रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
25-08-2024
Gadchiroli News: कुरखेडा शहरात शनिवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी एक भयंकर घटना उघडकीस आली. पैशाच्या जुन्या देवाणघेवाणीतून उद्भवलेल्या वादात 26 वर्षीय युवतीची गळा दाबून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण कुरखेडा शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावर त्वरित धाव घेतली आणि अवघ्या 12 तासांत आरोपीचा छडा लावला.
मृत युवतीचं नाव ज्योती उर्फ चांदणी मसाजी मेश्राम (वय 26, रा. कुरखेडा) असं आहे, तर आरोपीचं नाव इकराम सलाम शेख (वय 30, रा. कुरखेडा) आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता, जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात क्रिकेट खेळायला गेलेल्या युवकांना संरक्षक भिंतीजवळ काहीतरी दिसलं. जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांना एक युवती मृतावस्थेत आढळली. या घटनेची माहिती शहरात पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले आणि कुरखेडाचे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी पोलीस दलासह धाव घेतली. प्राथमिक तपासानंतर युवतीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र शवविच्छेदनानंतर, ती गळा दाबून झाल्याचं उघड झालं. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी त्वरित तपासासाठी कुरखेडा गाठलं. तपासाच्या अवघ्या 12 तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपी इकराम शेख याने मध्यरात्री शाळा परिसरात ज्योतीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह झुडपात फेकला होता. हत्या केल्यानंतरही तो घरीच बिनधास्त होता. परंतु पोलिसांच्या कसोशीनं तपास करून त्याला घरातून अटक करण्यात आली. तपासादरम्यान, इकराम शेख याने पैशांच्या वादातून ही हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments