निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
28-09-2024
My Kabar 24 : आतापर्यंत आपण विविध प्रकारच्या योजना शासनातर्फे येत असताना बघितलं त्याची अंमलबजावणी होत असताना बघितली आणि त्यामुळे राजकिय पातळीवर त्याच कोणकोणते परिणाम होतात हे सुद्धा रोजच्या ताजा घडामोडी वरून जाणून तर घेतोच आहोत सध्या निवडणुकीत चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. सोबतच एका पुढे एक योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे लोक काय विचार करतात त्यांचे मत काय असतील हे आपण शोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच बघत आलो आहोत.
पण आज आपण या लेखात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवीन्यता आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री योजना दूत yojana doot bharti
आपल्या महाराष्ट्र राज्यात 50 हजार योजना दूतांची नियुक्ती प्रत्येक ग्रामपंचायतीत एक याप्रमाणे करण्यात येणार आहे. दारोदारी जाऊन महाराष्ट्र शासनाच्या सरकारी योजनांची माहिती व प्रसार प्रचार करण्यासाठी या योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कोटींचा खर्च अपेक्षित आहे. निवड झाल्यानंतर प्रत्येक योजना दूताला दरमहा 10 हजार रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे.
योजनांदूताची कामे काय असतील वाचा
• योजना दुत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांचा संपर्क साधून जिल्ह्यात योजना ची माहिती घेतील प्रशिक्षित योजना दूतांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्या बंधनकारक राहील.
• योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर नियंत्रणाचे समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती दिली यासाठी प्रयत्न करतील.
• योजना दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुना इतर माहिती तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील.
• योजनादूत सोपविला जबाबदारीचा स्वतःचा स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवात वर्तन करणार नाहीत.
• योजना दूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात (Yojana Doot Bharti 2024) आलेल्या करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल.
• योजनादूत गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेले असताना मानधन अनुज्ञेय राहणार नाही योजना दुताच्या भरतीसाठी शासन निर्णय जाहीर झाला आहे.
• या भरती द्वारे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000
हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार
योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे.
• मुख्यमंत्री योजनादूतास 10,000/- रुपये एवढे ठोक मासिक वेतन मिळणार आहे.
• या भरतीमद्धे पात्र होणारे योजनादूत ही 6 महिन्यांच्या कालावधी साठी निवडले जाणार आहेत.
यासाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार असून जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भातील उमेदवारांची नेमणूक करतील. आणि तरीदेखील अजून भरती प्रक्रियेबाबत तारीख अद्याप निश्चित झाली नाही. परंतु उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख यापूर्वी 17 सप्टेंबर 2024 होती , आता मुदतवाढी नंतर अर्ज करण्याची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
अर्जाची लिंक
https://mahayojanadoot.org/
• वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना योजनेचा लाभ घेता येईल.
• शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
• उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक आहे.
• उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आधिवासी असणे आवश्यक आहे.
• उमेदवाराचे आधार कार्ड असावे.
• उमेदवाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे.
• विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज.
• आधार कार्ड.
• मोबाईल क्रमांक
• ई-मेल आयडी
• पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे/प्रमाणपत्र इ.
• अधिवासाचा दाखल.(सक्षम यंत्रणेने दिलेला).
• वैयक्तिक बँक खात्याचा तपशील.
• हमीपत्र.(ऑनलाइन अर्जासोबत च्या नमुन्यामधील)
अश्याच प्रकारच्या नवनवीन ताजा घडामोडी आणि सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या माय खबर 24 ला व्हिजिट करा..
सोबतच खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आमच्या Whatsapp group ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments