CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
01-08-2024
दलीत वस्तीकडे जाणाऱ्या रोडकडे फिरविली ग्रामपंचायत ने पाठ
सरपंच व उपसरपंच गाव सोडून निवासी राहतात बाहेर गावात
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील ठाकरी गावात दलीत वस्तीकडे जाणाऱ्या रोडकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पाठ फिरवल्याने चिखल तुडवीत ग्रामस्थांना आवागमण करावे लागते आहे
ग्रामविकासाच्या बाता मारणाऱ्या सरपंच नंदा कुळसंगे व उपसरपंच विठ्ठल आचेवार हे दोन्ही गावांतील प्रमुख गावात न राहता बाहेर गावात राहून प्रशासन सांभाळीत आहेत आता सघा स्थितीला पुरामुळे गावातील शेतकऱ्यांचे व घर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याने ते गावात येत आहेत
चपराळा कडे जाणारा मुख्य रोड पासून ठाकरी गावात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहे मात्र त्या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्याच मार्गाने ठाकरी येथील आबालवृद्ध,नागरिकांना मार्ग क्रमण करावे लागते चिखल तुडवीत जाताना तारेवरची कसरत करावी लागते आहे वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला सदर रोडची दुरुस्ती करावी अशी मागणी करुनही ग्रामपंचायत प्रशासन या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येते आहे त्यामुळे ठाकरी येथील जनता त्रस्त झाली आहे
एवढ्या विकास कामाचा आव आणणारे लोकप्रतिनिधी दलीत वस्तीकडे दुर्लक्ष कसे काय करतात हा प्रश्न उपस्थित होतो आहे
दलीत वस्तीकरीता शासनाच्या अनेक योजना ग्रामपंचायत च्या माध्यमातून राबविण्यात येत असतात परंतू ठाकरी ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे
गावातील नागरिकांची ससेहोलपट केव्हा थांबणार असे विक्की आचेवार,आशिष कंचर्लावार,प्रभाकर तिरुपतीवार,संजय गोरडवार, रामदास माडेमवार,मधुकर कारकुरवार,विलास गोरडवार,मल्ला भटृटीवार, विश्वनाथ कारकुरवार,दुर्गाजी जिल्लेवार,पार्वता गोरडवार,सुनिता चिंतमवार,सुरेखा आचेवार,कमला प्यारमवार
आदिंनी प्रसीद्धी पत्रकातून प्रश्न उपस्थित केला आहे
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments