संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
27-07-2024
Gadchiroli News: गडचिरोली : जिल्हा पोलिस दलातर्फे 912 शिपाई पदांसाठी मैदानी परीक्षा पार पडल्यानंतर आता 28 जुलै रोजी सकाळी 8:00 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी 11 केंद्रे निश्चित केली आहेत.
21 जून ते 23 जुलै या कालावधीत मैदानी चाचणी पार पडली. 912 पदांसाठी 28 हजार उमेदवारांनी अर्ज गुणांच्या आधारे लेखी परीक्षेसाठी केले होते. मैदानी चाचणीतील एकूण 6 हजार 711 उमेदवार पात्र झाले आहेत.
28 जुलै रोजी सामान्य अध्ययन या विषयाचा पेपर सकाळी 10:30 ते दुपारी 12:00 यादरम्यान, तर दुसरा पेपर गोंडी व माडिया या विषयांवर दुपारी दीड ते 3:00 या वेळेत घेण्यात येणार आहे.
सर्व उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
1 | महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली |
2 | फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड, गडचिरोली |
3 | प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल, आरमोरी रोड गडचिरोली |
4 | आदिवासी इंग्लिश मीडियम स्कूल, सेमाना रोड, गडचिरोली |
5 | कारमेल हायस्कूल, धानोरा रोड गडचिरोली |
6 | स्कूल ऑफ स्कॉलर्स, धानोरा रोड, गडचिरोली |
7 | शिवाजी हायस्कूल तथा विज्ञान महाविद्यालय, गोकुलनगर गडचिरोली |
8 | शिवाजी इंग्लिश ॲकॅडमी स्कूल, गोकुलनगर गडचिरोली |
9 | शासकीय कृषी महाविद्यालय, आयटीआय चौक, गडचिरोली |
10 | शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली |
11 | शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली |
गडचिरोली शहरातील अशा एकूण 11 केंद्रांवर पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी 8:00 वाजता उपस्थित राहणे आवश्यक राहील.
टीप : सार्वत्रिक बहुउद्देशिय संस्था नवेगाव, गडचिरोली यांच्या कडून बाहेरून गडचिरोली मद्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था.
विद्यार्थ्यांनी आज 3 वाजताच्या आत आपले नावे कळवावे.
स्थळ: स्वप्नील मडावी अकॅडमी, इंदिरानगर गडचिरोली, सृष्टी मंगल कार्यालय,पटेल मंगल कार्यालय गडचिरोली.
अधिक माहितीसाठी संपर्क : सौ.जुमनाके मॅडम 9405872397, श्री स्वप्नील मडावी सर 9529933893 , श्री तुषार मडावी - 9422156584
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments