निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
11-10-2024
Mahila Samman Saving Certificate: महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट Mahila Samman Saving Certificate (MSSC) योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, ज्याद्वारे महिलांना बचत करण्याचा उत्तम पर्याय मिळतो. सरकारने पोस्ट ऑफिसद्वारे चालवलेली ही योजना मार्च 2025 पर्यंतच लागू असणार आहे, ज्यामध्ये महिलांना आकर्षक व्याजदरावर गुंतवणूक करून 32,000 रुपयांहून अधिक परतावा मिळवता येतो. चला, जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती.
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट ही योजना खास महिलांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही दोन लाख रुपये गुंतवून 7.5% व्याजदरावर दोन वर्षांत चांगला परतावा मिळवू शकता. योजनेचा मॅच्युरिटी पिरियड दोन वर्षांचा असून, योजनेत गुंतवलेले पैसे दोन वर्षांनंतर 32,044 रुपयांच्या व्याजासह परत मिळतील, ज्यामुळे एकूण रक्कम 2,32,044 रुपये होईल.
या योजनेत खाते उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. खातं उघडण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र, पत्ता पुरावा, पासपोर्ट फोटो आणि पॅन कार्डसारखी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतील. 18 वर्षांखालील मुलींसाठी पालक किंवा कायदेशीर संरक्षक खाते उघडू शकतात.
या योजनेत गुंतवणूकदार महिलांना आणखी एक सुविधा दिली जाते, ज्या अंतर्गत गुंतवणुकीचा 40% भाग एका वर्षानंतर कोणत्याही आपत्कालीन स्थितीत काढता येतो.
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट Mahila Samman Saving Certificate योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांना इन्कम टॅक्स सेक्शन 80C अंतर्गत कर सवलती मिळतात. मात्र, योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील व्याजावर टीडीएस लागू होतो आणि कर भरणे आवश्यक असते. जर दोन वर्षांआधीच खाते बंद करावे लागले, तर व्याज दर कमी होऊन 5.5% इतका दिला जातो.
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना महिलांना सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा मिळवण्याचा उत्तम मार्ग उपलब्ध करून देते. महिला बचतीसाठी ही योजना एक सोपी आणि फायदेशीर पर्याय ठरू शकते.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments