निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
21-09-2024
उमेदवारीसाठी चार पुढऱ्यांनी अर्ज केल्याचे कळते
चिमूर -
राज्यातील विधान सभेच्या निवडणूका काही दिवसावर येवून ठेपल्या आहेत. काही दिवसातच निवडणूकीची आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसचे काही पुढारी सहा महिन्यापासून तर काही पाच वर्षापूर्वीपासूनच पुढाऱ्यांनी चिमूर विधानसभा मतदार संघ पिंजून काढला आहे. दरम्यान पुढारी आर्थीक मदतीसह शैक्षणिक साहित्याचा वाटप करित आहे. तर काही पुढारी काही न करता चिमूर विधानसभेत काय चाललय हे पाहत आहे. त्यामुळे चिमूर विधानसभेत काँग्रेसची नेमकी उमेदवारी ' यांना कि त्यांना ' या संभ्रमात मतदार, नागरीक आहेत.
लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आपल्यालाच चिमूर विधानसभेची उमेदवारी पक्की असल्याचे मतदारांना तालुक्यातील दोन पुढारी सांगत फिरत आहे. दरम्यान यातील एक पुढारी चिमूर विधानसभा क्षेत्राचे तिनशे पाच बुथ पिंजून काढत विशिष्ट समाजाच्या बैठका, सभा, उद्घाटन, विवीध समस्यावर आर्थीक मदत व गावातील समस्या या विषयावर पुढारी गाव खेडयात व शहरात जावून समस्या जानून घेत आंदोलने, मोर्चे काढत आहेत. या पुढाऱ्यांनी राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार व दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठांच्या भेटी गाठी घेवून चिमूर विधानसभा मतदार संघातील समस्या जानून कामाला लागल्याचे चित्र समाज माध्यमातून दिसत आहे. मात्र अजून पर्यंत चिमूर विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली नाही. ऐन वेळेवर पुढाऱ्याला उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार संघात इतर पुढाऱ्यांनी केलेली आर्थीक, शैक्षणिक मदत व समाज सेवावर पाणी फेरल्या सारखे होईल.
प्राप्त माहिती नुसार लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आपल्याला चिमूर विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्र समन्वयक तथा माजी जि प अध्यक्ष डॉ सतिश वारजूकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी संघटक धनराज मुंगले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव शिवाणी वडेट्टीवार व सहकार नेते तथा मध्यवर्ती को ऑफ बँकेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांनी राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अर्ज केला असल्याची माहिती कळते. यापैकी तिन पुढारी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांच्या अगदी जवळचे असल्याचे बोलले जात आहे. मात्र यापूर्वी चिमूर विधान सभेच्या झालेल्या निवडणूकीत एका पुढाऱ्यांची " अर्ध्यावरती डाव मोडला , "अधूरी एक कहान " या गितीच्या ओळी प्रमाने स्थिती झाली होती. दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांचेशी जमत नसताना एका पुढाऱ्यांने चिमूर विधानसभेची अखेरची संधी म्हणून यावर्षीच्या लोकसभा निवडणूकीच्या काही दिवसापूर्वीपासून जुळवून घेतल्याचे बोलले जात असून ते चिमूर विधानसभाचे संभाव्य उमेदवार म्हणून होवू घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकातील 'भातकुलीच्या खेळात' राजा आणिक कितपत यशस्वी होते की त्या वरिल गिताच्या ओळीप्रमाने 'अधूरी एक कहानी' पूर्ण होते कि 'अधूरीच कहानी ' राहते याकडे चिमूर विधान सभेतील नागरीक व मतदार यांचे लक्ष लागले असून ऐन वेळेवर उमेदवारी यापैकी कोन्हाला मिळते.....? हे मात्र विशेष आहे.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments