CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
04-11-2024
Gadchiroli News: आरमोरी: फेसबुकवर झालेल्या ओळखीतून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 3 नोव्हेंबरला समोर आली असून, पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपीला अटक केली आहे.
हे देखील वाचा: Chandrapur News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला 20 वर्षांचा कारावास
आरोपीचे नाव सुजित कैलास गेडाम (वय 22, रा. मोहाडी, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुजितची ओळख 17 वर्षीय पीडित मुलीसोबत पाच महिन्यांपूर्वी फेसबुकवर झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले, ज्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेमाचे स्वरूप आले.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुजितने मुलीला त्याच्या गावी भेटण्यासाठी बोलावले. या भेटीत त्याने तिच्यावर अत्याचार केला. घरी परतल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली, त्यानंतर आरमोरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 64 (1), 64 (2) (i), 64 (2) (25)87, 137 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी 31ऑक्टोबरला आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. न्यायालयात त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप मोहुर्ले करत आहेत.
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
No Comments