ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
25-07-2024
Sarkari Yojana 2024: विविध केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत, राष्ट्रीय अन्न आणि पोषण अभियानाअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात 250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामांच्या बांधकामासाठी वास्तविक खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. शासनाकडून सदर मिळणार असल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषांनुसार डिझाइन, तपशील, खर्च अंदाजानुसार त्याच आर्थिक वर्षात गोदामाचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला रास्त व नाममात्र किंमत आकारून साठवणुकीसाठी गोदामाचा वापर करणे बंधनकारक आहे. या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही होत आहे.
जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी संघ किंवा उत्पादक कंपनी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण भांडार योजना Gramin Bhandar Yojana व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्जदारांनी प्रथम राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँके कडून कर्ज मंजूर केल्यानंतरच संबंधित अर्जदार किंवा कंपनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज करू शकतील.
पूर्व मंजूर कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर, त्यांना स्वीकार्य अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकरी उत्पादक कंपनी, असोसिएशनच्या खात्यात वितरीत केले जाणार आहे.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! सरकार स्वस्तात विकणार कांदे आणि टोमॅटो !
शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात संपूर्ण दस्तावेजासह अर्ज सादर करावा, असे कळविण्यात आले आहे.
सदर हि योजना बँक कर्जाशी संबंधित आहे आणि इच्छुक शेतकरी व उत्पादक संघटना, कंपन्यांनी अर्ज सादर करावेत.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments