बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
28-12-2024
Ladaki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण बुधवारी सुरू झाले आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होत असून, उर्वरित महिलांना पुढील पाच ते सहा दिवसांत पैसे मिळतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, नवीन लाभार्थींसाठी योजनेची नोंदणी सध्या बंद करण्यात आली आहे.
राज्य शासनाने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये दुबार लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तपासून त्यांच्या नावांची छाननी केली जात आहे. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाकडे या योजनांची अद्ययावत माहिती असल्यामुळे यादीतील दुरुस्ती सुरू झाली आहे. परिणामी, डिसेंबरचा हप्ता अशा महिलांच्या खात्यात जमा होणार नाही.
नवीन लाभार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सध्या थांबवली असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. अनेक महिलांनी नोंदणीसाठी अर्ज सादर केले असले, तरी शासनाच्या पुढील आदेशाशिवाय प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी लाभार्थी यादीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरजू महिलांना या योजनेचा खरा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. तरीही, नवीन नोंदणी थांबवल्यामुळे काही महिलांना लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. शासनाकडून पुढील आदेश आल्यानंतरच ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments