अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
06-10-2024
ट्रकची स्कुटीला जब्बर धडक , आजोबा नातवाचा जागीच ठार
उमरखेड :- मध्य धुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालवीत स्कुटी वरील दोघांना अक्षरशा चिरडून टाकले यात आजोबा व नातू जागीच ठार झाल्याची घटना दि. ५ रोजी सकाळी १० वाजताचे दरम्यान बोरी तुळजापुर महामार्गावरील महागाव रस्त्यावरील नांदगव्हाण घाटात घडली
दोघांना चिरडून वाहनासह फरार होऊ पाहणाऱ्या ट्रकचालकास पोलिसांनी पाठलाग करून पकडले
रमणीकभाई भीमजीभाई पटेल (६५) व केतव राजेश पटेल (१९) दोन्ही रा. हनुमान वार्ड उमरखेड असे भीषण अपघातात मृत पावलेल्या आजोबा व नातवाचे नाव असून रमनिकभाई पटेल यांचा ऑटोमोबाईल चा व्यवसाय आहे ते महागाव येथे नातवाच्या कॉलेजच्या कामासाठी स्कुटी वरून नातवाला घेऊन जात होते.
यावेळी नांदेड कडून यवतमाळ कडे जात असलेल्या ट्रक क्र.एम एच ४९ एटी २९०८ चे चालक महेंद्र नथुजी बागडे (५६) रा. सावनेर. हा अमली पदार्थाच्या नशेत भरधाव वेगाने ट्रक चाळवीत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.भरधाव वेगात झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक अधिक भरधाव वेगाने कळवला.
सदर घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शिनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना दिली त्यानी महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरस्वती राठोड, शेख वसीम, आणि पोलीसांचा ताफा सोबत घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला. अवघ्या १० मिनिटात अंबोडा गावाजवळ या ट्रक चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
महिंद्र नत्थुजी बागडे (५६) असे ट्रकचालकाचे नाव असून तो सावनेर येथील रहिवासी असल्याचे कळते. मृतदेहावर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments