बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
29-04-2024
आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणाऱ्यांवर अहेरी पोलिसांची मोठी कारवार्ई
गडचिरोली : पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा. यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत.
त्या पाश्र्वभुमीवर दि. 27/04/2024 रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आय.पी.एल. सट्टा खेळवणारे इसम बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा., उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे सा., पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी. दशरथ वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोउपनि. गवळी व पोलीस स्टॉफ सह विशेष मोहिम राबवुन मौजा अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता, बनावटी अॅप nice.7777.fun या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा खेळ खेळुन इतर लोकांना त्यावर पैसे लावुन नशिब आजमावुन आय.पी.एल सट्टा जुगार खेळ खेळवित असल्याचे दिसुन आले. घटनास्थळावरुन नामे निखील दुर्गेे व आसिफ शेख यांच्या ताब्यातुन चार मोबाईल फोन व भारतीय चलनाचे रोख 9,420/- रु असा मुद्देमाल मिळुन आला.
नमुद दोन्ही आरोपींना विश्वासात घेवुन विचारपुस करुन अधिक चौकशीत असे निष्पन्न झाले की,
नामे इरफान ईकबाल शेख रा. अहेरी याचे अप्पर लाईनला संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली हा सदरचे रॅकेट चालवत असुन सदर बेकायदेशिर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा जुगार चालविणारे निखील दुर्गेे व आसिफ शेख हे व्यक्ती एजंट वर्गात मोडतात तसेच त्यांचे (बेस लेवल) खालच्या पातळीवर काम कारणारे निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण हे सुध्दा आय. पी. एल. सट्टयामध्ये एजंट चे काम करतात.
गुन्हयातील आरोपी नामे 1) निखील मल्लया दुर्गेे, 2)आसिफ फकीर मोहम्मद शेख, 3) धंनजय राजरत्नम गोगीवार, 4) निखील गुंडावार, 5) प्रणित श्रीरामवार, 6)अक्षय गनमुकलवार, 7)फरमान शेख, 8)फरदिन पठाण, 9)इरफान ईकबाल शेख सर्व रा. अहेरी, 10) संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली यांचे विरुध्द पोलिस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 4 व 5 कायदयान्वये गुन्हा नोंंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन). कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख., अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे सा.यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी. दशरथ वाघमोडे, पोउपनि जनार्धन काळे, पोउपनि गवळी, पोहवा/काबंळे, पोहवा/संजय बोलीवार,पोहवा/पठाण, पोहवा/मडावी, पोहवा/शेन्डे, पोअं/केंद्रे, पोअं/देवेंंद्र दुर्गेे, पोअं/सुरज करपे, पोअं/दहिफळे व चापोना भंडे यांनी पार पाडली. यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासुन दुर राहुन जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.
------------।।।--------------
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments