CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
08-11-2024
Sunita Williams News: अंतराळात अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या प्रकृतीबाबत मीडियामध्ये अफवा पसरल्यानंतर NASA ने अधिकृत निवेदन जारी करत सर्व शंका दूर केल्या आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर सध्या असलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या तब्येतीबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे NASA ने स्पष्ट केले आहे.
ताज्या अहवालांनुसार, 'द डेली मेल' आणि 'द न्यूयॉर्क टाइम्स' सारख्या काही टॅब्लॉइड्समध्ये अफवा पसरली होती की, सुनीता विल्यम्सची तब्येत ISS वर खालावली आहे. 24 सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या फोटोच्या विश्लेषणावर आधारित हे दावे करण्यात आले होते. यासंदर्भात NASA ने 7 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, सुनीता विल्यम्स पूर्णपणे बरी असून, तिच्या तब्येतीबाबत कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.
NASA च्या निवेदनात म्हटले आहे की, ISS वर उपस्थित असलेले सर्व अंतराळवीर निरोगी आहेत आणि त्यांच्यावर एक समर्पित फ्लाइट सर्जन सतत लक्ष ठेवून आहे. सुनीता विल्यम्स सध्या ISS क्रू 72 ची कमांडर असून, तिच्या सोबत अन्य तीन अमेरिकन आणि तीन रशियन अंतराळवीर आहेत. NASA ने त्यांच्या तपासण्या नियमितपणे केल्या जात असल्याचेही स्पष्ट केले आहे.
सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर 6 जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर यानातून ISS वर पोहोचले होते. नियोजित कालावधीनंतर पृथ्वीवर परतण्यासाठी तयार असले तरी, तांत्रिक समस्यांमुळे स्टारलाइनर यानाला अंतराळ स्थानकावरुन परत पाठवणे शक्य झाले नाही. यामुळे सुनीता आणि बुच यांना ISS वरच अधिक काळ राहावे लागणार आहे.
NASA ने निर्णय घेतला की स्टारलाइनर यान रिकामे पृथ्वीवर परतवले जाईल, जे 6 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या परत आले. आता सुनीता आणि बुच फेब्रुवारी 2025 मध्ये SpaceX च्या क्रू-9 मिशनसह पृथ्वीवर परत येण्याची योजना आहे.
Redefine your style
book your appointment now
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments