STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
30-08-2024
Gadchiroli News: गडचिरोली शहरात 29 ऑगस्ट रोजी एक गंभीर आर्थिक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये एका इसमाचे पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गडचिरोली येथील डोमाजी डेकलुजी डोंगरे यांना आरोपी सतीश लहुजी येरगुडे, रा. तुकुम वार्ड, चंद्रपूर, याने पैसे डबल करण्याचे आमिष दाखवले. आरोपीने डोंगरे यांना सांगितले की, तीन लाख रुपयांचे मुदतीठेव म्हणून ठेवल्यास त्यांना सहा लाख रुपये मिळतील. तसेच, आरडीच्या 21 हप्त्यांमधून 42 हजार रुपये मिळतील असा दावा करून, एकूण 3 लाख 42 हजार रुपयांच्या फसवणुकीत त्यांना गोवले. मुदतीठेवीच्या व्याजासह, डोंगरे यांना 6 लाख 42 हजार रुपयांचे आमिष दाखवून आरोपीने त्यांची आर्थिक फसवणूक केली.
सदर घटना 31 ऑक्टोबर ते 15 फेब्रुवारी 2024 या काळात घडली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डोंगरे यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी सतीश येरगुडे विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या घटनेने शहरात खळबळ माजली आहे, आणि आणखी किती लोकांना अशाच प्रकारे फसवले गेले आहे, याचा शोध घेणे गडचिरोली पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
गडचिरोली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अशीच गडचिरोली जिल्ह्याच्या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments