संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
02-07-2024
गडचिरोली, ब्युरो. मामाच्या शेताला कुंपण करण्याकरिता झाडाच्या फांद्या तोडत असताना फांदी विद्युत तारांवर पडली. विद्युत तारांवरील प्रवाह ओल्या फांदीत प्रवाहित झाल्याने तरुणाला जोरदार विजेचा शॉक बसला. यातच त्याचा मृत्यू झाला. सदर घटना चामोर्शी तालुक्याच्या कोनसरी येथे 29 जून रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. करण प्रमोद गुरुनुले (18) रा. कर्दुळ (घोट) असे मृतक तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, करण गुरूनुले हा आठवड्यापूर्वीच कोनसरी येथे मामाच्या गावाला आला होता. शनिवारी, मामाच्या शेतात कुंपण करण्यासाठी तो झाडाच्या फांद्या तोडत
असताना फांदी विद्युत लाइनच्या तारांवर कोसळली. त्याने ती फांदी काढण्याचा प्रयत्न केला असताना त्याला विजेचा जोरदार शॉक लागून तो खाली कोसळला. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. सोबतच्यांनी त्याला कोनसरी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. त्यानंतर त्याला चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती चामोर्शी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. करण हा घोट येथील जि. प. महात्मा गांधी हायस्कूलमध्ये इयत्ता 12 वीला प्रविष्ट झालेला होता.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments