आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
08-12-2024
Ladki Bahin Yojana: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे महायुतीला बहुमत मिळालं असल्याचं सांगितलं जात आहे, विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे या निवडणुकीत महायुतीला लाभ मिळाल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. यावर फडणवीस यांनी सांगितले, "आम्हाला लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आहे. आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत. आम्ही या बाबत अर्थसंकल्पात विचार करू.
त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही वित्तीय साधनांच्या योग्य चॅनलायझेशननंतरच ही मदत देऊ शकतो. आम्ही सर्व दिलेल्या आश्वासने पूर्ण करू आणि यासाठी योग्य ती व्यवस्था करू." योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या नोंदींची तपासणी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. काही महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं.
फडणवीस यांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता - "जर कोणी योजनेच्या निकषांचं पालन न करताच लाभ घेतला असेल, तर त्यावर विचार केला जाईल. ज्या महिलांनी नियमांचं पालन केलं आहे, त्या महिलांचं नाव काढलं जाणार नाही."
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुमारे 2.43 कोटी महिलांना लाभ मिळाला आहे, आणि दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहेत. यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला 3700 कोटी रुपये खर्च करावे लागतात. आता, लाभार्थ्यांच्या नोंदींची तपासणी आणि अर्थसंकल्पानंतरच महिलांना वाढीव रक्कम दिली जाणार आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments