रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
13-12-2024
PM Awas Yojana: शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना स्वतःचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘PM Awas Yojana’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात सहा लाखांहून अधिक घरांच्या बांधकामाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरांमध्ये येत्या पाच वर्षांत तब्बल एक कोटी घरं बांधण्याचे नियोजन आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत सामंजस्य करार केले आहेत.
मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यांकडून मोठ्या प्रमाणावर घरकुलांच्या प्रस्तावांची मागणी येत आहे. लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पुढील वर्षाच्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच, मागणी सर्वेक्षण आणि प्रमाणीकरण मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यांना त्यांच्या परवडणाऱ्या गृहनिर्माण धोरणाची आखणी देखील मार्चपर्यंत पूर्ण करावी लागेल. ही धोरणे पीएम आवास योजनेसाठी केलेल्या सामंजस्य कराराच्या अटींपैकी एक महत्वाची अट आहे.
परवडणारी भाड्याची घरे
सहा लाख घरांच्या बांधकामासोबतच, केंद्र सरकारने भाडेकरू मॉडेलवर आधारित परवडणाऱ्या भाड्याच्या घरांची योजना देखील आखली आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील ज्यांना घर खरेदी करायचे नाही अशा नागरिकांना भाड्याने घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विशेषतः नोकरदार महिलांसाठी या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे.
पीएम आवास योजनेमुळे शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना स्वप्नातले हक्काचे घर मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, परवडणाऱ्या भाड्याच्या घरांमुळे अल्प उत्पन्न गटातील लोकांनाही सुरक्षित निवास मिळेल. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments