अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
21-11-2024
सोशल मीडिया हे माहितीचं भंडार आहे. इथे अशा काही गोष्टी पाहायला किंवा ऐकायला मिळतात की कधीकधी त्यामुळे धक्काच बसतो. तर कधीकधी इथे मीम मटेरीयल देखील व्हायरल होतं, ज्याला कधी लोक डोक्यावर घेतात तर कधी ट्रोल करतात. सध्या मुलांच्या लग्नाचा विषय फारच गंभीर होत चाललाय. हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःचं घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. नणंद, दीर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुण्या-मुंबईत फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडून व्यक्त होत आहेत. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सर्वच समाजांत मुलींचे प्रमाण घटत आहे. अशातच मुलींचे शिक्षण वाढत असल्याने अनेक मुलींना आपल्याला अनुरूप मुलगाच हवा असतो. या वाढत्या अपेक्षेमुळे मात्र अल्पशिक्षित मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ येते. मात्र कधी कधी मुलींच्या अपेक्षा नको तेवढ्या असतात. आता तर गावच्या मुलीही म्हणतात नवरा शहरातलाच असावा. पण का यामागे काय कारण असावी याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गावातल्या मुलींना शहरातली मुलं जास्त का आवडतात? हे काही मुलींनी सांगितलं आहे. या मुलींची उत्तर ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल तर काही उत्तर ऐकून डोक्याला हात लावाल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पहिली मुलगी सांगते, शहरातली मुलं फार फॅशनेबल राहतात त्यांच ड्रेसिंग सेन्स चांगला असतो. त्यामुळे शहरातली मुलं जास्त आवडतात. दुसरी मुलगी म्हणतेय, गावाकडच्या मुलांचा ड्रेसिंग सेंस फार खराब असतो तसंच त्यांना कुठे कसं वागायचं याबद्दलची समज नसते. तिसऱ्या मुलीनं मात्र अगदी खरं खरं न लाजता सांगितलंय की, गावाकडच्या मुली शहरातले नवरे शोधतात. कारण त्यांना शहरात राहायचं असतं, रोज शेतावर जाऊन काम करा, खुरपायाला जायचं नसतं. परत मग चुलीवर जेवण करा, भाकऱ्या खा, भाकऱ्या थापा ही सगळी काम तिला करायची नाही त्यामुळे शहरातला मुलगा पाहिजे म्हणते. आता या झाल्या भरपूर अपेक्षा असणाऱ्या मुली. दरम्यान आणखी मुलींनी गावाकडच्या मुलांची बाजू देखील घेतली. एक मुलगी म्हणाली, गावाकडची मुलं शहरातल्या मुलांपेक्षा मुलींचा आदर जास्त करतात. तर दुसरी म्हणाली, शहरातली मुलं जॉबलेस असतात. त्यामुळे गर्लफ्रेंडच्या एका इशारावर ते धावत येतात. गावाकडची मुलं दिसायला सुंदर नसतात पण मनानं सुंदर असतात.
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
No Comments