आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
01-08-2024
ताराबाईने स्वतःच्या इभ्रतीची पर्वा न करता नदीपुरात वाहून जाणाऱ्या दोघांना साडीच्या साह्याने दिले जीवदान तर एकाला जलसमाधी
शिर्डी:-
शेतीच्या उपयोगासाठी नदीपात्रातील लावलेल्या विद्यूत मोटारी काढत असताना अचानक नदीला पूर आल्याने पुरात वाहून जाणाऱ्या दोन इसमास आपल्या इभ्रतीची पर्वा न करता ताराबाईने आपली साडी सोडून त्यांच्याकडे फेकली त्या आधारे दोघांचे प्राण वाचले तर एका तरुणाला जलसमाधी मिळाली आहे
कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील शेतकरी गोदावरी नदीपात्रात असलेल्या आपल्या विद्युत मोटारी वरती काढत असताना पाण्याचा अचानक प्रवाह वाढल्यामुळे त्या प्रवाहात संतोष भीमाशंकर तांगतोडे ,प्रदीप भीमाशंकर तांगतोडे व अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे तरुण भावंडं वाहून जात असताना शेजारी शेळ्या चारणाऱ्या ताराबाई पवार व त्यांचे पती छबुराव पवार यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते मदतीसाठी धावून आले. ताराबाईने प्रसंगावधान राखून आपल्या अंगावरील साडी क्षणार्धात सोडून ती बुडणाऱ्या तरुणांच्या दिशेने फेकली त्या साडीच्या साह्याने त्यातील दोन तरुणांना वाचविण्यात यश आले परंतु संतोष भीमाशंकर तांगतोडे वय वर्ष 25 या तरुणाच दुर्दैवी बुडून अंत झाला. ताराबाईच्या चेहऱ्यावरती दोघांना वाचवल्याचा आनंद ओसंडून वाहत होता मात्र एकाला वाचू शकले नाही याचे दुःख व्यक्त करताना ती धाय मोकलून रडत होती. दोन तरुणांना जीवदान देणाऱ्या अशा या शूरवीर मातेच्या शौर्याचे कौतुक करून तिचा सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात व सुनील मोकळ यांनी सत्कार केला. ताराबाई या आदिवासी महिलेची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट असून तिला राहायला चांगल्या प्रकारे घरीसुद्धा नाही. शासनाकडून तिला आर्थिक मदत व शौर्य पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात व सुनील मोकळ यांनी व्यक्त केली आहे
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments