CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
10-02-2024
संजो कॉन्व्हेंटच्या शिक्षकाने एका विद्यार्थीनीकडून लुटले सहा तोडे सोने
फसवून केल्या प्रकरणी पोलिसांनी केला गुन्हा दाखल
गोंडपिपरी:-
येथील संजो कॅन्व्हेंटचे शिक्षक अखिल रोहनकर याने एका विद्यार्थीनी कडून सहा तोडे सोने लुटले असून पालकाच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गोंडपिपरी शहरातील संजो कॉन्व्हेंट मध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने मावशीची तब्येत बरी नसल्याने उपचारासाठी पैशाची नितातं गरज असल्याचे सांगून त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासह पालकांकडून पैसे मागितले. एका विद्यार्थीनीने तब्बल सहा तोळे सोने शिक्षकाला दिले.
काही दिवसांनी दिलेले सोने परत मागितले असता शिक्षकाने सोने देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच विद्यार्थींनीने पालकाच्या सोबतीने गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपीस अटक केली. आरोपीचे नाव अखिल रोहणकर रा.वडसा असे आहे.
गोंडपिपरी येथील
संजो कॉन्व्हेंट ही सिबीएससी पॅटर्नची शाळा आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने मुलांच्या उज्जल भविष्यासाठी शहरातील मोठे अधिकारी , विविध विभागातील कर्मचारी , लहान-मोठे व्यावसायिक यासह सधन शेतकऱ्यांची मुले या कॉन्व्हेंट मधून शिक्षण घेत आहेत . वडसा येथील अखिल रोहणकर यांची संगीत शिक्षक म्हणून संजो कॉन्व्हेंट मध्ये नियुक्ती करण्यात आली. अल्पावधीतच सदर शिक्षकाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. संगीत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसह पालकात सुद्धा चांगली ओळख झाली. नामांकित शाळेत शिक्षक असल्याचा फायदा घेत रोहनकर यांनी मावशीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने पैशाची नितांत गरज असल्याचे एका विद्यार्थीनिला सांगीतले . घरच्यांना काहीही न सांगता तब्बल सहा तोटे सोने विद्यार्थीनीने शिक्षकाकडे आणून दिले. दरम्यान लवकरच सोने परत करणार असल्याचा विश्वास शिक्षकाने दाखविला. काही दिवसांनी विद्यार्थीनीने शिक्षकाला दिलेले सोने परत मागितले असता सोने देण्यास शिक्षकाने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे समजून येताच विद्यार्थिनीने सदर बाब आई वडिलांना सांगितली. लागलीच गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठून शिक्षका विरोधात फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली. तात्काळ गोंडपीपरी पोलिसांनी आरोपीस अटक केली. सदर बाब गोंडपीपरी शहरात पसरताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण काही दिवसापूर्वी असेच कारण पुढे करीत सदर शिक्षकाने अनेक पालकांच्या घरी जाऊन पैसे मागितले.
अडचणीत एकमेकांना मदत केली पाहिजे असे म्हणत अनेक पालकांनी आपल्या क्षमतेनुसार पाच हजार, दहा हजार, विस हजार तर काहींनी ५० हजार पर्यंतची रक्कम त्या शिक्षकाला दिल्याचे चर्चतून समोर आले आहे. फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी
गोंडपिपरी पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली. न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. सदर प्रकरणी पोलिसांकडून ओरोपीची कसून चौकशी व्हावी करीता न्यायालयाने एक दिवसासाठी पीसीआर (पोलीस कस्टडी रिमांड) दिला आहे.
पुढील तपास गोंडपिपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोगरे करीत आहे.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments