अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
04-11-2024
Viral Video: भारतातील विविध मंदिरांमध्ये भक्तांच्या वेगवेगळ्या श्रद्धेचे प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येक भक्ताचं देवावर विश्वास ठेवण्याचं आणि तो दर्शवण्याचं वेगळं तत्त्व असतं. कोणी देवाशी एकांतात संवाद साधतं, तर कोणी त्याच्यासमोर नतमस्तक होतं. पण काही वेळा या भक्तांच्या अंधश्रद्धेचं असं दर्शन घडतं की पाहणाऱ्यांनाही धक्का बसतो.
असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मथुरेतील प्रसिद्ध बाँके बिहारी कृष्णमंदिरामध्ये एक अद्भुत आणि आश्चर्यकारक प्रसंग घडला. मंदिराच्या एका गजमुखातून पाणी बाहेर येत होतं, आणि भक्तांनी ते पाणी तीर्थ समजून पिऊ लागले. काहींनी ग्लासाने, काहींनी हाताने ते पाणी घेतलं, श्रद्धेनं डोळ्यांना लावलं आणि डोक्यावर फिरवलं. या भक्तांना वाटलं की हे पाणी म्हणजे देवाचं चरणामृत आहे, म्हणून ते आदराने पित होते.
प्रत्यक्षात हे पाणी मंदिरातील एअर कंडिशनरमधून बाहेर पडणारं पाणी होतं, ज्यामध्ये कोणताही धार्मिक अर्थ नव्हता. एका भक्तानं हे पाहून इतर भक्तांना या पाण्याची खरी ओळख सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर फारसा परिणाम झाला नाही. काही भक्तांनी जणू काहीच घडलं नाही अशा अविर्भावात हे पाणी तीर्थ समजून पिणं सुरूच ठेवलं.
X (पूर्वीचा Twitter) वर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "इथं शंभर टक्के शिक्षणाची गरज आहे. लोकं एसीच्या पाण्याला चरणामृत समजून पिऊ लागली आहेत." या व्हिडीओला पाहून अनेक नेटकऱ्यांनी श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या अशा अंधश्रद्धेला विरोध दर्शवला आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
No Comments