CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
01-09-2024
दिलीप अहिनवे, मुंबई व ठाणे शहर प्रतिनिधी
भिवंडी (जि. ठाणे), दि. ३१ : बृहन्मुंबई महानगरपालिका जांबोळी जलविभाग, भिवंडी येथे दि. ३० ऑगस्ट रोजी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण माने यांच्या सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्रवीण माने यांनी मुंबई महापालिकेत २९ वर्षे निष्कलंक व निर्विघ्नपणे अखंड सेवा पुर्ण केली. जांबोळी जलविभागाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, ट्रॉफी व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पिसे - पांजरापूर, जांबोळी, तानसा, मोडकसागर,व कापूरबावडी जलविभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून जांबोळी जलविभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय चव्हाण, धामणगाव मनपा शाळेचे मुख्याध्यापक मनोज गायकवाड, फोरमन मधुकर बिडवी, मनपा शिक्षण विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ पर्यवेक्षक निवृत्ती कानडे, सेवानिवृत्त फोरमन दिलीप वाकचौडे व जगन्नाथ राठोड हे उपस्थित होते.
उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त करताना डॉ. माने यांच्याबाबत आपापल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कनिष्ठ अभियंता अक्षय चव्हाण यांनी सांगितले की, डॉ. माने २१ मे १९९५ रोजी मुंबई महापालिका मालाड पी/नॉर्थ विभागात रुजु झाले. सन १९९७ मध्ये ते तानसा मोडकसागर येथे सलग ८ वर्षे कार्यरत होते. सन २००४ मध्ये ते भांडुप कॉम्प्लेक्स येथे सेवा करत होते. जुलै २००७ पासून आजतागायत जांबोळी जल विभागात सेवा केली. येथे कार्यरत असताना ते मध्य वैतरणा येथे देखील आठवड्यातून एकदा वैद्यकीय सेवा देण्यासाठी जात होते.
मुख्याध्यापक मनोज गायकवाड यांनी सांगितले की, जांबोळी विभागातील कर्मचारी, धामणगाव शाळेतील मुले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील निवृत्त कर्मचारी व त्यांचा परिवार यांना वैद्यकीय समस्या आली तर डॉक्टरांकडून उत्तम सेवा मिळत होती. आज आमच्या नवीन शाळेचे उदघाटन डॉक्टरांच्या सेवापूर्ती समारंभाने झाले हे आमचे भाग्य आहे. मुलांचे आरोग्य त्यांनी जपले. त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी देखील जपली. आपल्या कार्याचा गवगवा त्यांनी कधीही केला नाही.
सेवानिवृत्त कनिष्ठ पर्यवेक्षक निवत्ती कानडे यांनी सांगितले की, कोरोना कालावधीत डॉक्टर उपलब्ध नसताना त्यांनी संपर्क साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोफत वैद्यकीय सल्ला देऊन खुप मोठी समाजसेवा केली. त्यांचा स्वभाव परोपकारी असल्यामुळे लोकांना नेहमीच मदत करत होते. ते आमचे केवळ डॉक्टर नाही तर मित्र आहेत. माणसे जोडण्यात ते प्रवीण आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जांबोळी जल विभागातील कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदररित्या अनिकेत जाधव यांनी केले.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments