सवादरम्यान श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेत गोविंदा गोविंदा सह जय श्रीरामाचे जयकारे लावले. दरम्यान श्रीहरी बालाजी महाराज कमिटीचे सर्व विश्वस्त, डाहुले पाटील यांचे वंशज व पुजारी भोपे यांच्या व्दारे विधीवत पूजा करून श्रीहरी बालाजी महाराजांचा घोडारथ गुरुवारी मध्यरात्री साढे बारा वाजताच्या दरम्यान शहरातील मुख्यमार्गानी फटाक्याची आतीशबाजी करत मार्गक्रमनासाठी निघाली असता वारकरी भजन मंडळ टाळ मृदुंगा व डिजेच्या ताल सुरात शहीद बालाजी रायपूर चौक, नेहरू चौक, अहिंसा चौक, मार्केट लाईन, छत्रपती शिवाजी चौकातून मुख्य मार्गाने श्रीहरी बालाजी मंदीरासमोर शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजता पोहचला असता परिसर संपूर्ण भक्तीय झाला होता दरम्यान घोडा रथ यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी लाखो भक्तांनी श्रहिरी बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.
२५ फेब्रुवारी रविवार ला दुपारी ३ वाजता हभप विनोद बुवा खोंड महाराज यांच्या नारदीय किर्तनाने गोपाल काला होणार आहे. श्रीहरी बालाजी भक्तांनी या गोपाल काल्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष निलम राचलवार यांनी केले आहे.हि यात्रा महाशिवरात्री पर्यंत असते. या यात्रेत मनोरंजनात्मक आकाश पाळना, ड्रँगन, कोलंबस, मौत काँ कुआँ, भूत बंगला, बैठकी ब्रेक डान्स पाळना व मिना बाजारात म विवीध साहित्यांच्या खरेदी दुकाने सजली आहेत.
..................................
संपूर्ण परिसर जय श्रीराममय झाला -
इशरथ जहान यांचा घोडायात्रा महोत्सवानिमित्त गुरुवार ला रोड शो ठेवण्यात आला दरम्यान श्रीहरी बालाजी मंदीर परिसारत स्थानिक स्टेजवर भगवा रंग चढणे लगा है हे गाणे म्हणत असताना अनेक भक्तांनी ठेका घेतला. श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा दरम्यान शहरातीत मुख्य रस्त्यानी रोड करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर जय श्रीराममय झाला.
चिमूर घोडा यात्रा महोत्सव समिती यांच्या वतीने २६ फेब्रुवारी ला चला हवा येऊ द्या भाऊ कदम भरत गणेशपुरे व संच यांचा लाईव्ह कामेडी शो, २७ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय गरबा गायीका गिताबेन रब्बारि यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम, २८ फेब्रुवारी ला जयजय महाराष्ट्र माझा गीत फेम अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम चिमूर बाजार मैदान लोणकर पेट्रोल पंपच्या जवळ रात्रो ८.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला परिसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष बंटी वनकर व सहकारी यांनी केले आहे.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments