समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
27-08-2024
लडाख: आपल्या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैसर्गिक अशा सर्व प्रकारची विविधता सापडते. म्हणूनच भारताला जगातला सर्वांत रंगीबेरंगी देश म्हणून ओळखलं जातं. जगभरातल्या व्यक्तींना भारतीय संस्कृतीबद्दल कायम आकर्षण वाटत आलेलं आहे. सर्व प्रकारची विविधता जवळून अनुभवण्यासाठी दर वर्षी लाखो परदेशी पर्यटक भारतात येतात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतात. हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल, की भारतात असं एक ठिकाण आहे, जिथे परदेशी महिला गरोदर होण्यासाठी येतात. विशेष बाब म्हणजे गर्भधारणेसाठी त्या स्थानिक पुरुषांची मदत घेतात.
कारगिलपासून 70 किलोमीटर अंतरावर लडाखमध्ये हे गाव आहे. या गावाला ‘आर्य व्हॅली’ म्हणून ओळखलं जातं. असा दावा केला जातो, की परदेशांतून विशेषतः युरोपीय देशांतून अनेक महिला या गावात येतात आणि स्थानिक पुरुषांच्या साह्याने गरोदर होतात. आपल्याला हे थोडं विचित्र वाटेल; पण सध्या याबाबत खूप चर्चा सुरू आहे.
लडाखमधल्या आर्य व्हॅलीत ब्रोकपा जमातीचे लोक राहतात. या जमातीबद्दल असं म्हटलं जातं, की हे लोक ‘अलेक्झांडर द ग्रेट’च्या सैन्याचे वंशज आहेत. हे लोक जगातले शेवटचे शुद्ध आर्य असल्याचाही दावा केला जातो. असं म्हणतात, की अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा भारत सोडून माघारी जात होता तेव्हा त्याच्या सैन्यातले काही लोक भारतात राहिले होते. या सैन्याचे वंशज अजूनही भारतात वास्तव्याला आहेत.
अलेक्झांडरच्या सैनिकांप्रमाणेच उत्तम शरीरयष्टी, शारीरिक रचना आणि मजबूत शरीर असलेल्या अपत्याची प्राप्ती करण्याच्या इच्छेमुळे विदेशी स्त्रिया आर्य व्हॅलीमध्ये येतात. गरोदर झाल्यानंतर त्या पुन्हा आपल्या देशात निघून जातात. पूर्वी या समाजातल्या लोकांबद्दल फारशी माहिती आणि क्रेझ नव्हती; पण इंटरनेटवर प्रसिद्धी मिळाल्यानंतर इथे येणाऱ्या परदेशी महिलांची संख्या वाढू लागली. परदेशी महिला लैंगिक संबंधांच्या बदल्यात पुरुषांना पैसे देतात.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments