रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
08-02-2025
एका इसमाने बलात्कार करून महिलेचा गळा दाबून केला खुन
नागपूर:-
एका इसमाने बलात्कार करून गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३३ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. सध्या महिलेच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्या पुरूषाने महिलेसोबत दारू प्यायली होती. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला.
हुडकेश्वर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. परंतु जीएमसीएचमधील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तपासणी केली आणि असे आढळून आले की महिलेच्या मानेवर गळा दाबण्याच्या खुणा होत्या आणि त्यासाठी बळाचा वापर करण्यात आला होता.
सदर महिलेचे अनेक लोकांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला काही वर्षांपूर्वी तिच्या पती आणि मुलीसह नागपूरला आली होती. नागपूरला आल्यानंतर त्यांचे अनेक लोकांशी संबंध निर्माण झाले होते. आतापर्यंतच्या तपासात किमान दोन नावे समोर आली आहेत. पतीव्यतिरिक्त, पोलिसांना इतर अनेक लोकांवरही संशय आहे.
आरोपी महिलेच्या घरी वारंवार येत असे तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की आरोपी अनेकदा महिलेच्या घरी येत असे. दोघेही तिथे एकत्र दारू प्यायचे. तो त्या महिलेला काही पैसे देऊन निघून जायचा. हत्येच्या दिवशी महिलेने आणखी पैशांची मागणी केली. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. आरोपीने रागाच्या भरात महिलेचा गळा दाबून खून केला.
अधिक तपास पोलीस करीत आहेत
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments