संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
20-12-2024
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी संक्रांतीनिमित्त एक आनंदाची बातमी आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार, याबद्दलच्या शंकेला आता पूर्णविराम मिळाला आहे. संक्रांतीपूर्वी फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींना खास गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे दोन्ही हफ्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर संक्रांतीपूर्वी जमा होतील, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. राज्यभरातून लाडकी बहीण योजना अतिशय चांगला प्रतिसाद मिळवत आहे आणि विधानसभा निवडणुकीतही या योजनेने महायुतीसाठी मोठे यश मिळवून दिले आहे.
जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक मदत दिली जात आहे. जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांमध्ये एकूण 7,500 रुपये लाभार्थींच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता डिसेंबर आणि जानेवारीच्या हफ्त्यांसह 3,000 रुपये मिळाल्यानंतर, लाडक्या बहिणींच्या खात्यातील एकूण रक्कम 10,500 रुपये होईल.
सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील लाडक्या बहिणींना पुढील आर्थिक मदतीसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2,100 रुपयांचा वाढीव हफ्ता देण्याचा निर्णय होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा आणखी एक मोठा दिलासा ठरणार आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments