संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
08-11-2023
ॲड.दीपक चटप यांना गेल्या वर्षी ब्रिटीश सरकारने प्रतिष्ठेची ‘चेवनिंग’ शिष्यवृत्ती दिली होती.
चंद्रपूर: गडचांदूर येथील ॲड.दीपक यादवराव चटप याला वकिलीसाठी आंतरराष्ट्रीय संस्थांतील सामाजिक योगदानासाठी चेव्हनिंग गोल्ड व्हालंटरिंग (Chevening Gold Volunteering) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
युनायटेड किंग्डम ( UK ) येथे जगभरातून उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुणींनी शिक्षणासह त्याच्या कामाचा सामाजिक प्रभाव तेथील सरकारवर पडतो, त्यांना ब्रिटीश सरकार फॉरेन काॅमनवेल्थ डेवलपमेंट (Foreign, Commonwealth & Development Office) विभागाकडून गौरव करण्यात येते आहे. या वर्षी जगातल्या १६८ देशातील १६०० स्काॅलर्स मधून चंद्रपूरचा दीपक चपट हा ब्रिटिश सरकारचा ‘गोल्ड’ मॅन ठरलेला आहे.
ॲड.दीपक यादवराव चटप हा केवळ २६ वर्षीय, गडचांदूर येथे राहणार लंडन मध्ये कायद्याचे उच्च-शिक्षण घेणाऱ्या भारतीय तरुण वकिलीसाठी आंतरराष्ट्रीय संस्थेतील सामाजिक योगदानासाठी चेव्हनिंग गोल्ड व्हालंटरिंग ( Chevening Gold Volunteering) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडनमधील आंतरराष्ट्रीय संस्थांतील प्रभावशाली शैक्षणिक स्वयंसेवा योगदानाची जागतिक स्तरावर दखल झाल्याने देशाच्या मान उंचावणारी बाब आहे.
ॲड.दीपक चटप यांनी लंडन मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमा दरम्यान सामाजिक न्याय, शांतता आणि मानवी हक्कांसाठी समर्पित आंतरराष्ट्रीय संस्थांनासाठी स्वेच्छेने सुमारे १६२ तास काम केले आहे. ब्रिटन सरकारच्या फॉरेन कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट (Foreign, Commonwealth & Development Office) विभागातर्फे वर्षभर स्वयंसेवेसाठी असाधारण बांधिलकी दाखविणाऱ्या जगभरातील स्कॉलर्सतून हा पुरस्कार दिला जातो. नुकताच त्यांना हा सन्मान लंडन येथे प्रदान करण्यात आलेला आहे. ॲड.दीपक चटप यांना गेल्या वर्षी ब्रिटीश सरकारने प्रतिष्ठेची ‘चेवनिंग’ शिष्यवृत्ती सुध्दा दिली होती, ज्यामुळे त्यांना लंडनमधील सोएस या जागतिक नामांकित विद्यापीठात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. या संधीचे सोने करीत दीपकने जगभरातील स्काॅलर्सतून आपली बाजी मारली.
आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील ॲड.दीपक चटप यांनी चंद्रपूर-गडचिरोलीसह राज्यातील सामाजिक प्रश्नांवर केलेले कायदे-विषयक रचनात्मक काम समाजाला प्रेरणादायी ठरले आहेत. संविधानिक मुल्ये, विधायक धोरणे, ग्रामीण युवकांची शैक्षणिक क्षमता बांधणी, हक्क व अधिकारा विषयी कृती युक्त भुमीका दिशादर्शक ठरलेल्या आहेत. लंडन येथे उच्चशिक्षणा नंतर देश-विदेशात मोठ्या पगाराच्या नोकरी ची संधी असताना देखील शिक्षणाचा उपयोग समाज हितासाठी करायला व्हावा, या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यात परत येवून रचनात्मक काम उभे करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
ॲड.दीपक चटप यांची लंडनवर छाप
वर्षभरात युनायटेड किंग्डम (UK) येथील बर्मीगम, ग्लासगो, कार्डीफ अशा ठिकाणी झालेल्या जागतिक परिषद मध्ये ॲड.दीपक चटप यांचा सहभाग खुप महत्वपूर्ण ठरला. विशेषतः लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या जागतिक परिषदेत विशेष वक्ता म्हणून ॲड.दीपकने भूमीका मांडली. जगभरातील स्काॅलर्सचे नेतृत्व करत लंडनच्या संसदेत लोक-प्रतिनिधी-स्काॅलर्स संवाद घडवून आणला. लंडनमध्ये भारतीय लोकशाही व आजची आव्हाने यावर परिसंवाद घडवून आणत जगभरातील स्काॅलर्सचे भारता विषयी लक्ष वेधले घेतले आहे. अमेरिकेतील अनुदान, जागतिक व्यापार संघटनेची धोरणे व भारतातील कायद्यांचा कापूस उत्पादक शेतक-यांवर होणारा परिणाम या विषयावर दीपकने संशोधन केले असून लवकरच ते प्रसिद्ध होणार आहेत.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments