निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
07-11-2024
अंबाजोगाई (जि. बीड) : उमेदवारमतदारांना काय आश्वासने देतील याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय अंबाजोगाई येथील प्रचारात आला. तिथे एका उमेदवाराने चक्क, 'मला निवडून द्या. मी तुमची लग्नं लावून देतो', अशी भुरळ लग्नाळू मुलांना घातली आहे.
मंगळवारी रात्री तालुक्यातील घाटनांदूर येथे प्रचारावेळी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी लग्नाचा हा फंडा वापरला आहे. विधानसभा निवडणूक ही विकासाच्या प्रश्नांवर लढवण्याचा पारंपरिक प्रघात आपल्याकडे आहे.
मात्र, अलीकडे याला जातीय स्वरूप मिळाल्याचे दिसत असतानाच आता त्याच्याही पलीकडे जाऊन गंभीर सामाजिक समस्या असलेल्या लग्नाच्या विषयाला हात घालण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण कमी झाल्यामुळे व मुलींना कमी कुटुंबातील व नोकरीचे भरपूर पॅकेज असलेला मुलगाच आपला साथीदार असावा, असे वाटत असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील तरुणांची चाळिशी पार होत आली तरी त्यांना मुलगी पसंती देत नसल्याचे दिसून येते. हाच मुद्दा उचलून लग्नाळू मतदारांना आकर्षित करण्याचा उमेदवारांचा हा प्रचारफंडा चर्चेत आला आहे.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
No Comments