अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
16-07-2024
Sarkari Yojana 2024: मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. पालकांचे 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि राज्यातील वाणिज्यबरोबरच कला, विज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींच्या शुल्काचा 100% टक्के परतावा राज्य सरकार करणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू केली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे.
ज्या संस्था व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच आहेत, अशा शासकीय महाविद्यालय, श अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशत: अनुदानित व कायम विना अनुदानित, तंत्रनिकेतन विद्यापीठ व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील अभ्यासक्रमामधील मुलींना लाभ मिळेल.
हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशनकार्डधारकांना आता मिळणार 5 लाखाचे मोफत उपचार
उच्च शिक्षण विभागांतर्गत तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय असे अभ्यासक्रम असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत मुलींना मोफत प्रवेश मिळेल.
हे देखील वाचा : Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरा घरच्या घरी फक्त एका मिनिटात
ज्या विद्यार्थिनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे. मोफत शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे.
यापूर्वी विद्यार्थिनींना शासनाच्या विविध सवलतीच्या माध्यमातून केवळ 50% टक्केच सवलत देण्यात येत होती. आता मात्र 100% टक्के सवलत देण्याचा निर्णय. घेण्यात आला आहे. त्यामुळे मुलींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे देखील वाचा : Mudra yojana 2024 : जिले में ₹2,494 करोड़ के कर्ज वितरित
मुलींचे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढविण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींना लाभ मिळणार आहे, अशा विद्यार्थिनींची उच्चशिक्षणाची स्वप्नपूर्ती होणार असल्याची भावना शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments